मित्रांनो

मित्रांनो ,

मी इ - मेल करतो ,
याचा अर्थ असा नाही ,
मला काही काम नाही ;
कामात फोन करुन
व्यत्यय टाळण्यासाठी ,
इ - मेलसारखे दुसरे साधन नाही

मी हसत असतो
याचा अर्थ असा नाही ,
माझं डोकं जाग्यावर नाही ;
दु : खाचे प्रदर्शन करुन ,
सांत्वनाचे शब्द मिळवण्यापेक्षा ,
हसत राहणे वाईट नाही


मी सुखात असतो
याचा अर्थ असा नाही ,
दु : खात मी होरपळलो नाही ;
दुसऱ्याला दु : खात खेचण्यापेक्षा ,
एकट्याने होरपळणे चुकीचे नाही

सर्वांची खिल्ली उडवतो ,
याचा अर्थ असा नाही ,
मला त्यांच्या भावनांची कदर नहीं ;
खोटी समजूत घालून ,
मर्जीत राहण्यापेक्षा ,
खिल्ली उडवणे वाईट नाही


कट्ट्यावर टपोरिगिरी करतो ,
याचा अर्थ असा नाही ,
की प्रेम मला समजत नाही ;
प्रेम करुन कुणाला फसवण्यापेक्षा ,
कट्ट्यावर शिट्ट्या मारणं ,
टपोरिगिरीचे लक्षण नाही


पीजे मारून हसवतो ,
याचा अर्थ असा नाही ,
की मला परिस्थितीचे गांभीर्य नाही ;
तणाव निर्माण करण्यापेक्षा ,
पीजे मारून हसवण्यात ..
काही गैर नाही ....

याचा अर्थ असा नाही
की मला काही काम नाही ..
-

ह्रदयाच्या पुस्तकात......

ह्रदयाच्या पुस्तकात......
किती पटकन तू बोललीस विचार कर तुला सारे सोडून का गेले
तुला ठऊक होते सारे तरी तुला बोलावेसे असे का वाटले
माणसांच्या गर्दीत तुझा किती विश्वास मला वाटला
तुझ्या मनाची जागा हा मला विसाव्याचा कट्टा वाटला

पण क्षणात तू मला परकेपणाची जाणीव करून दिली
मैत्रीच्या रेशीम धाग्यात पहिलीच गाठ परकेपणाची बांधली

रंग मला हवे होते पण कधीही मी हिसकावून नाही घेतले
आनंदाच्या झाडाची फुलेही मी कधीच मजसाठी ओरबाडून नाही घेतली

सहज जी झाडावरून पडली तिच फुले मी वेचली
ह्रदयाच्या पुस्तकात जपून सारी ठेवली

पण तू ती फुले ही जाता जाता घेऊन गेलीस
ह्रदयाच पुस्तक तुझ्यासाठी रिकाम झाल खरं
पण तुझ्या बोटांचे ठसे तुझ्याही नकळ्त
तू कायमचे माझ्या ह्रदयाच्या पुस्तकात कायमचे ठेऊन गेलीस..............

जिवलग मित्र...

हाच तर जिवलग मित्र असतो...
कोल्ड ड्रिंक मधे दारू मिसळवतो
टाईट झाल्यावर उशिरा रात्री घरी सुखरूप सोडतो
१ दिवस फोन नहीं केला तर रागवतो
फोन केला तरीही शिव्या घालतो
समोरून एखादी फाकडू पोरगी जात असेल तर
तिच्या समोर मस्त पोपट करतो
कॉलेज ला आल्यावर पहिला कॉल आपल्याला करतो
कुठे आहेस म्हणुन विचारतो
पिकनिक ला जाताना
आई बाबांना हाच तर मस्का लावायला कामी येतो
बाइक वरून पडलो की सगळे हसत असताना
धावत येउन उचलतो
आपण विसरलो तरीही
वाढदिवशी १२ वाजता बरोबर मेसेज करतो
परिक्षेच्या वेळी
सुपरवायज़रला घाल चुलीत म्हणुन सप्प्लिमेंट हातात देतो
काही चुकले तर ओरडतो
गरज असेल तर कान पीळतो
इतर मित्रांच्या तुलनेत
आपली जास्त काळजी घेत असतो
हाच असतो जो
आपल्या कली रूपी आयुष्याला फुलवत नेत असतो
हाच असतो जो
आपल्या कृष्ण-धवल आयुष्यात रंगांची उधलन करत असतो
दुखात असताना.. जवळ येउन काय झाल..? म्हणुन विचारतो
आपण नजर खाली करून काही नाही म्हणुन त्याला टाळतो
आपल्या डोळ्यात बघून
काय रे एवढा परका झालो का..? असा उलट प्रश्न करतो
सुखात हक्काने पार्टी मागणारा
आणि दुखात रडायला खांदा देणारा हाच तर जिवलग मित्र

स्वामी तिन्ही जगाचा...

स्वामी तिन्ही जगाचा...
’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.

चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई

शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’

ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे

गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला

येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे

अदा...

(त्याला झालाय उशीर.. मनवतोय तिला कसाबसा…)

तोः तु मृगनयनी असे,तु मनमोहिनी
का वेडविशी तु मला तु स्वप्नी येवुनि ?
तीः मी ना तुला पाहिले,ना भेटले येवुनी
मग कोण विचारे कुट तु, तु मला अडवुनी?

तोः जे भेटले सहज तुला सहज जे भेटले
सोडीशी का सहज ते,सहज भेटले म्हनुनी?
तीः मी ना अशी वागले,वागते ना अशी
वागले जरी तरी कोण तु विचारीशी?

तोः ना विचारु मी तुला , ना स्मरे धागे जी गुंफली?
वद विसरलिस माला शपथ शिरी घेवुनी…
तीः(जरा गोंधळुन)मी ना शपथ घेणार का शपथ घेवु मी?
सर्व स्मरते मला ,विना शपथ घेवुनी.

तोः(जरा विचार करुन)वाटते अदा मला तुझी अदाच वाटते
का कुट विचारुन तु हासे ओठ् दाबुनी?
तीः(लटक्या रागाने)थकले आज् थांबुनी,थकले वाट पाहुनी
मग का पिडू ना तुला ,कुट हे विचारुनी?

तोःक्शन दोन थांबलीस जरा,थांबली क्शन घेवुनी ,
काय नभ बरसले इथे अन् गेले तुज् भिजवुनी?
तीः ना नभ बरसले इथे ,ना गेले मला भिजवुनी
घायाळ मी घायाळ रे इथल्या हरएक नजरांनी !

तोः(गुढघ्यावर…कान पकडुन्..)
पुन्हा आज झुकतो नमतो पुन्हा आज मी..
चल विहरण्यास चल,ना आढेवेढे घेवुनी

देता का थोडेसे शब्द उसने !!

सांगायला माझ्या जिवाचे दुखणे
देता का थोडेसे शब्द उसने !!

मी शब्द जपून वापरले
कधीच केले नाहीत वायफळ खर्च
तरीही आज मागावं लागतय कर्ज

मी शब्दांची केली पूजा
पण जेव्हा आला परतफेड करायचा मोका
तेव्हाच नेमका दिला यांनी मला धोका

आवडत नाही मला शब्दांचे रूसणे
देता का थोडेसे शब्द उसने !!

सुखात शब्द साथ देतात
प्रेमातही बरोबर असतात
आज दु:खातच शब्द तोटके पडले
आज माझे मन एकटेच रडले

गायला हे रडगाणे
देता का थोडेसे शब्द उसने !!

परत करीन मी तुम्हाला हे शब्द
शब्द फुटत नाहीत, रडूच फुटतय
शब्द गेल्यामुळे जीव तीळ-तीळ तुटतोय

आज शब्दबध्द करायला रडणे
देता का थोडेसे शब्द उसने !!

उमेद

हिमालयाची उत्तुंग शिखरेही
सतत खुणवायची तेव्हा,
आता, लिफ्टशिवाय
तिसरा मजलाही पर्वत वटतोय..

मोकळ्या रानावरचा सोसाट्याचा वाराही
अंग-प्रत्यंग फुलवून टाकायचा तेव्हा,
आता, लपेटलेल्या शालीतून
पंख्याचं वारं ही झोम्बतेय..

उधाणलेल्या समुद्राचा तळही
सहज गवसायचा तेव्हा,
आता, ‘थंड पाण्याने आंघोळ’
हा विचारही हुडहुडी भरवतोय..

आभाळाला गवसणी घालणारीही
स्वप्नं होती या डोळ्यात,
आता, जीवनाचे ध्येयही
अन्न-वस्त्र-निवार्‍यापुरतेच उरलेय..

