Showing posts with label मी. Show all posts
Showing posts with label मी. Show all posts

मला कळतच नाही कधी

मला कळतच नाही कधी ,
माझा कुठला रंग आहे,
कधी मी ढगातला कापूस ,
कधी समुद्रातील तरंग आहे.

मला कळतच नाही कधी,
माझ कुठल गाव आहे,
कधी सुखाच्या महालात पडून,
कधी निराशेच्या वस्तीत निभाव आहे .

मला कळतच नाही कधी ,
मला हवे काय आहे ,
कधी नाविन्याचे वेड मला,
कधी जुन्या आठवनीत पाय आहे .

मला कळतच नाही कधी ,
जीवन म्हणजे काय आहे ,
शोध आणि प्रवास नेहमी ,
हेच माझे ध्येय आहे.

लोक माझ्याशी असं का वागतात?

दाखवायला सभेत माझा चेहरा
मनात हिंस्त्र श्वापदं पाळतात
मी चार माणसांत गेलो तर
मलाच भोंदू तोतया ठरवतात

सदरा माझा घालून आपली
ओंगळ चारित्र्य लपवतात
मी घालून फ़िरलो तर घातला
कुणाचा म्हणून हिणवतात
लोक माझ्याशी असं का वागतात?

मेजवानीला प्राणीपक्षी मला
हल-हलाल करायला लावतात
येथेच्छ ताव मारुन संपला की
पाशवी हत्यारा मलाच ठरवतात

दु:ख माझं जड वजनदार म्हणून
बाजारात चढ्या भावाला विकतात
बायकीपणाचं लक्षण म्हणून मग
मला मनसोक्त रडणंही नाकारतात
लोक माझ्याशी असं का वागतात?

एखाद्या निरव भयाण रात्री मग
अवघ्या उशांची अभ्रे भिजतात
माझ्या साऱ्या आशाआकांक्षा
मग तिथेच ऊशाला कुजतात
श्रांत झालेली गलीत शरीर-गात्रं
गाढ निद्रेच्या अधीन होतात

अती-उद्दीप्त तरल जाणिवा मात्र
रात्रभर मन समुळ पोखरतात
सकाळपर्यंत कणखर मनाची
मोठ्ठी वारुळं झालेली असतात
बाहेरुन मोहक दिसली तरी
आतुन पुर्ण पोकळ असतात
लोक माझ्याशी असं का वागतात?

अशात अगोदर मुंग्या नंतर
महाभुजंग रहायला येतात
चिमुकल्या दाहस्पर्शांचे मग
अतीजहरीले सर्पदंश होतात

लख्ख प्रज्वलित संवेदनाच्या
ठिणग्या मग दिवसरात्र उडतात
पाचोळा मनं त्यांची आग लावली
म्हणून मग मलाच वेठीला धरतात
करायला गेलो आत्महत्या तर गुन्हा
ठरवून मरणालाही लाचार करतात

लोक माझ्याशी असं का वागतात? —–

दगडांना मी फ़ुलं समजतो

दगडांना मी फ़ुलं समजतो
परी मी कवि नाही जनांनो
मी एक वेडा दगड मारणांरा
फ़ुलं समझून दगड मारतो.

मृगजळांनी मी भुमी भिजवतो
अख्खं आभाळ डोळ्यात साठवतो
पसरवुन जाळे पाणवट्यावर मी
चद्रंबिबं माझ्या जाळ्यात पकडतो.

स्वप्नांत पिऊन अमृत अमर होतो
मी चद्रांलाही कधी काजवा समजतो
मला ना पारख ना जाण चागंल्याची
समजुन कल्पवृक्ष बाभळीस कवटाळतो.

दोन शब्दांसाठी सारं विश्व धुडांळतो
नाहीच मिळाले तर अक्षंर गुडांळतो
मी कुठे शब्दांचा सौदागर सा-यापरी
सौदागरापुढे शब्दांचा सौदा मदांवतो.

आज मला कोण इथे ओळखतो
कोंण मला या शब्दांत इथे शोधतो
मी तर एक शब्द खूळा खुळ्यातला
माझा शब्दही मला खुळाच ठरवतो

मला काय त्याचे?

पेट्रोल महागणार …
माझ्याकडे गाडीच नाही .. मला काय त्याचे?

ओ.बी.सी. कोटा वाढणार …
माझे शिक्षण झाले … मला काय त्याचे?

जेसिका लालचा खुनी निर्दोष सुटला …
जेसिका माझी कोणीच नव्हती … मला काय त्याचे?

शेअर बाजार पडला …
मी कुठे पैसे गुंतवले होते … मला काय त्याचे?

हिंदू देवतांची विटंबना होतेय …
मी धर्मांध नाही … मला काय त्याचे?

२१ काश्मिरी पंडीतांची गोळ्या घालुन हत्या …
मी काश्मीरी नाही … मला काय त्याचे?

शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव येत नाही …
मी तर नोकरदार आहे … मला काय त्याचे?

सरकार भारताला विनाशाकडे घेऊन जातेय …
आपल व्यवस्थीत चाललय ना … मला काय त्याचे?

आई, शेजारच्या बाई "चोर चोर" ओरडताहेत …
शु.. आपल्याकडे नाही ना आला चोर? … मला काय त्याचे?

या पिढीने मला काय त्याचे म्हणत हात झटकायचे …
पुढच्या पिढीसाठी निष्क्रीयतेचे बीज रोवायचे …
मग ते विषारी वृक्ष फ़ोफ़ावलेले पहायचे …
आमच्या वेळी "हे असे नव्हते" म्हणत नि:श्वास सोडायचे …

मला काय त्याचे मला काय त्याचे …
म्हणत म्हणत जगायचे …
आणि आपले रोजच …
कुढत कुढत मरायचे …

कविताही माझ्या ओसरीला येतील.

कल्पनांचा पूर आता ओसरलाय
आता मला कविता सुचत नाहीत
शब्दच जणू काही हरवलेत माझे
कवितेत ते कुठेच दिसत नाहीत.

कवितेसाठी पुन्हां हा बाधं
या धरणाचा तुटावा लागेल
पुन्हां कल्पनांना पाण्यात
वाहत माझ्याकडे यावं लागेल.

कवितेसाठी पुन्हां माझ्या
पापण्यानां ओल व्हांव लागेल
ओघळल्यावर आसवे माझी
विचारंना त्यात भिजावं लागेल.

भिजण्याच्या भीतीने मग माझे
शब्दही माझ्याकडे परत येतील
आल्यावर पूर कल्पनांचा मग
कविताही माझ्या ओसरीला येतील.

आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा...

ह्या घनघोर अधांराची आज साथ कोणाला
विखूरलेल्या स्वप्नांची मी पहावी वाट कशाला
एक तुझ्या सोबतीचा आधार होता मला
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

मावळत्या सुर्याची ईथे आज आस कुणाला
षितीजाच्या रगांची पहावी कुणी पहाट कशाला
आज तुझीही साऊली हरवली याच साधीप्रकाशात
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

मी दिल्या असख्यं हाका कुणी देईल साद कशाला
किचांळत्या काळजाची कुणी एकेल हाक कशाला
माझ्या सा-या हाका ईथेच विरल्या या वादळांत
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

शोध...

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,
सावलीशिवाय,"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,
सावली नकोस शोधु, ती आपल्या जवळच असते
नजर फक्त मागे वळव, डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

सवयींचे काय, त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.

मी आणि अंधार……….

एकदा मी अंधाराला म्हणालो
तु असा कसा
आणि तुझे अस्तित्व काय
तु सर्वाचा नावडता
मग तु असण्याचं कारणच काय

यावर अंधार उत्तरला,
मीच आहे आंधळ्याची काठी
मीच आहे आंधळ्याचे जग
मीच आहे रात्रीची सोबत
मीच आहे काजव्यांची रग

हो मीच तो,
जो प्रकाशाने साथ
सोडल्यावर धावुन येतो
जो दिवसासुध्दा सावलीरुपाने
तुझ्याबरोबर असतो

मीच आहे जो
वर्षानुवर्षे जुनाट मंदीरात
देवमुर्तीला साथ देतो
मीच आहे जो
तुम्हाला उजेडाचे
महत्त्व पटवुन देतो

असा आहे मी
नसुन असणारा
आणि असुन न दिसणारा……….