तिने कित्ती सुंदर दिसावं........

तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं..!!!!

तिने कित्ती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं ..
सोबत तिच्या..!!!!

तिने कित्ती साधं रहावं ..
त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..
अदांवर तिच्या..!!!!

तिचं उदास होणं..
कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं..
अश्रूंनी तिच्या..!!!!

तिचं हसणं ..
कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..!!!!

तिच्या नजरेने मलाच शोधावं..
अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
लाजेने चूर चूर व्हावं..!!!!

ती समोर असताना ...
मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं..
मी 'हाय हाय' करत घायाळ व्हावं ..!!!!

तिने फक्त माझंच रहावं..
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..!!!!

बाप

बापावर एक कविता लिहतो
माझ्या मनात विचार आला
माझाच बाप नजरेसमोर
कधी नव्हे तो मी धरला
माझा बापच नेहमी मला
माझा कट्टर शत्रु वाटला
म्हणून त्याच्या स्तुतीत एकही
शब्द कधी सहज नाही लिहला
माझा बापच इतरांच्याही
बापांचाही एक आदर्श ठरला
बाप असावा तसाच माझा
बाप नजरेत माझ्या झाला
बाप फक्त बाप सदाच असतो
म्हणून आपण कमी लेखला
आई पुढेच महानतेला
त्याच्या आपण कमी तोलला
बापच सदैव उपेक्षित तो
साहित्यातही कसा राहिला
झालेळ्यांना बाप कदाचित
बापच अजुन नाही कळला

आयुष्य सुंदर आहे

आयुष्य सुंदर आहे
मित्रा,
खरंच आयुष्य सुंदर आहे

सुर्य जेव्हा आकाशात
तळपत असतो रागाने ,
इवलसं फ़ुल सांगतं त्याला
"पहा पण प्रेमाने !"

ढग जेव्हा दु:खी होतात
आणि बरसू लागतात धारा!
ढगाच्या दु:खावर तेव्हा
फ़ुंकर घालतो वारा !

चंद्र एकटाच पडतो आकाशात
दर्दभरी गात गाणी !
चांदण्या चमकत सोबत करतात
उत्साहाची भरुन वाणी!!

पानं, फ़ुलं, झाडं सारी
तुझ्यासाठीचं गात आहेत,
ओढे, नद्या, नाले, सागर
तुझ्यासाठीच वहात आहेत !

खरंच आयुष्य सुंदर आहे,
बघ जरा डोळे उघडून !
बघ एकदा तरीही
आनंदाचं गाणं गाऊन !!

मी जसा आहे, तसा आहे

सिंह भासे मी कुणा केंव्हा
श्वानही बोले कुणी केंव्हा
बोलती कोणी ससा आहे
मी जसा आहे, तसा आहे

जे कुणा बोलायचे बोलो
जे कुणा वाटायचे वाटो
(मोकळा त्यांचा घसा आहे!)
मी जसा आहे, तसा आहे

रोखली माझी मुळे त्यांनी
तोडल्या फांद्या जरी त्यांनी
अंबरी माझा ठसा आहे!
मी जसा आहे, तसा आहे

कोष मी फोडेन दंभाचा
गर्भ मी जाणेन सत्याचा
घेतला हाती वसा आहे
मी जसा आहे, तसा आहे
खरंच आयुष्य सुंदर आहे..!!!!! ...............