मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कंदिलाच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती

''संस्कार''

का कळत नाही पण हली मन थोड कठोर झाल आहे
प्रेम या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झाला आहे प्रेम प्रेम प्रेम बस झाल आता,
अरे एखादी गोष्ट आपली होणारच नाही. मग त्या गोष्टीचा विचार कराव का ?
तिला हि माहिती आहे कि ती माझी होऊ शकत नाही. मला हि माहिती आहे कि मी तिचा होऊ शकत नाही.
दोघांची गत अशी झालेली आहे.


जसा आळवाच पान आणि त्यावर पाण्याचा थेंब. स्पर्श होऊ शकेल पण एकजीव उभ्या जन्मात नाही.

माझ्या मनातल्या भावना तिच्या मनात कधीच पोहचल्या आहेत.आणि तिच्या मनातल्या हि भावना माझ्या मनात पोहोचल्या आहेत. दोघांच्या हि भावनेत प्रेम आहे. हे दोघांना माहिती आहे . आणि या भावना स्पष्ट का होत नाही. नाही ते कधीच होणार नाही. त्या मागे एकाच कारण असाव

दोघानाही एकाच बंधनात जखडून ठेवलं आहे. ते म्हणजे..... .
''संस्कार''...................!!!!!.

तुला परत यायचं असेल तर

महात्म्या, तुला परत यायचं असेल तर,

तुझी ती अहिंसा तेथेच ठेवुन ये.
कारण आज तिला आमच्याकडे काहीच किंमत नाही
आज अहिंसेला आम्ही अडगळी शेजारी जागा दिलीय,
कारण अहिंसा म्हणजे आज फक्त गांधीवाद्यांची झालीय...

अहो गांधीवादी तरी कसले ते...?
नुसते गांधीवादी म्हणवुन घेणारे,
आणि अंधारात सत्तेसाठी...
सत्त्यासाठी नव्हे महात्म्या, सत्येसाठी!
अंधारात सत्तेसाठी पाठीत खंजर मारणारे,
आणि डळमळत्या खुर्चीला...
पडण्याआधी तारणारे.
हे आजचे अहिंसावादी...
हे आजचे गांधीवादी.
म्हणुन अहिंसा नको.

आणि हो, तो सत्याग्रह तरी कशाला आणतोस?
कुणाचे ग्रह हलणार आहेत त्यानं?
कुणाचे विचार बदलणार आहेत त्याने?
महात्म्या, ते प्रेम ही नकोस आनू
दोन दिवसात पार बो-या वाजेल त्याचा,
आजच्या स्पर्धेच्या युगात.
कारण, आज आम्ही धावण्याची शर्यत...
प्रेमाने नाही तर पायात पाय घालुनच जिंकतो...
आणि हो, आम्ही कुणाचं भलं करु...
अशी आशाही आमच्याकडुन करु नकोस,
कारण तिथच तर आम्ही शिंकतो
म्हणुन प्रेम ही नको.

आणि महात्म्या ती, करुणा आणि शांती,
ती तर नकोच नको.
गांधीवादाचे पुरस्कर्ते म्हणुन ठेवली होती...
हीच नावे आम्ही आमच्या मुलींची
पण तीही त्यांनी कधीच बदललीत,
आजच्या आधुनीक युगात 'सुटेबल'
होत नाहीत म्हणुन

तेंव्हा आता यायचं असेल तर,
सत्त्यासोबत असत्त्यालाही घेऊन ये.
आता चरखा नकोय ...
एखादी गन घेऊन ये,
महात्म्या तु जरुर ये.... पण येताना,
आमच्या सारखंच पांढरपेशी मनही घेवुन ये!