कशासाठी करायचा जयमहाराष्ट्र ?
१८ तास वीज नाही त्यामुळे कारखानदारी व्यापार नाही रोजगार नाही
सुंदर मुंबई स्वछ्य मुंबईची, बकाल मुंबई बेफाम मुंबई केली आहे
प्यायला पाणी नाही म्हणून विदर्भात दंगे हि आजची बातमी
पण राज्यकर्ते दारू कशी स्वस्त मिळेल या विचारात मग्न .
५० वर्षात जातीपाती नष्ट होण्याऐवजी प्रत्येकजण आपण कोणत्या जातीचे ते अभिमानाने मिरवतो ,
सहिष्णुता नष्ट होऊन
विचारांचा मुकाबला विचारांनी करण्यापेक्षा हाणामारीने करणारे आज नेता बनत आहेत.
लोकशाही च्या नावाखाली सर्व नेते घराणेशाही राबवीत आहेत ,
माझा मुलगा/मुलगी पुतण्या यापलीकडे जग नाही
महिला आरक्षणाच्या नावावर स्वताच्या बायको /मुलीची काळजी घेतली जात आहे
गुंड तडीपार खून हि नेते (??)मंडळींची ओळख बनली आहे .
शिक्षण हे फक्त श्रीमंतांची मिरासदारी होऊन राहिली आहे
महाराष्ट्रच्या राजधानीत मराठी फक्त २० टक्के बोलतात
महाराष्ट्रात मराठी भाषा हि इंग्रजी व हिंदी नंतर ३रया क् रमांकावर आहे
पण मराठी भाषेच्या नावावर गळे काढन्न्यारांची मुले इंग्रजी भाषेत शिकतात कारण ती जागतिक गरज आहे.
बाल मृत्यू चे प्रमाण वाढत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत
गावे ओस पडत आहेत तर शहरांची सूज वाढत आहे
नक्षलवाद वाढतो आहे पण त्यावर मार्ग शोधण्या ऐवजी बंदुकीच्या बळावर तो दडपून टाकायला बघत आहेत
साहित्यिक क्षेत्रात मरगळ आहे, क्रीडा क्षेत्रात बोंब आहे, व्यापारात साडेमाडे तीन-चार आहेत कशी होणार प्रगती?
आपल्या बरोबर निर्माण झालेला गु जरात १६ टक्के जी डी पी वाढ करून खरा सुवर्ण गुजरात बनत असताना पुणे मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राची वाढ बिहारपेक्षा देखील कमी आहे पण विचार कोण करतोय ?
५० वर्षानंतर आज महाराष्ट्र ची अवस्था खालील ' बी' च्या कविते प्रमाणे आहे
तेजाचे तारे तुटले मग मळेची सगळे पिकले !
लागती दुहीच्या आगी राष्ट्राच्या संसाराला ;
अति महामूर पूर येते ढोग्याच्या पावित्र्याला ;
खडबडात उडवी जेव्हा कोरडया विधीचा मेळा;
चरकात मान्यवर पिळती
सामान्य मुकी जनता ती ,
लटक्याला मोले येती ,
कौटिल्य स्वैर बोकाळे ! तेजाचे तारे तुटले !!
अचारविचारौघाचा नवनित्य रक्तसंचार
ज्या समाजदेही होता अनिरुद्ध करीत व्यापार
त्या देहा ठायी ठायी घट कसले बंध अपार
कोंडिले स्वार्थकोंड्यात,
जल सडले ते नि भ्रांत
तरी धूर्त त्यांस तीर्थत्व
देऊनी नाडती भोले ! तेजाचे तारे तुटले !!
कर्तव्य आणि श्रेयाची हो दिशाभूल जेव्हां ती,
आंधळा त्याग उपजोनी डोहळे भिकेचे पडती;
अतिरेक पूज्यभावाचे फुंकिती विवेकेज्योती;
मग जुन्या अप्तावाक्याते
भलतिशीच महती येते,
राणीची दासी होते,
बुद्धीचे फुटती डोळे ! तेजाचे तारे तुटले !!
घन तिमिरी घोर अघोरी विक्राळ मसण जागवती;
ती ' परंपरा ' आर्यांची 'संस्कृती' 'शिष्टरूढी' ती;
'धर्मादी' प्रेत झाल्याची बेफाम भुते नाचवती;
सत्तेचे फक्त पुजारी उरले तेजाचे तारे तुटले !!
...
खिन्न मनाने
0 comments:
Post a Comment