सप्तसुरांची उधळण करीत…
सुरांगणा घेवूनी आली..
चातकासारखी वाट पाहत होतो आम्ही..
अन तु तर एक श्रावणसरी सारखी चिंब बरसली…
हसणं तुझं आहे कीती अवखळ..
गालावर पडते ती त्याचीच सुंदर खळ..
तुझं वागण आहे किती सरळ..
जशी मत्स्यकन्या पाण्यामधे हळुवार तरळ…
नयन तुझे किती आहे प्रेमळ..
एकटक पाहता मग पडते तुझी भुरळ..
अशी आहेस तु जशी तळ्य़ात..
लाटांवर डोलते राजहंसिनी निर्मळ…
तुझ्या मधुर वाणीचे
करावे तितके कौतुक कमीच
हळुवार पुटपुटलीस जरी..
त्याला लाभलीये मधाची गोडी भारी…
मनं तुझं आहे खुप उदार
देतेस आपल्या परीने तु इतरांना आधार…
तुझ्या या चांगुलपणाचा..
होतो सगळीकडे जय जयकार..
गर्वाला तुझ्या दुनियेत ..
काडीमात्र स्थान नाही…
प्रेमाचं रान मात्र
कुठेही रिकामं नाही…
अशी आहेस तु..
सुखाचे करतेस दान भरभरुन
अन दु:खाचे डोंगर मात्र
सहन करतेस स्वत:हून…
प्रेम, महत्व आणि प्रशंसा
प्रेम, महत्व आणि प्रशंसा
प्रेम विसरलं की विसरतं
प्रेम पसरलं की पसरतं
आपल्या बायको किंवा प्रेयसीला
आपल्या जवळ घ्यावं
डोळ्यात डोळे घालून, हसून
तिला एखादं फूल द्यावं
बघा तिचा चेहरा कसा उजळतो
बघा तिच्या वागणूकीत,
कसा फरक पडतो
कुणी आपल्याला चांगलं म्हटलं
की कसं आपल्याला बरं वाटतं
आशावेळी खोटं बोललं तरी
आपल्या हृदयाला कसं खरं वाटतं
सुंदरातल्या सुंदर मुलिला महत्व दिलेलं आवडतं
मुलगा हुशार नसला तरी त्याला महत्व दिलेलं आवडतं
मोठ्या माणसांना प्रशंसा नको
हा फारच चुकीचा समज आहे
अन्न, छत आणि वस्त्रासारखी
महत्व ही प्रत्येका माणसाची गरज आहे
जे कठोर शब्दाने होत नाही,
ते कोमल शब्दाने होतं
प्रेम, महत्व आणि प्रशंसा पसरल्याने
बघा कसं जग बदलतं
प्रेम विसरलं की विसरतं
प्रेम पसरलं की पसरतं
प्रेम विसरलं की विसरतं
प्रेम पसरलं की पसरतं
आपल्या बायको किंवा प्रेयसीला
आपल्या जवळ घ्यावं
डोळ्यात डोळे घालून, हसून
तिला एखादं फूल द्यावं
बघा तिचा चेहरा कसा उजळतो
बघा तिच्या वागणूकीत,
कसा फरक पडतो
कुणी आपल्याला चांगलं म्हटलं
की कसं आपल्याला बरं वाटतं
आशावेळी खोटं बोललं तरी
आपल्या हृदयाला कसं खरं वाटतं
सुंदरातल्या सुंदर मुलिला महत्व दिलेलं आवडतं
मुलगा हुशार नसला तरी त्याला महत्व दिलेलं आवडतं
मोठ्या माणसांना प्रशंसा नको
हा फारच चुकीचा समज आहे
अन्न, छत आणि वस्त्रासारखी
महत्व ही प्रत्येका माणसाची गरज आहे
जे कठोर शब्दाने होत नाही,
ते कोमल शब्दाने होतं
प्रेम, महत्व आणि प्रशंसा पसरल्याने
बघा कसं जग बदलतं
प्रेम विसरलं की विसरतं
प्रेम पसरलं की पसरतं
मैत्री
काही नाती जपावी लागतात
काही नाती मानावी लागतात
कितीही उसवली तरी पुन्हा पुन्हा विणावी लागतात..
पण मैत्रीचं असं नसतं..
कारण ते नातं असतचं मुळी अखंड एकसंध
त्याला ना सुरुवात ना शेवट..
तरीही पुर्ण ह्र्दय व्यापून उरणारं..
त्याला ना लागते सुई ना दोरा…
तरीही घट्ट विणलेलं…
एक एक टाका विणून लोकरीची मऊ ऊबदार शाल विणावी,
तितकीच मायेची ऊब देणारं हे नातं..
आभाळाइतकं अथांग,
सागराइतकं विशाल,
शब्दाविनाही भावना सांगणारं,
अन आयुश्य़भर साथ देणारं हे नातं,
जसं तुझं नी माझं….
Subscribe to:
Posts (Atom)