मन उदास उदास...

मन उदास उदास
आर्त पुकार कोणास
हे कसले आभास
का चांदणे पेटले?

सारा हल्लोळ कल्लोळ
आज लागलेय खूळ
कुणा आठवणींचे रान
आज अश्रूंनी पेटले?

रात हंबरून येते
दाटे काळोख उरात
चिंब भिजले कागद
असे कवितांनी पेटले

सखे तुझ्या दारी
त्याची आलिये वरात
माझं स्वप्न हळवं सुखद
हिरव्या चुड्यात पेटले.

0 comments: