Showing posts with label चित्रपट. Show all posts
Showing posts with label चित्रपट. Show all posts

लल्लाटी भंडार ...

नदीच्या पल्याड, आईचा डोंगर (२)
डोंगर माथ्याला, देवीचं मंदिर (२)
घालू जागर जागर, डोंगर माथ्याला (२)
हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)
नदीच्या पाण्यावर, आन्गीण फुटत (२)
तुझ्या नजरेच्या तालावर, काळीज डुलत (२)
नाद आला गं आला गं, जीवाच्या घुंग्राला (२)
हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)
नवसाला पाव तू, देवी माझ्या, हाकला धाव तू
हाकला धाव तू, देवी माझ्या, अंतरी रहावं तू
देवी माझ्या, अंतरी रहावं तू, काम क्रोध अर्पुनी लाव तू
काम क्रोध मर्दुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू
डोळा भरून, तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगर्‍या वाहीन
घुगर्‍या वाहीन, तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली, हळदीच्या अंगाला (२)
हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती हि, जमल्या गं लेकरं
पुनवंचा चांदवा, देवीचा गं, मायेचा पाझर
आई तुझा, मायेचा पाझर, सागर ह्यो, भक्तीचा सागर
खनं नारळानं, ओटी मी भरीन
ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देव्हारा धरीन
देव्हारा धरीन, माझी ओंजळ भरीन
आई सांभाळ सांभाळ, कुशीत लेकराला
आई सांभाळ सांभाळ, कुशीत लेकराला
हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती हि, जमल्या गं लेकरं
पुनवंचा चांदवा, देवीचा गं, मायेचा पाझर
आई तुझा, मायेचा पाझर, सागर ह्यो, भक्तीचा सागर



संगीत : अजय-अतुल
गीत : संजय पाटिल
चित्रपट : जोगवा

जीव दंगला गुंगला रंगला असा.....


जीव दंगला गुंगला रंगला असा

पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

पैलतीर नेशील
साथ मला देशील
काळीज माझा तू

सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनावाचा चांद तू

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

चांद सुगंधा येईल
रात उसासा देईल
सारी धरती तुझी
रुजाव्याची माती तू

खुलं आभाळ ढगाळ
त्याला रुढीचा ईटाळ
माझ्या लाख सजणा
हि काकाणाची तोड माळ तू
खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन
तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचा गोंधळ

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू
===============================================
चित्रपट : जोगवा
स्वर: हरिहरन आणि श्रेया घोशाल
संगीत : अजय अतुल

सांगू?? काय काय व्हायचंय मला

खोवशील ना मला माझ्याही नकळत
तुझ्या वेणीतलं मोगर्‍याचं फ़ुल व्हायचंय मला

भिजशील ना माझ्या अंगणात मनसोक्त
तुला आवडणारी सुखद श्रावणसर व्हायचंय मला

झेलशील ना मला हळूवार अलगद
तुझ्या अळवावरचा टपोरा थेंब व्हायचंय मला

देशील ना मला प्रेमानं आलिंगन
तुझ्या कुशीतली कापसाची ऊशी व्हायचंय मला

सावरशील ना मला नेहमी भरकटताना
तुझ्या साडीचा ढळणारा पदर व्हायचंय मला

शोधशील ना मला नितळ सागरकिनारी
तुला सापडणार्‍या शिंपल्यातला मोती व्हायचंय मला

पुसशील ना मला तुझ्या रुमालाने
तुझ्या गालावरुन ओघळणारा अश्रू व्हायचंय मला

घालशील ना हळुवार प्रेमाची फ़ुंकर
तुझ्या नाजूक तळहातावरला फ़ोड व्हायचंय मला

मन उधाण वा-याचे

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन्‌ क्षणात फिरुनी आभाळाला भिडते !
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते,
कधी गहि-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते !
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते !
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

गीत - गुरु ठाकूर
संगीत - अजय-अतुल
स्वर - शंकर महादेवन
चित्रपट - अगं बाई …. अरेच्चा ! (२००४)