काल पुन्हा स्वप्नात आलीस

काल पुन्हा स्वप्नात आलीस
जीवनात माझ्या येशील का
डोळयांच्या नशिल्या प्याल्यात
स्वतःला हरपु देशील का

काळ्याभोर केसांशी खेळत
पावसात फ़िरायला येशील का
केसात माझा चेहरा लपवुन
सुगंधात हरपु देशील का

इवल्याशा नाकावर राग येऊन
वाट पहात थांबशील का
मी उशीर केला म्हणुन
माझ्याच कुशीत रडशील का

ओठांच्या दोन पाकळ्या उघडुन
माझे तु नाव घेशील का
“इश्श” म्हणुन चेहरा लपवत
डोळ्यांनी तुझ्या हसशील का

कवितेमध्ये माझ्या गुंतुन
स्वप्नात नव्या हरपशील का
एक-एक माझे स्वप्न वाचुन
सत्यात ते उतरवशील का

0 comments: