आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा...

ह्या घनघोर अधांराची आज साथ कोणाला
विखूरलेल्या स्वप्नांची मी पहावी वाट कशाला
एक तुझ्या सोबतीचा आधार होता मला
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

मावळत्या सुर्याची ईथे आज आस कुणाला
षितीजाच्या रगांची पहावी कुणी पहाट कशाला
आज तुझीही साऊली हरवली याच साधीप्रकाशात
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

मी दिल्या असख्यं हाका कुणी देईल साद कशाला
किचांळत्या काळजाची कुणी एकेल हाक कशाला
माझ्या सा-या हाका ईथेच विरल्या या वादळांत
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

1 comments:

Unknown said...

खरंच खूप सुंदर आणि विचार करायला लावणारी शब्द रचना आहे. मी स्तब्ध आहे. यावशब्दातील एकटे पण आणि त्यातील दुःख सरळ सरळ लक्षात येते.या छोट्याशा पण अप्रतिम रचनेला सलाम.