अमर आलिंगन…
रविवार सकाळची वेळ होती,
मी हॉलमध्ये पेपर वाचत बसलो होतो;
ती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली,
“चहा घेणार का तुम्ही? ” असं मला म्हणाली;
मी तिच्याकडे न बघताच “हो” म्हणालो,
आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेलो;
माझ्या जवळून जाताना तिने केसांना नाजुक झटका दिला,
त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला;
मी उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले,
तिनंही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले;
मी हळूच उठलो खुर्चीवरुन आणि स्वयंपाकघरात आलो,
तिनं माझ्याकडे बघावं म्हणून फ्रिजवर तबला वाजवू लागलो;
तिनं मात्र मागे न बघताच चहाचं आधण ठेवलं,
आणि मग मला चिडवण्यासाठी आपलं नाक उडवलं;
तिच्या पाठमोर्या रुपाकडे बघत मी क्षणभर तसाच थांबलो,
उगाच तिला दुखावले म्हणुन स्वतःच्याच मनाशी भांडलो;
हळुच मग मागुन जाऊन मग मी तिच्या कमरेला विळखा घातला,
पण गडबडीत चहाच्या भांड्याला लागुन हात माझा भाजला;
मी कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त हसली,
चावटपणाची वेडी लहर माझ्या मनात मग उठली;
मी जखडले तिला मिठीत, ती म्हणाली “जाऊ द्या ना!”
मी म्हणालो तिला “तुला माझ्यात सामवू दे ना!”
ती लाजुन म्हणाली “अहो असं काय करता? चहा उकळतोय!”
मी म्हणालो “उकळू दे! इथं माझा जीव जळतोय!”
“अहो असं काय करता? दूध उतू जाईल ना!”
“कशाला काळजी करतेस मी परत आणुन देईन ना!”
ती उगाच कारणं देत होती, मी प्रत्येक कारण उडवत होतो,
तिला अजुनच जवळ घेत, माझ्या मनासारखं घडवत होतो;
शेवटी तिनं कारण दिलं “अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय”
मी म्हणालो “हो का! मला वाटले की माझा चावटपणा अती होतोय”
तेवढ्यात दाराची कडी वाजली,
मी मनातल्या मनात बाहेरच्याला इरसाल शिवी घातली;
तिनं झटकन स्वतःला माझ्या तावडीतुन सोडवून घेतलं,
आणि हळूच मला धक्का मारुन, स्वयंपाकघराबाहेर लोटलं;
मी वैतागानं दार उघडलं समोर कचरावाला दिसला,
माझा खांद्याशी ओला झालेला शर्ट पाहुन तो पण गालात हसला;
मी कचरा देऊन झटकन दार लावून घेतलं,
पण मागेवळताक्षणी काहितरी विचित्र घडणार आहे, असं मला वाटलं;
पहिले मला स्वयंपाकघरातुन, दूध जळण्याचा वास आला,
नंतर कान दणाणुन सोडणारा, सिलेंडरचा स्फोट झाला;
मी धावत आत गेलो, माझं ह्रदय धडधडत होतं,
माझ्या डोळ्यांदेखत तिचं पातळ आगीवर फडफडत होतं;
मी तिला उचलून घेतलं, डोळे माझे झरत होते,
तिच्या करपलेल्या कायेवरून हात माझे फिरत होते;
जेव्हा मी कुणीच नसतो
जेव्हा मी कुणीच नसतो -
निराकार सावल्यांप्रमाणे
क्षितीजावरती लोंबत असतो,
अंधाराच्या मागे लपुनी
शिळा हॊउनी आंबत असतो.
बुरशीलाही बुरा यावा अन
गंजालाही चढावा गंज,
किड्यांच्याही डोक्यात घुमावी
भणभणणारी झांज.
अशी गजबज होता मस्तकी
चित्ताला ये जरा शांतपण,
या शांतीच्या माथ्यावरि पण
नश्वरतेचे घण चिरंतन .
जेव्हा मी कुणीच नसतो -
असण्याचा सारे काही
अर्थ अचानक सुटू लागतो,
या नसण्याचा त्या असण्याशी
संबंध भराभर तुटू लागतो…
निराकार सावल्यांप्रमाणे
क्षितीजावरती लोंबत असतो,
अंधाराच्या मागे लपुनी
शिळा हॊउनी आंबत असतो.
बुरशीलाही बुरा यावा अन
गंजालाही चढावा गंज,
किड्यांच्याही डोक्यात घुमावी
भणभणणारी झांज.
अशी गजबज होता मस्तकी
चित्ताला ये जरा शांतपण,
या शांतीच्या माथ्यावरि पण
नश्वरतेचे घण चिरंतन .
जेव्हा मी कुणीच नसतो -
असण्याचा सारे काही
अर्थ अचानक सुटू लागतो,
या नसण्याचा त्या असण्याशी
संबंध भराभर तुटू लागतो…
तव नयनाचे दल हलले
तव नयनाचे दल हलले ग
पनावर्च्या दवबिन्दुपरि जग सगळे डळमळळे ग
तव नयनाचे दल हलले ग
वारे गळले तारे ढळले
दिग्गज पन्चाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषि मुनि योगि चळले ग
तव नयनाचे दल हलले ग
ऋतुचक्राचे आस उडाले
आकाशातुन शब्द उडाले
आवर आवर आपुले भाले
मीन जळि तळमळले ग
तव नयनाचे दल हलले ग
ह्रिदयि माझ्या चकमक जडली
दो नयनान्ची किमया घडली
नजर तुझी धरणीला भिडली
पुनरपी जग सावरले ग
तव नयनाचे दल हलले ग
पनावर्च्या दवबिन्दुपरि जग सगळे डळमळळे ग
तव नयनाचे दल हलले ग
वारे गळले तारे ढळले
दिग्गज पन्चाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषि मुनि योगि चळले ग
तव नयनाचे दल हलले ग
ऋतुचक्राचे आस उडाले
आकाशातुन शब्द उडाले
आवर आवर आपुले भाले
मीन जळि तळमळले ग
तव नयनाचे दल हलले ग
ह्रिदयि माझ्या चकमक जडली
दो नयनान्ची किमया घडली
नजर तुझी धरणीला भिडली
पुनरपी जग सावरले ग
तव नयनाचे दल हलले ग
Subscribe to:
Posts (Atom)