गायत्री मंत्र

ऒम भूर्भुव: स्व: ऒम तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि ।
धियोयोन: प्रचोदयात
------------ --------- --------- --------- --------- --------- --------- ---
अर्थ:
विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो.
तोच सच्चिदानंदरुप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो.
तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो. त्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो.
आमची सत्कर्म -सद्विचार-सदाचार-सद्माषण
सद्वर्तनाकडे प्रवृत्त होवोत.

जय जय महाराष्ट्र माझा...

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या
घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा !!

मराठा ...

होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!

असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.
ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला".

दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.

घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.

घाम गाळून नांगर ओढणाऱ्या नवऱ्याची साथ फक्त हीच स्त्री देवू शकते अऩ भरसकाळी रांगोळी हिच्याच हाताने सजते.

इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.

आणि हे बदलण्याची ताकत आहे "मराठयांच्या मनगटात"