तेव्हा, तरुण होतो मी
आता, म्हातारा झालोय मी
पण नक्की कशाने
वयाने की मनाने??

सांगू?? काय काय व्हायचंय मला

खोवशील ना मला माझ्याही नकळत
तुझ्या वेणीतलं मोगर्‍याचं फ़ुल व्हायचंय मला

भिजशील ना माझ्या अंगणात मनसोक्त
तुला आवडणारी सुखद श्रावणसर व्हायचंय मला

झेलशील ना मला हळूवार अलगद
तुझ्या अळवावरचा टपोरा थेंब व्हायचंय मला

देशील ना मला प्रेमानं आलिंगन
तुझ्या कुशीतली कापसाची ऊशी व्हायचंय मला

सावरशील ना मला नेहमी भरकटताना
तुझ्या साडीचा ढळणारा पदर व्हायचंय मला

शोधशील ना मला नितळ सागरकिनारी
तुला सापडणार्‍या शिंपल्यातला मोती व्हायचंय मला

पुसशील ना मला तुझ्या रुमालाने
तुझ्या गालावरुन ओघळणारा अश्रू व्हायचंय मला

घालशील ना हळुवार प्रेमाची फ़ुंकर
तुझ्या नाजूक तळहातावरला फ़ोड व्हायचंय मला

कॉलेजमध्ये असताना

एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..

वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति

कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली

आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास

मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?

तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.

मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..

ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु...?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु...

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास
युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास

तुमचं काही…माझं काही

मी वेगळ्या लहरीत कविता करतो
तुम्ही वेगळ्याच लहरीत कविता वाचता
मी माझे विचार कवितेत भरतो
तुम्ही तुमच्या जिवनाशी संदर्भ शोधता
मी माझ्या स्वार्थासाठी कविता करतो
तुम्ही कवितेला तुमचा अर्थ देता

म्हणूनच म्हणतो की,

मी एकांतात कविता करतो
तुम्ही एकांतातच वाचाव्या
एकांतात वाचता वाचता
वेग-वेगळ्या अंगाने पहाव्या

माझ्या कविता आहेत,
विचारांकडे जाण्याचे विमान….यात बसाल का?
या आहेत,
न संपणारी दलदल….यात फसाल का?

आहेत कविता दुरध्वनिसारख्या,
आवाज ऐकू येतो पण
विचार कळतातच असे नाही
शब्द हलके-जड कळतात
भावनांचा उतार-चढाव कळतोच असे नाही

शेवटी काय….भाषा सोडा,
विचारांकडे तेवढे लक्ष द्या
मला तसे कमीच समजते
तुम्ही मात्र समजून घ्या!

जा जा जा दिले दिले मन तुला

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…॥धृ॥

फुल मनाचे खुडून…दिले तुझिया हातात
ठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत
देठ पिकल्या फुलांना..देठ पिकल्या फुलांना…
भय निर्माल्याचे नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥१॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

तुला द्यावे मन.. असे काही कारण नव्हते…
एवढेच म्हणू आता, तुझ्या नशिबात होते..
पडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..
ज्याला दिसतच नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥२॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

मनाविण जगताना, वाटे मलाही बरेच
आता दुःख-बिख नाही..वाटे आश्चर्य सखेद
मला एक मन भारी..मला एक मन भारी..
तुला दोन्ही जड नाही..
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥३॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

- संदिप खरे, आयुष्यावर बोलु काही

जीवन म्हनजे हे असचं असतं

कुनाचं बरोबर कुनाचं चुक
सर्वांना इथे प्रेमाचीच भुक
प्रेमाच्या अडीच शब्दामधुन
उभ्या जन्माचं नातं जुळत असतं
कारन जीवन म्हनजे हे असचं असतं

दु:खाशी नातं येथे जन्मताच जुळते
सु:खाची भेट मात्र क्वचितच घडते
तरिही क्वचितच्या या भेटीसाठी
मनं सतत झुरत बसतं
कारन जीवन म्हनजे हे असचं असतं

अपयशाचे कडु घाव मनं कित्येकदा झेलत असतं
आयुष्यातल्या खाचा-खळग्यात पडुन ते ठेचत असतं
तारि आशेच्या मागे वेडं मनं सतत धावत फ़िरतं
कारन जीवन म्हनजे हे असचं असतं

व्यवहारी या दुणियेत मानसं
मानुसकी विसरुन जगतात
मुखवट्यांच्या गर्दिमधे
भावनांचा लिलाव मांडतात
तरि मायेच्या कनभर ओलाव्यासाठी काळिज तडपत असतं
कारन जीवन म्हनजे हे असचं असतं

दोन तत्वज्ञानी आणि प्रेम……..

इथे एवढंच सांगण्याचा निरपेक्ष प्रयत्न आहे की दोन तत्वज्ञानी लोकांची तत्वंच कशी काय त्यांच्या प्रेमाआड उभी राहतात..आणि मग प्रेमाविन ते संपुन गेल्यावर फ़क्त तत्वंच शिल्लक राहतात……….

दोन तत्वज्ञानी आणि प्रेम……..

अतोड तटबंदी भेदुन,
एका झुळुकेचं येणं झालं
वाडा चिरेबंदी पाहुन
सर्वत्र फ़िरण्याचं मन झालं,

गावासाठी तो होता
एक महाल आलिशान
पण आतुन फक्त तो होता
एक खंगलेलं रान

एक कस्तुरकुपी तिथली
हळुच तिने लकटली
सुगंधात मुग्ध न्हाली
वाड्यात इतरत्र फ़िरु लागली

वाडाही आता बहरुन
आनंदविभोर झाला होता
काळाच्या झोपेतुन उठुन
नंदकिशोर बागडला होता

तटबंदीने आजपर्यंत
बरीच प्रलयं रोख़ली होती
पण आज एका लहरीपुढे
ती नतमस्तक झाली होती

झुळुक विचार करु लागली
वाड्याला वेडा ठरवु लागली
स्वत:च्या भानात हरवु लागली
त्याला स्वाभिमान नाही हिणवु लागली

माहीत नव्हते बिचारीला
वाड्यानं काय काय झेललं होतं
सगळ्यातुन स्वत:ला वाचवुन
कशासाठी असं जपलं होतं

गुमान ती त्याला दुर्लक्षिली
पुढल्या वेळी हळुच दुरुन गेली
तिच्या वागण्याने तटबंदी आनंदली
पण वाड्याच्या आत ख़ळबळ माजली

बाहेरुन आलंच जर वादळ तर
ती तटबंदी उभी होती पण
आत उठलेल्या वादळासाठी
मात्र काही काहीच नव्हतं

झुळुकेविन ‘ख़ंगला वाडा’
आता पुर्णच मोडला होता
गर्वापायी त्या झुळुकेनं मात्र
एक नवा पायंडा पाडला होता…

कारण आता वाडा तिच्यापायी
झुरण्यासाठी उरलाच नव्हता
उरली होती ती फ़क्त
फ़क्त ती ख़ुश तटबंदी………………

चार ओळीतलं दुःख

आठवण
आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसू लागलो
खोटं खोटं हसताना
कळलेच नाही कधी रडू लागलो

अश्रूंचा झरा
मी प्रयत्न करतो स्वतःला
कशात तरी रमविण्याचा
ओघळणार्या अश्रूंचा झरा
काही काळ तरी थंबविण्याचा

अशक्य
तुला विसरणं खरंच
आता अशक्य आहे
माझा भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ ही
तुझ्याच आठवणिने भरला आहे

ओळी
माझ्या ओळीच सांगतील तुला
मी किती असह्य जगतोय
तुझ्या शिवाय जगताना
क्षणो क्षणी मरतोय

दूरावा
आता नाही सहन होत हा दूरावा
एकदा तरी परत ये
एकदाच परत येवून
कायमचं जवळ घे

राहून गेलं
तुझ्या मिठीतील सुखं
पचवायचं राहून गेलं
तू कायम मिठीत रहा
हे सुचवायचं राहून गेलं

दुःख
फ़ुलण्या आधीच खुडल्यावर
कळ्यांना ही दुःख होतं
स्वप्न अर्धचं राहिले की
आपल्याला ही ते कळतं

भिंती
माणसांपेक्षा मला
घराच्या भिंतीच जवळच्या वाटतात
मी काही ही बोललो तरी
त्या शांतपणे ऐकून घेतात

दरी
माणसं नेहमी उंचावर जाण्याचा
प्रयत्न करीत असतात
उंचावर जाताना मात्र
खोळ दरी ही निर्माण करतात

तसे तुम्ही सगळे माझेच म्हणा !

तसे तुम्ही सगळे माझेच म्हणा !
पण तरीही..

कधी कधी तुमची माया
इतकी आक्रमक होते..
की माझ्यावर चोहोबाजूंनी
चालून येते.

माझे विकार, विचार, भावना -
माझे सारे मौन..
प्रत्येकाचं स्पष्टीकरण मागते !

माझ्या क्षणांवर, कणांवर -
अनियंत्रीत स्वामीत्व गाजवते !

अशा वेळी नाइलाजाने
मी मला माझ्यात कोंडून घेतो !

तसे तुम्ही सगळे माझेच म्हणा…
पण तरीही….

हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे....

उचलूनी देह ताठ नयनांतून आग ज्यांनी ओकली
क्रौर्यतेच्या राक्षसांची मान पराक्रमाने छाटली
फळ आज उपभोगतो ज्यांच्या शर्थ प्रयत्नांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे.

स्वप्नभरारी ज्यांनी वास्तवात आहे घेतली
क्षणोक्षणी मोहमाया देशासाठी लाथाडली
सुख इतरांना देण्या दुःख जे स्वतः विसरले
माणूसकी जपण्यास ज्यांनी आयुष्य सारे वेचले
व्हावे नतमस्तक फक्त नाव घेता ज्यांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे.

कोण मी, जन्मलो का हे स्वतःस ज्यांनी विचारले
नुसतेच नाही पूर्वजांच्या पुतळ्यांस सलाम ठोकले
विचार ज्यांचे अस्त्र अन व्यक्त होण्या धमक आहे
यौवनाचा रंग ज्यांच्या रक्त जैसा लाल आहे
जाणूनी पुरुषार्थ जाणीवेने पेटले ऊर ज्यांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे.

निरक्षरता भ्रष्ट आचार अन जातीपातीची घाण
जाणूनी मूल्ये ज्यांनी फडकवले बंडाचे निशाण
शिकवण्या दुसऱ्यास आधी ज्यांनी स्वतः नियम पाळले
वादळाचे घर ज्यांनी स्वतःत आहे बांधले
मुक्त होण्याचे स्वप्न पाहण्या नयन आहेत समर्थ ज्यांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे….!

अशी असते ती मैत्री…

मैफ़लीत रंगून जाते ती गायत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा या लक्षात या गोष्टी
माझ्याशी सुद्धा कराल ना तुम्ही गट्टी??

असे कुणाशी नकळत नाते जुळून जाते

असे कुणाशी नकळत
………नाते जुळून जाते

चिंब होऊन ओली माती
…….. पाऊस गाणे गाते

गुंता मनमनांचा की
……..ईश्वर-साक्ष रेशीमगाठी

स्वप्नासाठी दिव्याचा
……….प्रकाश होऊन जळते वाती

गंध असा हा
……….काट्याचेही होऊन जावे फ़ूल

नात्यांसाठी जगताना
……स्वतःलाच पडावी स्वत:ची भूल

मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते

मी चालत आसताना पाय अचानक थांबतात
कुठुन तरि ओळखीचे शब्द काणी पडतात
ह्र्दयाचे ठोके ही हळुहळु वाढतात
मन आणी ङोळे दोघं ही मागं वळुन पहातात
त्या आशेच्या नजरेने मागं वळुन पहाताना
मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते

त्या दीवशी मी जरा जास्तच घाईत होतो
गदी असताना ही ट्रेन मध्ये शीरलो होतो
अचानक कुणीतरी ओळखीचं वाटलं
तोच तो चेहरा पाहील्या सारखं भासलं
उशीर झाला तरी चुकीच्या स्टेशनवर उतरताना
मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते

नको असतानाही मीत्र फ़ीरायला घेवुन जातो
एकांत हवा असतो पण मैत्री पुढे ईलाज नसतो
वीसरता यावं तुला म्हणुन मी हि त्या गदीत शीरतो
शोधतो त्या मानसांत एखादा ओळ्खीचा चेहरा
त्या लाखोंच्या गदीत ही मी एकटाच फ़ीरताना
मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते

दीवसा उजेडात स्वतःला सावरताना
सायंकाळी सुर्य अस्ताला जाताना
रोज रात्री जागरन करताना
पांघरुन घेवुन अश्रु ढाळताना
जेव्हा मी स्वतःलाच जळताना पाहतो
तेव्हा ही मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते.

