Showing posts with label विचार. Show all posts
Showing posts with label विचार. Show all posts

कशासाठी करायचा जयमहाराष्ट्र ?

कशासाठी करायचा जयमहाराष्ट्र ?
 
१८ तास वीज नाही त्यामुळे कारखानदारी व्यापार नाही रोजगार नाही
सुंदर मुंबई स्वछ्य  मुंबईची,  बकाल मुंबई बेफाम मुंबई केली आहे
प्यायला पाणी नाही म्हणून विदर्भात दंगे हि आजची बातमी
पण राज्यकर्ते दारू कशी स्वस्त मिळेल या विचारात मग्न .
 
५० वर्षात जातीपाती नष्ट होण्याऐवजी प्रत्येकजण आपण कोणत्या जातीचे ते अभिमानाने मिरवतो ,
सहिष्णुता नष्ट होऊन 
विचारांचा मुकाबला विचारांनी करण्यापेक्षा हाणामारीने करणारे आज नेता बनत आहेत. 
लोकशाही च्या नावाखाली सर्व नेते घराणेशाही राबवीत आहेत ,
माझा मुलगा/मुलगी पुतण्या यापलीकडे जग नाही
महिला आरक्षणाच्या नावावर स्वताच्या बायको /मुलीची काळजी घेतली जात आहे
गुंड तडीपार खून हि नेते (??)मंडळींची ओळख बनली आहे .
 
शिक्षण हे  फक्त श्रीमंतांची मिरासदारी होऊन राहिली आहे 
 
महाराष्ट्रच्या  राजधानीत मराठी फक्त २० टक्के बोलतात
महाराष्ट्रात मराठी भाषा हि इंग्रजी व हिंदी नंतर ३रया  क्रमांकावर आहे 
पण  मराठी भाषेच्या  नावावर गळे काढन्न्यारांची मुले इंग्रजी भाषेत शिकतात कारण ती जागतिक गरज आहे.
बाल मृत्यू चे प्रमाण वाढत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत
गावे ओस पडत आहेत तर शहरांची सूज वाढत  आहे 
नक्षलवाद वाढतो आहे पण त्यावर मार्ग शोधण्या ऐवजी बंदुकीच्या बळावर तो दडपून टाकायला बघत आहेत
साहित्यिक क्षेत्रात मरगळ आहे, क्रीडा क्षेत्रात बोंब आहे, व्यापारात साडेमाडे तीन-चार आहेत  कशी होणार प्रगती?
आपल्या बरोबर निर्माण झालेला गुजरात १६ टक्के जी डी पी वाढ करून खरा सुवर्ण गुजरात बनत असताना  पुणे मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राची  वाढ बिहारपेक्षा देखील कमी आहे पण विचार कोण करतोय ?
५० वर्षानंतर आज महाराष्ट्र ची अवस्था  खालील ' बी' च्या कविते प्रमाणे आहे 
 
तेजाचे तारे तुटले                मग मळेची सगळे  पिकले !
लागती दुहीच्या आगी      राष्ट्राच्या संसाराला ;
अति महामूर पूर येते      ढोग्याच्या  पावित्र्याला ;
खडबडात उडवी जेव्हा       कोरडया  विधीचा मेळा;
                चरकात मान्यवर पिळती
                सामान्य मुकी जनता ती ,
                 लटक्याला  मोले येती ,
कौटिल्य स्वैर बोकाळे !     तेजाचे तारे तुटले  !! 
 
अचारविचारौघाचा             नवनित्य रक्तसंचार
ज्या समाजदेही होता       अनिरुद्ध करीत व्यापार
त्या देहा ठायी ठायी        घट कसले बंध अपार
                 कोंडिले स्वार्थकोंड्यात,
                 जल सडले ते निभ्रांत 
                 तरी धूर्त त्यांस तीर्थत्व 
देऊनी नाडती भोले !            तेजाचे तारे तुटले  !! 
 
कर्तव्य आणि श्रेयाची      हो दिशाभूल जेव्हां ती,
आंधळा त्याग उपजोनी    डोहळे भिकेचे पडती;
अतिरेक पूज्यभावाचे        फुंकिती विवेकेज्योती;
               मग जुन्या अप्तावाक्याते
              भलतिशीच महती येते,
               राणीची दासी होते,
बुद्धीचे फुटती डोळे !           तेजाचे तारे तुटले  !! 
 
घन तिमिरी घोर अघोरी    विक्राळ मसण जागवती;
ती ' परंपरा ' आर्यांची 'संस्कृती' 'शिष्टरूढी' ती;
'धर्मादी' प्रेत झाल्याची बेफाम भुते नाचवती;
सत्तेचे फक्त पुजारी उरले        तेजाचे तारे तुटले  !! 
...
खिन्न मनाने

भवानी तलवारीचे गूढ....

भवानी तलवारीचे गूढ
छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार कुठे आहे, हा एक मोठा गूढ प्रश्‍न आहे. लोकमान्य टिळकांच्या काळापासून हा प्रश्‍न अधूनमधून चर्चेत येतोच, त्यावरून रान पेटते आणि मग तो पुन्हा बासनात जातो, असे घडताना दिसत आहे. इंग्लंडमध्ये बकिंगहॅम राजवाड्यात भवानी तलवार आहे, अशी एक समजूत आहे. लोकमान्य टिळकांनी ही तलवार इंग्लंडमधून परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करणारी एक कविता गोविंदाग्रजांनी (राम गणेश गडकरी) लिहिली होती.

1980मध्ये बॅ. अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना, तर त्यांनी भवानी तलवार महाराष्ट्रात आणणारच अशी घोषणा करून मोठी मौज केली होती. त्यासाठी लंडनवारीही केली होती. तिकडून त्यांनी भवानी तलवार नाही आणली, पण तिचे चित्र तथाकथित चित्र मात्र आणले. यानंतर भवानी तलवार पुन्हा चर्चेत आली ती केंद्रात भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा. जून 2002मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवानी स्पेनच्या पाच दिवसीय भेटीवर गेले होते. त्यावेळी स्पेनमधील काही संशोधकांनी सांगितले, की शिवाजी महाराजांची भवानी तलवार स्पेनमधील तोलेदो या शस्त्रास्त्रे निर्मितीसाठी नावाजलेल्या शहरातील कारागिरांनी तयार केली होती. त्यावरून काही काळ धुरळा उडाला. मग तो विरून गेला.

बखरी आणि काव्यांनुसार साक्षात्‌ तुळजाभवानीने शिवरायांना तलवार दिली, ती ही भवानी तलवार. तुळजाभवानीने महाराजांना दर्शन दिले आणि "राजा, मी तुझी तलवार होऊन राहिले आहे' असे म्हणाली, असे "शिवभारत' या काव्यामध्ये नमूद आहे. महाराजांकडे अनेक तलवारी होत्या. त्यातील एक त्यांनी शहाजीराजांनी दिली होती. तिचे नाव त्यांनी "तुळजा' असे ठेवले होते. महाराजांच्या दुसऱ्या एका तलवारीचे नाव "जगदंबा' असे होते. महाराज भवानीचे भक्त होते. तेव्हा अन्य एखाद्या तलवारीला त्यांनी "भवानी' असे नाव दिले असेल. यात काही वाद नाही. वाद आहे तो हा, की सध्या ही तलवार कुठे आहे?

सुमारे नव्वदेक वर्षांपूर्वी मुंबईतील कॅप्टन बहादुर मोदी नावाच्या गृहस्थांनी भवानी तलवार आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. तशी एक पुस्तिकाही त्यांनी प्रसिद्ध केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, खान बहादुर पदमजी यांच्याकडे भवानी तलवार होती व ती त्यांनी डॉ. कूर्तकोटी यांना दिली. नंतर ती त्यांच्या स्वतःकडे आली. या तलवारीवर "छत्रपती शिवाजी' असे कोरलेले होते. नंतर उघडकीस आले, की तो मजकूर या पदमजी नावाच्या इसमानेच कोरलेला होता!

इंदूर-महू येथे असलेली तलवार हीच भवानी तलवार आहे व ती महाराजांनी छत्रसाल बुंदेल्याला दिली होती, असा दावा काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ इतिहाससंशोधक सेतुमाधवराव पगडी यांनी केला होता. परंतु त्या तलवारीवर नंतर छत्रसालाच्या सेनापतीचे नाव आढळून आले! असाच आणखी एक दाव

मराठा ...

होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!

असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.
ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला".

दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.

घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.

घाम गाळून नांगर ओढणाऱ्या नवऱ्याची साथ फक्त हीच स्त्री देवू शकते अऩ भरसकाळी रांगोळी हिच्याच हाताने सजते.

इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.

आणि हे बदलण्याची ताकत आहे "मराठयांच्या मनगटात"

हिंदी नको, इंग्रजी हवी ! ?

नमस्कार!

काही दिवसांपूर्वी सुवर्णमयी यांनी खालील प्रश्न व्य. नि. पाठवून विचारला होता. त्याला दिलेले उत्तर इथे थोडे संपादित करून चर्चेसाठी मांडत आहे.

आपले मत इंग्रजी चालेल पण हिंदी नको हे तितकेसे पटले नाही.

महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे आणि एक परदेशी भाषा चालेल म्हणण्याआधी केवळ राष्ट्रभाषा म्हणून इंग्रजी ऐवजी हिंदीचा वापर केला तर चालणार नाही का?

नाही.

पहिली गोष्ट - हिंदी ही 'राष्ट्रभाषा' हा चुकीचा समज़ व चुकीचा शब्दप्रयोग आहे. भारतीय संविधानात कोणतीही एकच एक भाषा अशी राष्ट्रभाषा म्हणून दिलेली नाही. आठव्या अनुसूचीत मराठीसह बावीस भाषा या scheduled languages म्हणून आहेत त्या सर्व राष्ट्रभाषाच आहेत. इंग्रजी व हिंदी या फक्त संघराज्याच्या 'कार्यालयीन भाषा' (official languages) आहेत.

दुसरी गोष्ट - तमिळनाडू व नागालँडमधील लोकांना इंग्रजी ही ज़र परकी भाषा असेल तर हिंदी हीही तितकीच परकी आहे. भारतातील पन्नास टक्क्यांहून कमी लोक हिंदी बोलतात. म्हणजे हिंदी ही तर बहुसंख्यांचीही भाषा नव्हे! केवळ निवडणुकीत मतदान करणाऱ्यांपैकी जास्ती लोकांचा पाठिंबा असल्याने जिंकून येण्यातला हा प्रकार आहे. आणि हे असे होण्याचे कारण जेव्हा कार्यालयीन भाषा ठरवली गेली तेव्हा अनेक उमेदवार भाषा होत्या. आज़ही ज़र केवळ हिंदी व इंग्रजी अशा भाषांमधून निवडायची वेळ आली, तर इंग्रजी सहज़पणे जिंकेल! (आणि इंग्रजी पंधरा वर्षेच वापरण्याची मूळची तरतूद सतत मुदतवाढ मिळवत आज़ 62 वर्षे झाली तरी इंग्रजी ही अधिकृत कार्यालयीन भाषा म्हणून संविधानात आहे हे त्याचेच निर्देशक आहे!)

तिसरी गोष्ट - इंग्रजी ही भारतासाठी परकी भाषा आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. (आणि मी इथे भारत म्हणून फक्त उत्तर भारताचा आणि महाराष्ट्राचा विचार मांडत नाही, तर दक्षिण व पूर्व भारताचाही समावेश करत आहे. अंदमान किंवा मिज़ोराम किंवा तमिळनाडू किंवा प. बंगाल यांच्यासाठी हिंदी अधिक परकी की इंग्रजी? हिंदी अधिक जुन्या परिचयाची की इंग्रजी?)

चौथी गोष्ट - महाराष्ट्रासाठी हिंदीला प्रेमाने आलिंगन देत राहाणे हे ऐतिहासिकदृष्ट्या नेहमीच तोट्याचे ठरत आले आहे. केवळ मराठी हीच अशी भाषा आहे की जिची लिपी हिंदीशी ज़वळपास तंतोतंत ज़ुळते. त्यामुळे हिंदीभाषकांना महाराष्ट्रात व्यवहार करणे अत्यंत सोपे ज़ाते. परिणामतः त्यांना इथे राहाताना मराठी न शिकणेही सहज़ चालून ज़ाते, आणि त्यांना स्थलांतरे करण्यासाठी