उमेद

हिमालयाची उत्तुंग शिखरेही
सतत खुणवायची तेव्हा,
आता, लिफ्टशिवाय
तिसरा मजलाही पर्वत वटतोय..

मोकळ्या रानावरचा सोसाट्याचा वाराही
अंग-प्रत्यंग फुलवून टाकायचा तेव्हा,
आता, लपेटलेल्या शालीतून
पंख्याचं वारं ही झोम्बतेय..

उधाणलेल्या समुद्राचा तळही
सहज गवसायचा तेव्हा,
आता, ‘थंड पाण्याने आंघोळ’
हा विचारही हुडहुडी भरवतोय..

आभाळाला गवसणी घालणारीही
स्वप्नं होती या डोळ्यात,
आता, जीवनाचे ध्येयही
अन्न-वस्त्र-निवार्‍यापुरतेच उरलेय..

तेव्हा, तरुण होतो मी
आता, म्हातारा झालोय मी
पण नक्की कशाने
वयाने की मनाने??

0 comments: