दु:ख

लहरत गेले झाड धुक्यातून
अन हसले आभाळ जरासे
थेंब दवाचे असे थबकले
अन फसले आभास जरासे..

तळ्याकाठची रानकेतकी
झुके तळ्याशी उगीच जराशी
रुप न्याहाळता डोहामधले
थरथरले थेंब जरासे..

उगीच हसणे रुसणे उगीचच
कारणाविना अन मुसमुसणे
गीत स्वरांचे ओथंबलेल्या
ऐकुनि थांबले पक्षी जरासे..

ती येता मग गर्द सावली
डोहामध्ये अंधार साचला
स्मितांच्या प्रतिबिंबाखालून
एक जन्मले दु:ख जरासे..

उद्या जगेन...

उद्या जगेन उद्या जगेन म्हणून आजवर मरत राहीलास
न पाहीलेल्या भविष्यासाठी वर्तमानात झरत राहीलास
सागं कधी जगलास का ते उद्याच जिवन तु आजवर?
आजही तेच करतोस जे आयुष्यभर करत राहीलास

मर मर मरुन उद्यासाठी तु खूप काही केलंस
तो उद्या आलाच नाही तु तुझ्यासाठी काय केलस?
आज भुतकाळाच्या जखमा पाहून का रडतोस तु
सुखासाठी हजारदा मन मारलस हे तु काय केलस?

एक दिवस तरी सागं जेव्हा नव्हता दु:खाचा चोप
आठवतय का कधी मिळाली शेवटची साखर झोप
अरे तो दिवस आलाच नाही ज्याची तु वाट पाहीलीस
आठवतय का कधी केलीस अखेरची मन मौज

तु म्हणतोस जे केलं त्यामुळे मी आजवर जगलो
आणी एवढ करुनही आजवर ही नाही मी थकलो
घरासाठी दारासाठी संसारासाठी मी खुप काही केलं
हा माझ्यासाठी मी आजवर काही नाही करु शकलो.

आयुष्यभर धावलास तु न पाहीलेल्या उद्यासाठी
तु राहीलास उपाशी नाही केलास आराम जीवासाठी
सागं हा जिवनाचा खेळ होता का नशिबाचा तमाशा
तु जगलास खरा पण कोणासाठी आणि कशासाठी?

सोडणांर आहेस त्या जगासाठी की तुला विसरणा-या घरासाठी
कपाटातल्या तिजोरीसाठी का त्या पोष्टातल्या खात्यासाठी
आता तरी सागं कशासाठी जगलास तु आजवर बोल?
हातातल्या काठीसाठी की डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी
बघ आजही तरी तुला चीतां पुन्हां त्या उद्याची
चदंनाच्या लाकडाची आणि शुद्ध वनस्पती तुपाची.

PMT मधली अप्सरा

एकदा “PMT” मध्ये प्रवास करतांना
एक सुंदर गोड अप्सरा मला दिसली
CONDUCTOR च्या सीट वर ती
कोप-यात एकटीच होती बसली

मोकळी जागा पाहुन मी
माझी “तशरिफ” तेथेच ठेवली
मला पाहताक्षणीच तिने
आपली पर्सच उचलुन ठेवली

उघडया खिडकितुन वारा
तसा फ़ारच जोरात येत होता
तिच्या ओढनीला माझ्या चेह-यावर
हळुवार उडवीत होता

ती मात्र ओढनी सावरत सावरत
स्वत:शीच गुनगुनत होती
नकळत दोघातील अंतर कमी करन्यासाठी
मला हाथभार लावत होती

बसमधला प्रत्येक प्रवासी
आमच्याकडेच बघत होता
मी तेथुन केव्हा उठेल
बहुतेक याचीच वाट पहात होता

तेवढ्यात बसच्या धक्क्याने
आमच्या दोघांतील अंतर कमी केले
एका मिनीटासाठी का होईना
मला स्वप्नाच्या दुणियेत नेले

मग दुस-या धक्क्यालाच मी
स्वप्नातुन बाहेर आलो
एक मिनिटातच तिच्यासमवेत
बरीच काही लाईफ़ जगुन गेलो

येवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला
लेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला
तेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला
स्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला

मग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी
ती तीची PURSE सावरायला लागली
गर्दित मला खेटत खेटत
स्वत:ची वाट काढु लागली

खाली उतरताच माझी नजर
एकटक तिला शोधु लागली
ती मात्र BOYFRIEND च्या गाडीवर बसुन
केव्हाचीच हवेशी बोलु लागली

आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते
आम्हाला आवडलेली रानी
जेव्हा तेव्हा “ENGAGE” च असते

काल पुन्हा स्वप्नात आलीस

काल पुन्हा स्वप्नात आलीस
जीवनात माझ्या येशील का
डोळयांच्या नशिल्या प्याल्यात
स्वतःला हरपु देशील का

काळ्याभोर केसांशी खेळत
पावसात फ़िरायला येशील का
केसात माझा चेहरा लपवुन
सुगंधात हरपु देशील का

इवल्याशा नाकावर राग येऊन
वाट पहात थांबशील का
मी उशीर केला म्हणुन
माझ्याच कुशीत रडशील का

ओठांच्या दोन पाकळ्या उघडुन
माझे तु नाव घेशील का
“इश्श” म्हणुन चेहरा लपवत
डोळ्यांनी तुझ्या हसशील का

कवितेमध्ये माझ्या गुंतुन
स्वप्नात नव्या हरपशील का
एक-एक माझे स्वप्न वाचुन
सत्यात ते उतरवशील का

मन आणि बुद्धी

मन आणि बुद्धी
एकाच आईची दोन मुलं
नाते सख्ख्या भावंडचे
पण वागणे मात्र सावत्रपणाचे

एकाने भावना जपायच्या
तर दुसर्‍याने तार्किकता
एकाने अलगद वाहवत जायचे
तर दुसर्‍याने कर्तव्य-कठोर व्हायचे |१

एकाने हळुवार प्रेमाच्या
गोड स्वप्नात रमायचे
तर दुसर्‍याने वास्तवाच्या
चिमट्यांनी जागे करायचे |२

एकाने वार्‍यासारखे
सतत चंचल वागायचे
तर दुसर्‍याने मेरूपर्वतासारखे
अढळ रहायचे |३

‘एकमेकांवर नित्य कुरघोडी’
दोघांचा हा विचित्र स्वभाव
स्वत:ची श्रेष्ठता जपण्याचा
निरर्थक असा अहंभाव |४

यांच्या या झगड्यात
आपणच भरडले जातो नेहमी
तरीही नाही ठरवू शकत
बुद्धी महान की मन हुकमी |५

भावनेचे सामर्थ्य मनाचे
तर निर्णयक्षमता बुद्धिची
एवढेच समजतं माझ्या सरळ-साध्या बुद्धिला
आणि भोळ्याभाबड्या मनाला….. |६

माझ्यावरील रूसवा सोडून माझ्या जवळीच येना

माझ्यावरील रूसवा सोडून माझ्या जवळीच येना
माझ्या मनातल्या चांदण्यांना तुझ्या ओंजळीत घेना
माझ्यावरील रूसवा सोडून माझ्या जवळीच येना

झाल्या असतील अक्शम्य चुका माझ्याकडून
पण प्रेमात वाटेवर चालताना होतात ह्या चूकून
माझ्या ह्या वेडेपणाला तु मला माफ़ तरी करना
माझ्यावरील रूसवा सोडून माझ्या जवळीच येना

तु जवळ असता वाटे जग स्वर्ग हे सारे
माझ्यापासून दूर व्हावे आणि स्मशान झाले सारे
माझ्या त्या मुर्ख वागण्यास विसरून तरी जाना
माझ्यावरील रूसवा सोडून माझ्या जवळीच येना

एकटाच पाहतो आहे तो सुंदर किनारा
तुझ्याविना वाटे तो सुंन्न किनारा
तुझ्या मनातील वादळाला शांत तरी करना
माझ्यावरील रूसवा सोडून माझ्या जवळीच येना

चार पेग घेता घेता काल रात्र झाली !

चार पेग घेता घेता काल रात्र झाली !
घरी पुन्हा पत्नी वाही शिव्यांची लाखोली ! ॥धृ॥
आम्ही गोड शब्दांची त्या आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी ?
कडू कारल्याच्या जिभेवरी जर पखाली ! ॥१॥

रोज घाव करिते पत्नीची जिह्वा कट्यारी;
रोज वंश सासरचा ती समूळऽ उद्धारी !
आम्ही गप्प ऐकत असतो आमुची खुषाली ! ॥२॥

अंत:पूर केले आहे बंद आम्हासाठी
ओसरीवरी ती धाडे निजावयासाठी !
आम्ही ते पती की ज्यांना बायको न वाली ! ॥३॥

उठा-बशा काढत काढत संपल्या उमेदी !
असा कसा झालो माझ्या घरी मीच कैदी ?
मी अपार दु:खी, माझी चालली हमाली ! ॥४॥

उभा फ्लॅट झाला आता एक बंदिशाला
जिथे सिंह ताटाखालिल मनी-माऊ झाला !
कसे पुरुष दुर्दैवी अन्‌ स्त्रिया भाग्यशाली ! ॥५॥

धुमसतात अजुनी उदरी भुकेचे निखारे !
अजुन अन्न मागत उठती रिक्त पोट सारे !
दूषणेच पत्नीची ती आम्हाला मिळाली ! ॥६॥

बरसतात ’खोड्या’वरती जिभेचे निखारे !
अजुन रक्त काढत बसती शब्द बोचणारे !
आम्ही महिषरूपी राक्षस; भासते ती काली ! ॥७॥

आठवणींचे जग

आठवणींचे जग किती अनोखं
गुंतलो एकदा की खरं जग पारखं

सापडतो कधी सानपणचा चॉकलेटचा बंगला
गावाच्या मध्यभागी असणारा अमुचा इवलसा इमला

डोळ्यांपुढे सरकते मास्तरांची छडी
मित्रांसोबत चोरुन पेरु खाण्यातली गोडी

भेटतात आईवडिलांगत प्रेम करणारे शिक्षक
टिळकांच्या भूमिकेसाठी कौतुक करणारे प्रेक्षक

ऎन मध्यान्ही रंगलेला क्रिकेटचा डाव
टुर्नामेन्ट जिंकताना घेतलेली विजयी धाव

पहिला नंबर आल्यावर मिळालेलं बक्षिस
दीड मार्क कापले म्हणून मास्तर वाटायचे खवीस

उशीरा उठलो म्हणून मिळायचा धम्मकलाडू
बॅटसाठी हट्ट करताना फ़ुटलेलं खोटं रडू

कधी दिसतं आजीच्या हातचं थालिपिठ
मुंजीच्या वेळेस आईनं कौतुकानं लावलेली तीट

अचानक ओळख दाखवतात दडलेल्या स्म्रुती
मनात जतन करुन ठेवलेले क्षण तरी किती

असे माझे दिवास्वप्न कितीदा भंगती
मॅनेजर अचानक उभा असे संगती
नाईलाजाने coding साठी पुन्हा हात सरसावतात
आयुष्याची debugging उद्या पुन्हा करू असं मनाला समजावतात!!

जीवन म्हनजे एक हसर गाण असत

जीवन म्हनजे एक हसर गाण असत
असली वाट काटेरी तरिहि मन्सोक्त हुन्दडायच असत

करावी निसर्गाशी दोस्ति
बेधुन्द वार्यासन्गे मनमुराद मस्ती
पहिला पाऊस जणू अम्रुतच असत

जीवन म्हनजे एक हसर गाण असत
असली वाट काटेरी तरिहि मन्सोक्त हुन्दडायच असत

घ्यावा दिव्याचा आदर्श
ईतरान्साठि करावा निकराचा सन्घर्श
दुस्र्यान्च्या समधानातच खर सुख असत

जीवन म्हनजे एक हसर गाण असत
असली वाट काटेरी तरिहि मन्सोक्त हुन्दडायच असत

कडु-गोड आठवनिन्ची घेऊन शिदोरि पाठि
हाति असावि सदा आपल्या आत्मविश्वासाचि काठि
प्रत्येक प्रसन्गाला धेर्याने सामोर जायच असत

जीवन म्हनजे एक हसर गाण असत
असली वाट काटेरी तरिहि मन्सोक्त हुन्दडायच असत

पुन्हा ही एक नवी कविता…….! मैत्रीवर….!

मैत्री…..!

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी…

कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण…
आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी………

माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा..
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा…
सकाळच्या सुर्यासोबत इंद्रधनू घेऊन येणारी….
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी…..

कोऱ्य़ा माझ्या आयुष्यात मैत्रीचे चित्र तू चितारले,
प्रेमाच्या सप्तरंगात ते चित्रही नाहून निघाले…
पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय..
जीवनाच्या चित्रपटलावर वेगळेचं रंग रंगवणारी….
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी…...

मन उदास उदास...

मन उदास उदास
आर्त पुकार कोणास
हे कसले आभास
का चांदणे पेटले?

सारा हल्लोळ कल्लोळ
आज लागलेय खूळ
कुणा आठवणींचे रान
आज अश्रूंनी पेटले?

रात हंबरून येते
दाटे काळोख उरात
चिंब भिजले कागद
असे कवितांनी पेटले

सखे तुझ्या दारी
त्याची आलिये वरात
माझं स्वप्न हळवं सुखद
हिरव्या चुड्यात पेटले.

चला आता अजून एक कविता लिहू...

चला आता अजून एक कविता लिहू
कोऱ्या सुंदर कागदावर अक्षरांचे डाग पाडू..
शब्दांच्या डब्यांना जोडू भावनेचे ईंजन,
थोडे यातले थोडे त्यातले..कोण करतंय अर्थमंजन !

एकदा लेखणी धरली की मोकाट सुटायचं
कुणी काय म्हणेल म्हणून नाही घाबरायचं
अहो जमाना आता सुधारलाय
कळो न कळो..वा वा म्हणायला शिकलाय….

आपण आपलं लिहीत रहावं
अकलेचे घोडे दौडवत कल्पनेच्या पार जावं
अगदीच थकायला झालं तर इकडे तिकडे पहावं
डोळे मिटून दूध पिणारं काळं मांजर आठवावं

एक मात्र ध्यानात ठेवायचं
लयीतच शब्दांच जाळं विणायचं
शब्द शब्द घसरला पाहीजे
वाचणारा हर एक वाचून सरपटला पाहीजे…

हसतील रडतील हडबडतील वेडे
लिहीतील बोलतील मराठी कविता झुकली विनाशाकडे
आपण त्यांच्या हसण्या-रडण्यालाच ऊपमेत बांधु
खानावळीतल्या आचाऱ्यासारखी आज पुन्हा कविता रांधू
चला आता अजून एक कविता लिहू
कोऱ्या सुंदर कागदावर अक्षरांचे डाग पाडू..
चला आता अजून एक कविता लिहू…….

कविताही माझ्या ओसरीला येतील.

कल्पनांचा पूर आता ओसरलाय
आता मला कविता सुचत नाहीत
शब्दच जणू काही हरवलेत माझे
कवितेत ते कुठेच दिसत नाहीत.

कवितेसाठी पुन्हां हा बाधं
या धरणाचा तुटावा लागेल
पुन्हां कल्पनांना पाण्यात
वाहत माझ्याकडे यावं लागेल.

कवितेसाठी पुन्हां माझ्या
पापण्यानां ओल व्हांव लागेल
ओघळल्यावर आसवे माझी
विचारंना त्यात भिजावं लागेल.

भिजण्याच्या भीतीने मग माझे
शब्दही माझ्याकडे परत येतील
आल्यावर पूर कल्पनांचा मग
कविताही माझ्या ओसरीला येतील.

आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा...

ह्या घनघोर अधांराची आज साथ कोणाला
विखूरलेल्या स्वप्नांची मी पहावी वाट कशाला
एक तुझ्या सोबतीचा आधार होता मला
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

मावळत्या सुर्याची ईथे आज आस कुणाला
षितीजाच्या रगांची पहावी कुणी पहाट कशाला
आज तुझीही साऊली हरवली याच साधीप्रकाशात
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

मी दिल्या असख्यं हाका कुणी देईल साद कशाला
किचांळत्या काळजाची कुणी एकेल हाक कशाला
माझ्या सा-या हाका ईथेच विरल्या या वादळांत
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

शोध...

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,
सावलीशिवाय,"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,
सावली नकोस शोधु, ती आपल्या जवळच असते
नजर फक्त मागे वळव, डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

सवयींचे काय, त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.

तू हे असं स्वागत करतोस?

आलो होतो भेटायला परवा, ऐकून तुझं स्थानमहात्म्य
परत पावली माघारी फ़िरलो, तू हे असं स्वागत करतोस?

भोळ्या भक्तांना भर-उन्हात रांगेत ताटकळत ठेवतोस
अन धनिकांना अतीविशेष रांगेतून पायघड्या घालतोस
का उगाच गरीबांच्या रोजंदारीचा वेळ वाया घालवतोस
सांगून टाक त्यांना, शेवटी तुही तोलावाच लागतोस

अवघ्या प्राणिमात्रांना प्रेमाची शिकवण देतोस
अन गावच्या जत्रेला बोकडाचा नैवेद्य मागतोस
एका सिताहरणापायी अवघी स्वर्णलंका जाळतोस
दर शनिवारी नारळ देवून फ़सवलेला तुला, रोजचं
शिलहरण उघड्या डोळ्यांनी वेशिवरुन पहातोस

मला काही नको असतं, सगळं तुम्हीच करता
असं म्हणून आपली जबाबदारी झटकतोस
कर्ता -करविता तुच आहेस हे का विसरतोस?

या जगात खरंच तुझं अस्तीत्व आहे काय रे?
अजब विसंगती तुझी,सजीव प्राण्याला बुडवतोस
अन निर्जीव शवास पाण्यावर तरंगत ठेवतोस
तु तरी तुझा दिलेला शब्द तंतोतत कुठे पाळतोस

अवघं जीवन उपभोगून शेवटी पापी आपल्या
कुकर्माची फ़ळ भोगतीलच असं म्हणतोस,
आम्ही इथं उभं आयुष्य नरक-यातना भोगतो
उशीर आहे पण अंधार नाही असं म्हणतोस
पण ती वेळ येण्या आयूष्यच वेचायला लावतोस
अक्रोड देतोस अन दात पाडून वाकूल्या दाखवतोस

पुन्हा मोहक पुर्नजन्माचं गुलाबपाणी शिंपडतोस
मागच्या जन्मीही असंच काहीसं बोलला असशील
पुढच्या जन्मीचं राहू दे, या जन्मीची खात्री देतोस?

खरंच हृदय कनवाळू आहेस काय रे तू?
लेकरांना काय करुणा भाकायला लावतोस.
तुझ्या सारख्या सर्व-शक्तीमान पित्याची मुलं आम्ही,
आम्हाला काय दिनवाने लाचार समजतोस?

कधी कधी मुंगसासारखं क्षणिक अत्तित्व दाखवतोस
पण वारंवार काळ्या मांजरासारखा आडवाच जातोस
सर्व-विश्वव्यापी ना रे तु ? इतका व्यस्त असतोस?
अंधश्रद्धा निर्मुलनाचं काय करायचं ते आम्ही पाहू
तु मात्र भाबड्या श्रद्धेचे बुरुज असे का ढासळतोस ————

निवडूगं

त्याने तुला काल एक गुलाब दिलं
आणी तु तोडलेला देट मी उचलला
उगाच कोणाला काटा लागु नये म्हणुन
आणी तो काटा माझ्याच काळंजात रुतला.

रात्रभर तुझाच प्रश्न माझ्या मनाला पडला
रात्रीच्या वाद्ळात दारातला पारीजातही पड्ला
फ़ुल वेचतानाही तुझ दर्शन नाही व्हायच आता
उरलेल्या फ़ुलांचा सडा तुझ्याच अगंणात पडला.

तु आज आहेस त्याच्या गुलाबात दगं
मझ्या अगंणात उरलाय टोचणारा निवडूगं
कोप-यातला मोगरा असाच सुकुन गेला
कारण तुला जडला आज आबोलीचा छदं.

उगाच नाही पुराच पाणी माझ्या अगंणात आलं
तु इकडे फ़िरकु नयेस म्हणुनच अस झालं
आता मीही लावेन गुलाब आणी आबोली अगंणात
पारीजातकाचं आणी मोग-याच झालं ते झालं.

पण एकही फ़ुल काही तुझ्या वाट्याला नाही येणार
मी त्यानां सुकलेल्या मोग-याची शप्पत देणांर
पारीजातकाच्या फ़ाद्यांपासुन कुपंण बनवतोय मी
तु येणा-या रस्त्यावर निवडूगं पहारेकरी म्हणून ठेवणांर.

माझं प्रेम...

अळवाच्या पानावरचं पाणी होतं माझं प्रेम
करत असूनही सांगता येत नव्हतं माझं प्रेम
भावनेच्या ओघात वाहत चाललं होतं माझं प्रेम
आठवानींच्या सागरात बुडत चाललं होतं माझं प्रेम
पावसांच्या सरीत चिंब न्हालं होतं माझं प्रेम
थंडीच्या गारव्यात गारठलं होतं माझं प्रेम
तिच्या एकेका भेटीसाठी आसुसलं होतं माझं प्रेम
गप्पा तिच्याशी मारताना रंगून जात होतं माझं प्रेम

मनात कुठेतरी खोलवर दडलं होतं माझं प्रेम
कललच नाही मला कसं जडलं माझं प्रेम
वाटल होतं सांगुन टाकावं तिला माझं प्रेम
तिच्या मनाला पटेल असं समजवावं माझं प्रेम
सर्वांनी सांगितलं एकतर्फी प्रेम म्हणजे माझं प्रेम

सांगितल्याविना तिला झुरतं राहिलं होतं माझं प्रेम
मनातल्या मनात कुठवर लपवून ठेवावं माझं प्रेम
माझ्याच मनात द्वंद्व निर्माण करत माझं प्रेम
होकार-नकाराच्या वादलात सापडलं होतं माझं प्रेम
निश्चय केलाच तिला सांगाव माझं प्रेम

वर्षे गेली... सांगायची तयारी करायला माझं प्रेम
शोधून मुहूर्तं सापडला, तिला सांगायला माझं प्रेम
गाठलं रस्त्यातचं तिला, एकदा सांगायला माझं प्रेम
थांबवलं तिनेच मला, सांगण्यापुर्वीच माझं प्रेम
हातातली पत्रिका पाहून गोथालं तिथेच माझं प्रेम
सहकुटुम्ब, सहपरिवार लग्नाल अगत्य यायचं सांगुन गेलं माझं प्रेम

आई करशील ना माफ ....

'काय आई
तू कशी आहेस ?’
कधी मी विचारलंच नाही.
तिर्थक्षेत्र ..
.. माझ्या घरातलं
कधी मी पाहिलंच नाही.

घर शुद्ध करणारी गंगा ..
पदतीर्थ या गंगेचं ..
कधी मी घेतलं का ?

माझ्यासाठी झिजणारं चंदन ..
रोज कपाळी ..
कधी मी लावलं का ?

तिनंच तर शिकवलं सगळं
पण तिचं शिष्यत्त्व
कधी मी मानलं का ?

आमची आनंददात्री,
दु:ख तिचं
कधी मी जाणलंच नाही

आतापर्यंतच जगणं
.. छे
खरतरं ते जगणंच नाही ...

कशासाठी करायचा जयमहाराष्ट्र ?

कशासाठी करायचा जयमहाराष्ट्र ?
 
१८ तास वीज नाही त्यामुळे कारखानदारी व्यापार नाही रोजगार नाही
सुंदर मुंबई स्वछ्य  मुंबईची,  बकाल मुंबई बेफाम मुंबई केली आहे
प्यायला पाणी नाही म्हणून विदर्भात दंगे हि आजची बातमी
पण राज्यकर्ते दारू कशी स्वस्त मिळेल या विचारात मग्न .
 
५० वर्षात जातीपाती नष्ट होण्याऐवजी प्रत्येकजण आपण कोणत्या जातीचे ते अभिमानाने मिरवतो ,
सहिष्णुता नष्ट होऊन 
विचारांचा मुकाबला विचारांनी करण्यापेक्षा हाणामारीने करणारे आज नेता बनत आहेत. 
लोकशाही च्या नावाखाली सर्व नेते घराणेशाही राबवीत आहेत ,
माझा मुलगा/मुलगी पुतण्या यापलीकडे जग नाही
महिला आरक्षणाच्या नावावर स्वताच्या बायको /मुलीची काळजी घेतली जात आहे
गुंड तडीपार खून हि नेते (??)मंडळींची ओळख बनली आहे .
 
शिक्षण हे  फक्त श्रीमंतांची मिरासदारी होऊन राहिली आहे 
 
महाराष्ट्रच्या  राजधानीत मराठी फक्त २० टक्के बोलतात
महाराष्ट्रात मराठी भाषा हि इंग्रजी व हिंदी नंतर ३रया  क्रमांकावर आहे 
पण  मराठी भाषेच्या  नावावर गळे काढन्न्यारांची मुले इंग्रजी भाषेत शिकतात कारण ती जागतिक गरज आहे.
बाल मृत्यू चे प्रमाण वाढत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत
गावे ओस पडत आहेत तर शहरांची सूज वाढत  आहे 
नक्षलवाद वाढतो आहे पण त्यावर मार्ग शोधण्या ऐवजी बंदुकीच्या बळावर तो दडपून टाकायला बघत आहेत
साहित्यिक क्षेत्रात मरगळ आहे, क्रीडा क्षेत्रात बोंब आहे, व्यापारात साडेमाडे तीन-चार आहेत  कशी होणार प्रगती?
आपल्या बरोबर निर्माण झालेला गुजरात १६ टक्के जी डी पी वाढ करून खरा सुवर्ण गुजरात बनत असताना  पुणे मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राची  वाढ बिहारपेक्षा देखील कमी आहे पण विचार कोण करतोय ?
५० वर्षानंतर आज महाराष्ट्र ची अवस्था  खालील ' बी' च्या कविते प्रमाणे आहे 
 
तेजाचे तारे तुटले                मग मळेची सगळे  पिकले !
लागती दुहीच्या आगी      राष्ट्राच्या संसाराला ;
अति महामूर पूर येते      ढोग्याच्या  पावित्र्याला ;
खडबडात उडवी जेव्हा       कोरडया  विधीचा मेळा;
                चरकात मान्यवर पिळती
                सामान्य मुकी जनता ती ,
                 लटक्याला  मोले येती ,
कौटिल्य स्वैर बोकाळे !     तेजाचे तारे तुटले  !! 
 
अचारविचारौघाचा             नवनित्य रक्तसंचार
ज्या समाजदेही होता       अनिरुद्ध करीत व्यापार
त्या देहा ठायी ठायी        घट कसले बंध अपार
                 कोंडिले स्वार्थकोंड्यात,
                 जल सडले ते निभ्रांत 
                 तरी धूर्त त्यांस तीर्थत्व 
देऊनी नाडती भोले !            तेजाचे तारे तुटले  !! 
 
कर्तव्य आणि श्रेयाची      हो दिशाभूल जेव्हां ती,
आंधळा त्याग उपजोनी    डोहळे भिकेचे पडती;
अतिरेक पूज्यभावाचे        फुंकिती विवेकेज्योती;
               मग जुन्या अप्तावाक्याते
              भलतिशीच महती येते,
               राणीची दासी होते,
बुद्धीचे फुटती डोळे !           तेजाचे तारे तुटले  !! 
 
घन तिमिरी घोर अघोरी    विक्राळ मसण जागवती;
ती ' परंपरा ' आर्यांची 'संस्कृती' 'शिष्टरूढी' ती;
'धर्मादी' प्रेत झाल्याची बेफाम भुते नाचवती;
सत्तेचे फक्त पुजारी उरले        तेजाचे तारे तुटले  !! 
...
खिन्न मनाने

फक्त तुझ्यासाठी ..!

आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत चालत होतो
आणि आज नजरेआड होताना तुलाच पाहत होतो
भावनांचा कल्लोळ मनातून वाहत होतो
वेदनांचे वादळ क्षण क्षण झेलत होतो

भरभरून दिलेस तूच आणि रिक्तही केलेस तूच
सुख देता देता दुःखच फक्त दिलेस तू
अश्रूंचे जळ मी माझ्याच ओंजळीने पीत होतो
तरीही फक्त तुझ्यासाठी सर्व सहन करीत होतो

सुखाची तुझ्या भाषाच निराळी होती
पण माझ्या सुखाची तार तूझ्याशी जुळली होती
मनाचा कोंडमारा सहन करीत जगासाठी हसत होतो
आणि एकांतात फक्त तुझ्यासाठी रडत होतो

मी आणि अंधार……….

एकदा मी अंधाराला म्हणालो
तु असा कसा
आणि तुझे अस्तित्व काय
तु सर्वाचा नावडता
मग तु असण्याचं कारणच काय

यावर अंधार उत्तरला,
मीच आहे आंधळ्याची काठी
मीच आहे आंधळ्याचे जग
मीच आहे रात्रीची सोबत
मीच आहे काजव्यांची रग

हो मीच तो,
जो प्रकाशाने साथ
सोडल्यावर धावुन येतो
जो दिवसासुध्दा सावलीरुपाने
तुझ्याबरोबर असतो

मीच आहे जो
वर्षानुवर्षे जुनाट मंदीरात
देवमुर्तीला साथ देतो
मीच आहे जो
तुम्हाला उजेडाचे
महत्त्व पटवुन देतो

असा आहे मी
नसुन असणारा
आणि असुन न दिसणारा……….

मैत्री म्हणजे काय असतं?

मैत्री म्हणजे काय असतं?
एकमेकांचा विश्वास असतो?
अतूट बंधन असत? की
हसता खेळता सहवास असतो?
मैत्री म्हणजे मैत्री असते,
व्याख्या नाही तिच्यासाठी;
अतूट बंधन नसत,
त्या असतात रेशीमगाठी

मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी;

मैत्री करावी सोन्यासारखी,
तावुन-सुलासुलाखून चमचमणा;
मैत्री करावी हिर्या सारखी,
पैलू पडताच लख-लखणारी;
मैत्री असावी पहाडासारखी,
गगनाला भिडणारी;
मैत्री असावी समुद्रासारखी,
तलाचा थान्ग नसणारी;

मैत्री म्हणजे समिधा असते,
जीवन यद्न्यात अर्पण झालेली;
स्वताच्या असन्याने सुद्धा
मन पवित्र करणारी;
मैत्री हे नाव दिलय
मनाच्या नात्यासाठी;
अतूट बंधन नसत त्या असतात ...

मैत्र .......

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहिलं.....
तरी उणं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटू लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटू लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपून ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवू नयेत म्हणून
काळजाच्या तिजोरीत लपून ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असच राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतून
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात