आठवण
आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसू लागलो
खोटं खोटं हसताना
कळलेच नाही कधी रडू लागलो
अश्रूंचा झरा
मी प्रयत्न करतो स्वतःला
कशात तरी रमविण्याचा
ओघळणार्या अश्रूंचा झरा
काही काळ तरी थंबविण्याचा
अशक्य
तुला विसरणं खरंच
आता अशक्य आहे
माझा भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ ही
तुझ्याच आठवणिने भरला आहे
ओळी
माझ्या ओळीच सांगतील तुला
मी किती असह्य जगतोय
तुझ्या शिवाय जगताना
क्षणो क्षणी मरतोय
दूरावा
आता नाही सहन होत हा दूरावा
एकदा तरी परत ये
एकदाच परत येवून
कायमचं जवळ घे
राहून गेलं
तुझ्या मिठीतील सुखं
पचवायचं राहून गेलं
तू कायम मिठीत रहा
हे सुचवायचं राहून गेलं
दुःख
फ़ुलण्या आधीच खुडल्यावर
कळ्यांना ही दुःख होतं
स्वप्न अर्धचं राहिले की
आपल्याला ही ते कळतं
भिंती
माणसांपेक्षा मला
घराच्या भिंतीच जवळच्या वाटतात
मी काही ही बोललो तरी
त्या शांतपणे ऐकून घेतात
दरी
माणसं नेहमी उंचावर जाण्याचा
प्रयत्न करीत असतात
उंचावर जाताना मात्र
खोळ दरी ही निर्माण करतात
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment