कठिण असते...

प्रश्न विचारणे सोपे असते
पण उत्तर देणे कठिण असते

प्रेम करणे सोपे असते
पण प्रेम निभावणे कठिण असते

स्वप्न बघणे सोपे असते
पण स्वप्न पूर्ण करणे कठिण असते

दुख: देणे सोपे असते
पण दुख: पचवणे मात्र कठिण असते

घर तोडणे सोपे असते
पण नव्याने ते उभारणे कठिण असते

एखाद्याला उपदेश देणे सोपे असते
पण त्याप्रमाणे स्वत: वागणे कठिण असते.

शूरांच्या कथा ऐकणे सोपे असते
पण त्यांच्यासारखे लढणे कठिण असते

देवाकडे मागणे सोपे असते
पण देवाला काही देणे कठिण असते

सारचं थोड कठिण,थोड सोपे असते
कुठचा मार्ग स्विकारायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते

आयुष्य म्हणजे ...

आयुष्य म्हणजे
१ संध्याकाळ, ४ मित्र, ४ कप चहा,
१ टेबल..

आयुष्य म्हणजे
४ गाड्या, ८ मित्र, सुट्टे पैसे,
१ मोकळा रस्ता..

आयुष्य म्हणजे
एका मित्राचं घर,
हलका पाउस,
आणि पत्ते ..

आयुष्य म्हणजे
कॉलेजचे मित्र,
बंक केलेले lec. तिघात १ वड़ापाव आणि
बील वरून भांडण..

आयुष्य म्हणजे
फ़ोन उचलल्यावर मित्राची शीवी,
आणि सॉरी बोलल्यावर,
आणखी एक शीव..

आयुष्य म्हणजे
३० वर्षानंतर अचानक जुन्या मित्राचा १ sms,
धुळीत पडलेला फोटो आणि,

डोळ्यात अश्रु !

तू ...

तू

नदीकाठी वाळूवर चंदेरी
लाटांनी लहरत लोळण घ्यावी
फुलपाखराने फुलावर बसावे अलगद
तसा तू कधी जवळ आलास कळलेच नाही....

कुठे दूरवर अनोळखी तू
भिरभिरत होतास कुठल्या प्रदेशात
पण कधी नकळतच
स्पर्श करून गेलास कळलेच नाही....

नव्हती कधी दृष्टभेट
नव्हता जाणवला तुझा हवेतला दरवळ
पण मनाचा मनाशी
कधी संवाद घडला कळलेच नाही .....

मनात सतत गुंजारव
तुझ्या शब्दलहरींचा
सतत तरंगत राहणारी
तुझ्या आठवणीची वलय ....

अशा अनोळखी मनांची
कशी होते ओळख
आणि अवचित कशा
होतात गाठीभेटी कळतंच नाही....

एवढे मात्र कळते आहे
काहीतरी घडते आहे
मनाच्या कानाकोपर्यात
काहीतरी निनादाते आहे ....

संगीताची सुरावट, रंगांचे फटकारा
किंवा मनावर ओठांची फुंकर
डोळ्यापुढे काही तरळते आहे
हृदयात काही उमलते आहे.....