Showing posts with label विनोद. Show all posts
Showing posts with label विनोद. Show all posts

फालतू विनोद

============================================================
फालतू विनोद:
============================================================


============================================================

एकदा ४-५ सरदारजी एका बँकवर दरोडा टाकायला जातात. बँकेचा दरवाजा तोडून आत
गेल्यावर त्यांना दिसतं की बँकेत पैसे नाहीएत पण रेड वाईन च्या भरपूर
बाटल्या आहेत. ते खुश होऊन शक्य तेवढं पितात आणि उरलेल्या बाटल्या बरोबर
घेऊन जातात.
.
....
.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी येते:
.
.
.
"Blood Bank" वर दरोडा!



============================================================


पहिला मित्र: ४ दिवस महाबळेश्वर ला चाललोय रे...

....रस्त्यात बायकोला दरीत लोटून देणार आहे...
...
दुसरा मित्र: सही...माझी पण घेऊन जा, तिलापण दे ढकलून..

पहिला मित्र: hmm ... तिला येताना टाकतो


============================================================


आई: अरे सुहास ऊठ. तुला कॉलेजला जायचे आहे ना?
सुहास: आई मी आज कॉलेजला नाही जाणार
आई: सुहास तुला जावच लागेल
सुहास: नाही मी नाही जाणार
आई: मला दोन कारणे सांग तुला का नाही जायचं
सुहास: सगळी मुलं माझा राग करतात. सगळे शिक्षकही माझा राग करतात
आई: चल ऊठ आणि तयार हो
सुहास: मला २ कारणे सांग,मी कॉलेजला का जावं
आई: १: तुझं वय आता ५५ वर्षे आहे आणि २: तू कॉलेजचा प्राचार्य आहेस


============================================================


एक स्त्री तिच्या नवऱ्याला म्हणते..." अहो ही जेनी कोण आहे हो ?'

नवरा ..(थोडासा घाबरत )..." अगं जेनी हे एका कुत्र्याच्या पिल्लूचे नाव आहे....आपण लवकरच ते विकत घेणार आहोत..."

बायको..." असं होय...अहो त्या कुत्रीचा सकाळपासून ५ वेळा फोन येऊन गेला तुमच्यासाठी "...


============================================================


Sentimental PJ : लाईट बिल खूप जास्त आल्यामुळे चिडून आई पिटूला ओरडत असते ....

आई: काय रे, एवढं बिल कसं काय आलं? सारखे का लाईट चालू ठेवतोस???

पिटू: यूँ तो मैं बतलाता नहीं.....पर अँधेरे से डरता हूँ मैं माँ !!!! तुझे .. सब है पता है ना माँ ?



============================================================


प्रेम होतं का करावे लागते---
मुलगी सुंदर आणि Honda activa वर असेल तर होते..
आणि Honda City चालवत असेल तर करावे लागते

============================================================



एक मुलगा कर्वे रोडवरून प्रचंड जोरात गाडी चालवत होता....एक माणूस त्याला म्हणतो ..."काय कर्वे ??".....
तो मुलगा गाडी स्लोव करून म्हणतो.." माझे आडनाव कर्वे नाहीये ..."
तो माणूस : " मग बापाचा रस्ता असल्यासारखा गाडी का चालवतोस ??"


============================================================


एक सिंहाने जर तीन वेळा डरकाळी फोडली ................तर त्या नंतर काय होईल......................................
.तुम्हाला माहित आहे.......आठवा ....आठवा......
अरे simple ......
.............TOM & JERRY चालू होईल

============================================================

भिकारी आणि जोशी काका
भिकारी: साहेब काहीतरी खायला द्या.चार दिवस उपाशी आहे.
जोशी काका: थांब हा.बघतो घरात काही आहे का खायला. [पाच मिनिटानी] तुला एक दिवस शिळी पोळी-भाजी चालेल?
भिकारी: [आनंदाने] होय साहेब .चालेल की.
जोशी काका: ठीक आहे मग उद्या दुपारी याच वेळेला ये. आज ठेवून देतो उद्यासाठी

============================================================

एक भिकारी जोशी काकांना : मालक एक रुपया द्या.....तीन दिवसापासून काही खाल्ले नाही ....
जोशी काका (खोचकपणे) : अरे ३ दिवसापासून उपाशी आहेस तर मग एक रुपयाचं काय करशील ?
भिकारी तेवढ्याच खोचकपणे: वजन करून बघेन किती कमी झालंय ३ दिवसात


============================================================


एकदा रवींद्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू आणि जयप्रकाश नारायण एका बोटीतून जात होते ....
अचानक वादळ येतं आणि बोट बुडते (कुणालाच पोहता येत नसतं) ..बाकी २ जण बुडतात पण फक्त रवींद्रनाथ टागोर वाचतात ...
का ?????...........................................
कारण ......................................................................
.त्यांना वाचायची आवड असते

============================================================

पप्याचे बाबा FTV बघत असतात..अचानक पप्या येतो तर परिस्थिती सांभाळण्यासाठी ते म्हणतात...अरे गरीब मुली आहेत या....कपडे घेण्यासाठी पैसे नसतात यांच्याकडे... तर पप्या म्हणतो..."यांच्यापेक्षा अजून गरीब मुली आल्या तर मला पण बोलवा..."

============================================================

एक मुलगा आपल्या मित्राना आग्रहाने घरी घेउन आला....
म्हणाला तुम्ही बसा मी चहा घेउन येतो ...... . . . . .
10 मिनीटा नंतर ....... . . .
चला ....घेतला मी चहा.

============================================================

एक पोपट ट्रक ला धड़कला ......अणि बेशुद्ध झाला ......
ट्रक मालकाने त्याला घरी नेउन पिंजर्यात ठेवले ..........
शुद्धीवर आल्यावर पोपट: "च्या मायाला डायरेक्ट जेल !!!! ड्राईवर मेला की काय ?



============================================================

करीअर कथा ...


|| करीअर कथा ||
बारावीचा निकाल | मग सीईटीचा परीक्षाकाळ |
परीक्षांचा झाला सूकाळ | आता ठाई ठाई ||१||

इंजिनीअरिंग का मेडिकल | जाणावा आपुला कल |
पडताळावे इतर सकल | विषय आणि पर्याय ||२||

शिक्षणाचे मार्ग सगळे | पर्याय अनेक वेगळे
जे आपणा न कळे | तज्ञांना विचारावे ||३||

बारावी नंतर काय | प्रश्न करती वडील माय |
आहे यावर उपाय | फक्त मुलांची आवड ||४||

बाळाचे पाय पाळण्यात दिसती | उक्ती अनुभवी सांगती |
त्याची घ्यावी प्रचिती | मुलांच्या भल्यासाठी ||५||

आवडीचे क्षेत्र निवडावे |   तसेच मार्गदर्शन करावे |
मुलांचे भले पाहावे | प्रथम त्यांच्या आवडीत ||६||

आपली आवड कशात | जाणून त्या विषयांत |
मेहनत करावी त्यांत | मुलांनी प्रगतीसाठी ||७||

प्रसिध्द खेळाडू किती | यशस्वी ते उद्योगपती |
त्यांनी केली प्रगती | आवडीच्या विषयांत ||८||

जी आपली आवडी | त्यात घेतली आघाडी |
ते क्रिकेट खेळगडी | फक्त बारावी पास ||९||

गुण असती उपजत | त्यांनाच घालावे खत |
नाही येणार आफत | भविष्यात चिंतेची ||१०||

आवडीच्या विषयात | थोडीच पुरते मशागत |
विषय होईल अवगत | पटकन लवकर ||११||

गायक सुरात नाहले | नायक अभिनयात मुरले |
नर्तक तालात नाचले | आनंदात सुखेनैव ||१२||

चित्रकार चित्रात रंगले | शिल्पकार शिल्पात घडले |
कलाकार कलेत रमले | जातीचे कलावंत ||१३||

आवडीच्या विषयात करता कष्ट | आळस होतो नष्ट |
आलेख दिसतो स्पष्ट | उज्ज्वल भविष्याचा ||१४||

काही चालती धोपट मार्गे | काही धावती झटपट मार्गे |
नका जाऊ आडमार्गे | पैसा आणि प्रगतीसाठी ||१५||

जपावी नैतिकता | निवडा आवडीची उद्योजकता |
नेटाने कष्ट करता | प्रगती आहे निश्चित ||१६||

कोणी करती चर्मोद्योग | कोणी करती कुटीरोद्योग |
करावा असाच उद्योग | मराठी माणसाने ||१७||

निर्णय नसावा अयोग्य | विचार करावा सुयोग्य |
शिक्षण निवडा स्वयोग्य | आवडीच्या विषयात ||१८||

छंद विषयांत नाही ताप | कामाचा नाहीच संताप |
शक्य होते करणे प्रताप | दडपणाशिवाय ||१९||

काम होईल झटपट | उत्साहात छान पटापट |
वाटणार नाही कटकट | आवडीच्या विषयाने ||२०||

आवड असता नाही डोकेफोड | बोलता येईल फडाफड |
प्रश्नांची उत्तरे सडेतोड | देता येतील सदैव ||२१||

आयुष्य सरेल छान मस्त | मन राहील आनंदे चुस्त |
काम होता बिनधास्त | सूर सापडेल प्रगतीचा ||२२||

काम जमता निश्चित | भविष्य नसेल अनिश्चित |
जीवन प्रवाह विनाखंडित | पार पडेल सुरळीत ||२३||

क्षेत्र आवडीचे निवडावे | पदवीस प्राप्त करावे |
प्राविण्य पुढे मिळवावे | प्रयत्ने सातत्याने ||२४||

करिअरची होता घटट मुळे | जीवन वृक्ष फुले फळे |
जीवन अवघे उजळे | समस्त कुटुंबियांचे ||२५||

करिअर कथा वाचावी | तशीच लोकांस सांगावी |
कथेची प्रचिती घ्यावी | सर्व विद्यार्थ्यांनी ||२६||