फक्त तू नकोस मला...

फक्त तू नकोस मला
साथही तुझी हवी आहे
शांत
स्थळी एकांतवेळी
प्रीत तुझी हवी आहे

शृंगार प्रेम नको मला
वात्सल्य
प्रेम हव आहे
सांजवेळी सूर्यास्ताला
प्रेमगीत हव आहे

दवबिंदू
नकोत मला
रिमझिम पाऊस हवा आहे
रानफुलाला सुखावणारा
गार वारा हवा
आहे

फक्त शब्द नकोत मला
अर्थ त्यातला हवा आहे
तिमिरातून
तेजाकडचा
मार्ग त्यातून हवा आहे

सृष्टी सारी नको मला
द्रुष्टी
तुझी हवी आहे
तुझ्या डोळ्यात दिसणारा
विश्वास मला हवा आहे

तुझा
दुरावा नको मला
सहवास तुझा हवा आहे
खचनाऱ्या माझ्या मनाला
आधार
तुझा हवा आहे

क्षण तुझे नकोत मला
प्रत्येक क्षणी तू हवी आहेस
वेळ
तुझी नको मला
वेळीस तू हवी आहेस

काळजातुन धबधबा घोंघावतो दिनरात आहे

झिंगलेल्या यात्रिकाला वादळाची साथ आहे
शोधला नाही कधी कोठे नदीचा काठ आहे

शीड फ़ुगलेले असे भरदार छाती फ़त्तरी
दोरखंडासारखा पिळदार तोही ताठ आहे

येऊ दे ज्वालामुखी लाव्हा किती अंगावरी
मार्ग त्याने आखलेलाही ‘तसा’ भन्नाट आहे

आडवा येईल जो होईल पुरता आडवा
हीच त्याच्या पौरुषाने बांधली खुणगाठ आहे

मागतो तुमच्याकडॆ त्याची विनंती खास ही
पिंगळावेळेस सांगा ‘माझीही तुज साथ आहे’

झेप घे गरुडा तुझा तू वाढ्वी रे हौसला
जो कुणी ना जिंकला चढणार तू तो घाट आहे

नाम गुम जाये तो जाये काय पर्वा काळजी
काळजातुन धबधबा घोंघावतो दिनरात आहे

तूच सांग, मी काय कारण देऊ??

सांगून गेलास निघुन दूर देशी तू,
येईन मी परत नको तू खंतावू
झाली कित्येक वर्ष त्याला,
थकले मी,किती रे वाट पाहू?
जग मला विचारतंय नाना प्रश्न
मी काय उत्तर देऊ?

जेवताना रोजच लागतो ठसका,
साऱ्या आप्तेष्टांची नावं घेऊन संपली,
रोज नवीन नाव कुणाचं घेऊ?
आठव तुझा रोज, दाटून कंठ येतो,
मग नाहीच येत अश्रू आवरता मज
कितीदा डोळ्यात कुसळ नाही तर
कांदा लागल्याचं कारण देऊ?

असते आजकाल दर आठवड्याला वधू परिक्षा
मिसळंत आसवाचं खारट पाणी चहा देताना
बिघडते चव,करतात सगळेच मग त्रागा
“आमची होशील का?” प्रश्न भर-सभेत होता
सर्वस्व वाहिलेलं तूला मी काय उत्तर देऊ?

विरह असह्य होतो, प्राण कंठाशी येतो,
निघते सरळ मग कडेलोटाला, फ़िरते
माघारी वचन तुला दिलेलं आठवताना
“काय कुठून आलीस?” होता प्रश्न मला
कारण “निसर्ग पहायला गेले होते” असं देऊ ?

ज्ञानेशाची विरहिणी मी, नाही येत
माझी व्यथा चार ओवींमधे सामावता
लिहिते रोजनिशी गर्भित शब्द येतात मदतीला
विचारलंच स्पष्टिकरण तर कुणाला काय देऊ ?

उरली-सूरली आशाही संपली, जेव्हा तुझ्या करता
तेवत ठेवलेली पणती परवाच्या वादळात विझली
मृत्यूला कवटाळताना शेवटी तुझं की इश्वराचं नाव घेऊ?
भेटशील ना रे तिथे तरी की आसमंती भटकत राहू?