तसे तुम्ही सगळे माझेच म्हणा !
पण तरीही..
कधी कधी तुमची माया
इतकी आक्रमक होते..
की माझ्यावर चोहोबाजूंनी
चालून येते.
माझे विकार, विचार, भावना -
माझे सारे मौन..
प्रत्येकाचं स्पष्टीकरण मागते !
माझ्या क्षणांवर, कणांवर -
अनियंत्रीत स्वामीत्व गाजवते !
अशा वेळी नाइलाजाने
मी मला माझ्यात कोंडून घेतो !
तसे तुम्ही सगळे माझेच म्हणा…
पण तरीही….
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment