ती आली online की.....

सारंच Zing Zang होतं
ती आली online की
माझा पीसी Hang होतो
मनात कससंच होवून
सारंच Zing Zang होतं

कितीही Alt+Ctrl+Delete केले
तरी Task manager येत नाही
हैराण होतो Refresh करून
Restart चं नावच घेत नाही

Hard disk चा वेग वाढतो
कसले कसले आवाज काढतो
writer सारखा eject होतो
Pen drive पण reject होतो

काय सांगू तुम्हाला
सारी system fail होते
Virus घुसतो अचानक
त्याची आपली रेलचेल होते

काय म्हणता तुम्ही,
मी online येणे बंद करायचं....?
अहो मग मी.....
तिच्या शिवाय कसं जगायचं....??

अहो Hang च होतोय ना
काय फरक पडतो.....?
तिच्यामुळेच तर माझ्या
PC चा ह्रदय धडधडतो

chatting काही होत नाही
वाटतं आपलंच Ram कमी होतं
मनात कससंच होवून
सारंच Zing Zang होतं.........सारंच Zing Zang होतं.......!!

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते…………

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
मन चांदण्यात न्हावुन निघते
आशेच्या पावासाळी सरीने
डोळ्यातले स्वप्न मग चिंब भिजते
माझ्या मनातल्या कोरया कॅनवास वर
तुझं चित्र मग आपोआपच उमटते

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
जणु श्रावणातली पहीली सर बरसते
तुझ्या आठवणींच्या सरीने
कोमेजलेल्या या मनाच्या रोपाला
मग नवी पालवी फ़ुटते
रात्रीच्या गर्द काळोखी आभाळातली
शांत चांदणी जणु पुन्हा चमकते
माझी नजर मग
त्या चांदण्यातही तुलाच शोधिते

कधी कधी तर वाटते की जाऊदे
तु नाही तर तुझी आठवण तरी येते
कमीत कमी माझं उदास मन थोडंतरी हसते

स्वप्न आणि सत्य

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा. दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे!."