Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts

शिवा एकदा जन्मला होता अफझल त्यानेच फाडला होता

शिवा एकदा जन्मला होता अफझल त्यानेच फाडला होता
भारतीय संसदेवर हल्ला करुनहि हिरो ठरु पहाणार्या अफझलला आणि त्याला फाशी न देणार्याना शतशाः प्रणाम.
हीच लायकी आमुची
धर पुन्हा वेठीस आम्हा
हीच पायरी आमुची
जा पुन्हा तुडवुन आम्हा
शिवा एकदा जन्मला होता
अफझल त्यानेच फाडला होता
नकोस घाबरु गडया तूं
आमचा तो इतिहास होता
ठेव लिहुन अनुभव तुझे
नक्किच त्यानाहि भाव येईल
न जाणो उध्याचा इतिहास
हिरव्या शाईने लिहीला जाईल
देशद्रोह केलास तूं
नको गाळुस हात-पाय तूं
देशद्रोह केलास तूं
आंता शहीद ठरशिल तूं
गल्लीबोळात भाऊबंध तुझे
आमचे हात बांधलेले
नेते साले कुत्रे आमचे
तुझ्या तर्फे भुंकणारे
टळेल रे फांशी तुझी
मग तुला कैदेत ठेवतील
मरतील आमचे बांधव उपाशी
तुला चिकन-मटन बिर्याणी
तुला सोडवायला तुझे लोक
विमानाचे अपहरण करतील
म्हणूनच म्हणतो-----
उठ अफझल ऊठ
नेते आमचे षंढ आहेत---
पुन्हा घाव घाल तूं !
पुन्हा घाव घाल तूं !!!

मराठा हाच विचार ...

टिप – मराठा शब्द अखंड महाराष्ट्रातील लोकांना उद्देशून आहे. कुणी जातिवाचक घेऊ नये.

मराठ्यांची उप-यांशी जमली आहे गट्टी
लाचारीची मस्त पेटली आहे भट्टी
इथे जो तो स्वात: चा उदो उदो करतोय
गटारातील कीडा रोजच इथे मारतोय || १ ||

कुणी नाही जिवंत सारे मुडदे इथे
स्वार्थाचे माकड धावते जिथे तिथे ,
देतात आरोळी मेलेल्या प्रेताला
मराठाच शोधतोय मेलेल्या स्वत:ला || २ ||

भाषणबाजी करत रोज जोतो जगतोय
“मराठा मी एकटाच” आरोळी ठोकतोय
शंडा ची अवलाद दुसरेच आहे
हे बांगड्या घेऊन सांगायची वेळ आहे || ३ ||

मराठ्यांचे सरदार सगळे लाचार
आपणच खरे पाईक राज्याचे आहे
बाकी गणोजीची पिलावळ सांगायला
कलाशाचे ह्याना पाठबळ आहे || ४ ||

लिलावात इज्जत, आज बाजार भरलाय
जो तो इथे स्वार्थाने भारलाय ,
संपेल संपूर्ण मराठा पण संपेल का स्वार्थ ?
कधीतरी लाचारिही पुकारेल का आर्त ? || ५ ||

जे जे आहे जिवंत त्यानी घालावी साद
मेलेले मूडदे ही देतील प्रतिसाद ,
लाचार सरदार पण मावळे हुशार
गाडा आधी फितूर करा “मराठा हाच विचार” || ६ ||

—————– बाजी दराडे

राजे पुन्हा जन्मास या..

जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या
राजे पुन्हा जन्मास या

शिरि शिरपेच हाती समशेर शोभती
अश्वरुढ होई राजा शिवछत्रपती
हे राजे, तुम्हा हिन्दुह्रुदय पुकारती
भगवा धरुन हातात या..राजे पुन्हा जन्मास या. || १ ||

कावा गनिमी करुनी, धर्मरक्षिण्यास
फाडिले अफजल खानास तसा
आज सरकार म्हणे त्यास फासी नको.
फाडण्या पुन्हा खानास या
राजे पुन्हा जन्मास या. || २ ||

नाव घेती तुमचे किती, परी
चरित्र कुणा का ना उलगडे तरी?
राजकारण करी, ती नावावरी,
शिकवण्या धडे राजकारणाचे या
राजे पुन्हा जन्मास या. || ३ ||

पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माणास या
मराठि अस्मिता जागविण्यास या
नको बांधणि किल्ल्याची आम्हा आता
माणुस मराठि एकदा जोडण्यास या
राजे पुन्हा जन्मास या. || ४ ||

जाणत्या राजास ला़ख्-लाख मुजरा असो
स्विकारण्या माझ्या मुजर्यास या
राजे पुन्हा जन्मास या.
जन्म घ्या तुम्हि जन्म घ्या
राजे पुन्हा जन्मास या. || ५ ||

----- --- स्वप्निल देमापुरे

स्वराज्य तोरण चढे...

स्वराज्य तोरण चढे...

खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाची अनुष्ठीला , भला देखे

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे !

माय भवानी प्रसन्न झाली
सोनपावली घरास आली
आजच दसरा , आज दिवाळी
चला , सयांनो , अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे !

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाही
नसांतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे !

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे , सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई !
जय जय रघुवीर समर्थ

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी , जय भवानी
दश दिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !!

* कवयित्री - शांता शेळके * संगीतकार - आनंदघन
* मूळ गायक -लता , उषा , मीना , हृदयनाथ मंगेशकर , हेमंतकुमार

जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा , कृष्ण कोयना , भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो , शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला , निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो , महाराष्ट्र माझा
===========================================

कवि - राजा बढे
संगीत - श्रीनिवास खळे
गायक - शाहीर साबळे

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी ,
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधऊन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असेच कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

- सुरेश भट

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।

परोपकाराचीया राशी। उदंड घडती जयाशी।
तयाचे गुण महत्त्वासी। तुळणा कैची ? ।।

यशवंत कीतिर्वंत। सार्मथ्यवंत वरदवंद।
पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।।

आचारशीळ विचारशीळ। दानशीळ धर्मशीळ।
सर्वज्ञपणें सुशीळ। सकळा ठाई।।

या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।।

कित्येक दुष्ट संहारिले। कित्येकास धाक सुटले।
कित्येकास आश्रय जाले। शिवकल्याणराजा।।

- समर्थ रामदास

वेडात मराठे वीर दौडले सात !!!!

वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥

“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥

“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥

- कुसुमाग्रज

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय , जय जय राष्ट्र महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय , माझे राष्ट्र महान
कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान

बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान
तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण
तू संतांची , मतिमंतांची , बलवंतांची खाण
तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान

मातीच्या चित्रात ओतले विजयवंत तू प्राण
मराठमोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान
पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगान
ब्रीद न सुटले झुंझारांचे रणी होता निर्वाण

वज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाषाण !
काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान
मानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान
पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान

* कवी - चकोर आजगावकर * संगीतकार - श्रीनिवास खळे
* मूळ गायक -शाहीर साबळे व समूह

मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा

मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा
नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी , निशाणावरी , नाचते करी ;
जोडी इह पर लोकांसी , व्यवहारा परमार्थासी ,
वैभवासि , वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा , महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या , जिवलगा , महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा , कृष्णा , भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥

कवी -गोविंदाग्रज
संगीतकार - वसंत देसाई
मूळ गायक - जयवंत कुलकर्णी व समूह

बहु असोत सुंदर संपन्न की महा

बहु असोत सुंदर संपन्न की महा

बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥

गगनभेदी गिरिविण अणू न च जिथे उणे
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथील तुरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशया ना दावीणे
पौरुष्यासी अटक गमे जेथ दुःसहा ॥ १ ॥

विलम वैराग्य एक जागी नारती ??
जरी पटका भगवा झेंडाही डोलती
धर्म राजकारण एक समवेत चालती
शक्ति युक्ति एकवटुनी कार्य साधती
पसरे या कीर्ति अशी विस्मया वहा ॥ २ ॥

गीत मराठ्यांचे श्रवणी , मुखी असो
स्फूर्ति रिती धृति ही देत अंतरी ठसो
वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो
देह पडॊ सकारणी ही असे स्पृहा ॥ ३ ॥

कवि - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत - शंकरराव व्यास

कशासाठी करायचा जयमहाराष्ट्र ?

कशासाठी करायचा जयमहाराष्ट्र ?
 
१८ तास वीज नाही त्यामुळे कारखानदारी व्यापार नाही रोजगार नाही
सुंदर मुंबई स्वछ्य  मुंबईची,  बकाल मुंबई बेफाम मुंबई केली आहे
प्यायला पाणी नाही म्हणून विदर्भात दंगे हि आजची बातमी
पण राज्यकर्ते दारू कशी स्वस्त मिळेल या विचारात मग्न .
 
५० वर्षात जातीपाती नष्ट होण्याऐवजी प्रत्येकजण आपण कोणत्या जातीचे ते अभिमानाने मिरवतो ,
सहिष्णुता नष्ट होऊन 
विचारांचा मुकाबला विचारांनी करण्यापेक्षा हाणामारीने करणारे आज नेता बनत आहेत. 
लोकशाही च्या नावाखाली सर्व नेते घराणेशाही राबवीत आहेत ,
माझा मुलगा/मुलगी पुतण्या यापलीकडे जग नाही
महिला आरक्षणाच्या नावावर स्वताच्या बायको /मुलीची काळजी घेतली जात आहे
गुंड तडीपार खून हि नेते (??)मंडळींची ओळख बनली आहे .
 
शिक्षण हे  फक्त श्रीमंतांची मिरासदारी होऊन राहिली आहे 
 
महाराष्ट्रच्या  राजधानीत मराठी फक्त २० टक्के बोलतात
महाराष्ट्रात मराठी भाषा हि इंग्रजी व हिंदी नंतर ३रया  क्रमांकावर आहे 
पण  मराठी भाषेच्या  नावावर गळे काढन्न्यारांची मुले इंग्रजी भाषेत शिकतात कारण ती जागतिक गरज आहे.
बाल मृत्यू चे प्रमाण वाढत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत
गावे ओस पडत आहेत तर शहरांची सूज वाढत  आहे 
नक्षलवाद वाढतो आहे पण त्यावर मार्ग शोधण्या ऐवजी बंदुकीच्या बळावर तो दडपून टाकायला बघत आहेत
साहित्यिक क्षेत्रात मरगळ आहे, क्रीडा क्षेत्रात बोंब आहे, व्यापारात साडेमाडे तीन-चार आहेत  कशी होणार प्रगती?
आपल्या बरोबर निर्माण झालेला गुजरात १६ टक्के जी डी पी वाढ करून खरा सुवर्ण गुजरात बनत असताना  पुणे मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राची  वाढ बिहारपेक्षा देखील कमी आहे पण विचार कोण करतोय ?
५० वर्षानंतर आज महाराष्ट्र ची अवस्था  खालील ' बी' च्या कविते प्रमाणे आहे 
 
तेजाचे तारे तुटले                मग मळेची सगळे  पिकले !
लागती दुहीच्या आगी      राष्ट्राच्या संसाराला ;
अति महामूर पूर येते      ढोग्याच्या  पावित्र्याला ;
खडबडात उडवी जेव्हा       कोरडया  विधीचा मेळा;
                चरकात मान्यवर पिळती
                सामान्य मुकी जनता ती ,
                 लटक्याला  मोले येती ,
कौटिल्य स्वैर बोकाळे !     तेजाचे तारे तुटले  !! 
 
अचारविचारौघाचा             नवनित्य रक्तसंचार
ज्या समाजदेही होता       अनिरुद्ध करीत व्यापार
त्या देहा ठायी ठायी        घट कसले बंध अपार
                 कोंडिले स्वार्थकोंड्यात,
                 जल सडले ते निभ्रांत 
                 तरी धूर्त त्यांस तीर्थत्व 
देऊनी नाडती भोले !            तेजाचे तारे तुटले  !! 
 
कर्तव्य आणि श्रेयाची      हो दिशाभूल जेव्हां ती,
आंधळा त्याग उपजोनी    डोहळे भिकेचे पडती;
अतिरेक पूज्यभावाचे        फुंकिती विवेकेज्योती;
               मग जुन्या अप्तावाक्याते
              भलतिशीच महती येते,
               राणीची दासी होते,
बुद्धीचे फुटती डोळे !           तेजाचे तारे तुटले  !! 
 
घन तिमिरी घोर अघोरी    विक्राळ मसण जागवती;
ती ' परंपरा ' आर्यांची 'संस्कृती' 'शिष्टरूढी' ती;
'धर्मादी' प्रेत झाल्याची बेफाम भुते नाचवती;
सत्तेचे फक्त पुजारी उरले        तेजाचे तारे तुटले  !! 
...
खिन्न मनाने

जय जय महाराष्ट्र माझा...

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या
घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा !!

वेडात मराठे वीर दौडले सात

आपले सेनापति प्रतापराव गुजर याचा एका लढाईत पराभव झालेला असल्याचे महाराजांना समजले आणि रागाच्या भरात त्यांनी प्रतापराव गुजरास पत्र पाठवले.कवितेची सुरुवात शिवाजी महाराजांनी लिहीलेल्या पत्रापासुन झाली आहे. ते पत्र वाचताच प्रताप्राव गुजर यांनी रागाने आपल्या सात साथीदारांसह अब्दुल करीम बहलोल खान याच्या प्रचंड सैन्यावर हल्ला केला. यात ते सातही वीर शहीद झाले. )
(”खरा इतिहास थोडा वेगळा आहे. इछुकांनी माहिती स्वतंत्रपणे घ्यावी”)
“श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपुली वार्ता ,
रण सोडुन सेनासागर आमुचे पळता,
अबलाहि घरोघर खर्या लाजतिल आता,
भर दिवसा आम्हां दिसू लागली रात ”
वेडात मराठे वीर दौडले सात….

ते कठोर अक्शर एक एक त्यातील,
जाळीत चालले कणखर ताठर दील,
“माघारी वळणे नाही मराठी शील,
विसरला महाशय काय लावीत जात?”
वेडात मराठे वीर दौडले सात….

वर भिवई चढली दात दाबती ओठ,
छातीवर तुटली पटबंधाची गाठ,
डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ,
म्यानातुन उसळे तलवारीची पात,
वेडात मराठे वीर दौडले सात….

“जरि काल दाविलि प्रभु गनिमांना पाठ,
जरि काल विसरलो जरा मराठी जात,
हा असा धावतो आज अरि-शिबिरात,
तव मानकरी हा घेवुन शीर करात”
वेडात मराठे वीर दौडले सात….

ते फ़िरता बाजुस डोळे, किंचित ओले,
सरदार सहा सरसावुन उठले शेले,
रिकिबीत टाकले पाय झेलले भाले,
उसळले धुळीचे मेघ सात निमिशात
वेडात मराठे वीर दौडले सात….

आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना,
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना,
छवणीत शिरले थेट भेट गनिमांना,
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात….

खालून आग, वर आग आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्त्र क्रूर ईमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी,
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात….

दगडावर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा,
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा,
क्षितिजावर उठतो अजुन मेघ मातीचा,
अद्याप विराणी कुणी वार्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात….