चारोळ्या फक्त तिच्यासाठी .........
संध्याकाल ही टळुन गेली.
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली ...
तू सोबत असली की ,
मला माझाही आधार लागत नाही.
तू फक्त नेहमी सोबत रहा ,
मी दुसर काही तुझ्याकडून मागत नाही ..
तुझ्यापासून दूर राहण म्हणजे ,
क्षनाक्षनाला मरने होय.
डोळ्यातले अश्रु डोळ्यातच ठेउन ,
मनातल्या मनात रडने होय ....
खुप वेळेस तुझ्या आठवणी ,
पाउल न वाजवताच येतात.
आणि जाताना मात्र ,
माझ्या मनाला पाउल जोडून जातात.
तुझा नाजुक असा चेहरा ,
डोळ्यासमोरून हलत नाही.
जसा अंधारात पेटत्या ज्योतीला,
प्रकाश सोडून जात नाही....
कळल्याशिवाय राहणार नाही…
माझं प्रेम नाही तुला उमजत
आसवांची किम्मत खरच
गळल्यशिवाय नाही कळत
सुरुवातीला वाटत होतं
तुला समजतील माझे भाव
नजरेतुनच घेशिल तु
माझ्या मुक्या शब्दांचा ठाव
तुझ्या माझ्यातलं अंतर मग
अगदीच शुल्लक ठरेल
मनामधे तुझ्या
प्रेमाची एक ज्योत तेवेल
प्रेम तुझं दिसलं मला
भावही कळले मला
अन क्शणा क्शणाला बदलणारे
तुझे वेडही उमगले मला
कशाला आता शब्दांचे खेळ मग
कशाला आता वेडी आस
पुर्ततेआधिच अपुरे राहिले
तुझ्यात गुन्तलेले माझे श्वास
तरीही मी आशा सोडली नाही
आस मनीची सुटली नाही
तुझ्या शब्दांना झेलनारी
ओंजळ माझी तुटली नाही
आज त्यात जमा आहेत
माझे वेडे अश्रु
तेही आटुन जातील
संपतील वाट पाहुन
पण थांबणार नाही क्शणभरही
माझ्या मनातलं काहूर
सुटतील बांध…
तुटतील श्वास …
पण तुझी वाट पाहील
माझी वेडी आस….
लक्शात ठेव शब्द माझे
स्मरतील तुला एकांतपणी
लढशील कसाही
सावरशीलही….
पण एक अश्रु तुझ्या डोळ्यातुन
गळल्याशिवाय राहणार नाही
माझ्या प्रेमाची किंमत तुला
कळल्याशिवाय राहणार नाही…
माझ्या प्रेमाची किंमत तुला
कळल्याशिवाय राहणार नाही…
♥ तुला लाजण्याच कारणच काय ? ♥
तुला भ्यायचं कारणच काय ?
अजुन तुही अगदी दूर माझ्या ?
तुला शंकेच कारणाच काय ?
अजुन नजरेला नजर भिडलीच कुठे ?
तुझ्या गालांवर गुलाबाच कारणच काय ?
अजुन हनुवटी तुझी, मी उचललीच कुठे ?
डोळे बंद करण्याचे कारणच काय ?
अजुन हातात हात तुझा घेतलाच कुठे ?
तुला नजर झुकवण्याच कारणच काय ?
अजुन ओठांना ओठ भिडलेच कुठे ?
तुला लाजण्याच कारणच काय ?
एका महिन्यानंतर …….
आज पुन्हा मी कवितेंच्या
देशात येत आहे
झाले गेले विसरुन झाले
पुन्हा इथे परतत आहे
झाले गेले खुप झाले
पुन्हा त्यावर विचार नाही
आता ठरवलंय मी आयुष्यात
मागे वळुन पहायचे नाही
राखेतुन हा फिनिक्स पक्षी
जोमाने उभा राहणार आहे
पहिल्यापेक्षा अधिक प्रभावीपणे
कागदावर लेखणी चालवणार आहे
कुणी कुणाचे नसते
हेच खरे आहे
जिथे अश्रुंनाही किंमत नसते
तिथे त्यांना ढाळण्याची काय गरज आहे
अश्रुंचे खेळ बंद करुन
आता जोमाने चालण्याची गरज आहे
कारण नवे क्षितीज खुणावतंय
मला तिथवर पोहोचायचे आहे
अचानक कधीतरी….
सुखाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलायचं
प्रेमाच्या वर्षावाने, न्हाऊन निघायचं,
काळजी, द्वेष, सारं फेकुन द्यायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.
आपलं अस्तित्व या दुनियेत पहायचं,
आपलं महत्वं कुठे आहे का, हे सतत शोधायचं,
आपल्या प्रियजनांना नेहमीच जपायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.
आपलं सारं कही, क्षणात दुसर्याला द्यायचं
एकदा दिल्यावर मात्र परत नाही मागायचं,
गोड आठवणींना, मनात आपल्या साठवायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.
पण? पण अजून मला बरंच काही पहायचंय
या दुनियेकडुन, खूप काही शिकायचयं,
इथे, मलाही काहीतरी बनायचयं
म्हणून मला अजून, भरपूर जगायचं ….भरपूर जगायचं …..भरपूर जगायचं …..
आयुष्याची पहाट...
अंधारातील प्रत्येक क्षणात मी
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली
सकाळच्या दवथेंबामध्ये
गुलमोहोर मी साठवला
वारयाच्याही कानात मी तेव्हा
आत्मविश्वास जागवला
समोर दिसत नाही म्हणून मी
अश्रुनींही दिवे पेटवले
हात जेव्हा भाजले तेव्हा
त्यांनीच मला सावरले
उष्ट्या रक्ताच्या समारंभातही मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असातानाही मी
गरुडझेप दाखवली
सर्व ऋतु खेळून गेले
तीन पत्तीचा डाव
वादळही सांडून गेले
एक रडीचा डाव
उठतांना पंगतीतून पण
सारी आधी उठून गेली
डोळे उघडून बघण्याआधीच
वीज कडाडून निघून गेली
मुठीत ह्रदय आवळण्यात मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली
अस्तित्वाच्या संघर्षातही
उणे काहीच नव्हते
अंधारातील प्रत्येक वणव्यात
हात मात्र हातात होते
क्षणाक्षणातील प्रत्येक युगात
साथ मला भरपूर होती
प्रत्येक एका अमवस्येला
चांदण्यांची बरसात होती
दोन मनांच्या भेटीगाठीत मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली
तरीही असे का वाटते
हरवले असे का वाटते
कातरवेळी आज का
दवथेंबाचे वावगॆ वाटते
का आज नशीबाचे पाउल
मलाच थोडे उजवे वाटते
का आज दिव्यामध्ये
पतंग होऊन मरावेसे वाटते
याच उत्तरांच्या मूळ प्रश्नात मी आज
एक पहाट जागवत आहे
“होते” आणि “आहे” यामध्येच
गरुडझेप आठवत आहे
♥ कित्येकदा स्वत:लाच हरवत होतो मी ♥
तुझ्या श्वासात राहत होतो मी
तुझ्या आठवणीत जगत होतो मी
रोज रात्री स्वप्नात माझ्या
फ़क्त तुलाच पाहत होतो मी
त्या सरसरत्या पावसात
त्या ओल्याचींब दिवसात
चोरुन चोरुन भिजत भिजत
फ़क्त तुलाच न्याहाळात होतो मी
कित्येक मित्र जवळ असुन
कुठेतरी एकटाच बसुन
फोटो तुझा समोर ठेवुन
अलगदपणे तुलाच कुरवाळीत होतो मी
स्व:ताला तुझ्या प्रेमात पाडतांना
रात्री तुला स्वप्नात बघतांना
भरदिवसा तुझे भास होतांना
तुला प्रेमात पाडायलाच विसरत होतो मी
आजही तुझी वाट पाहत असतांना
अजुनही तुझ्या प्रेमात जगत असतांना
माझ्यापासुन दुर, तुही दु:खी आहेस
हे तुझ्या उदास चेह-यावर वाचत होतो मी
तुझ्या विरहात एकटाच जगुन
भावना माझ्या मनातच दाबुन
आयुष्यात नेहमी तुच जिंकावीस म्हनुन
कित्येकदा स्वत:लाच हरवत होतो मी
कित्येकदा स्वत:लाच हरवत होतो मी
♥ दिसतं तस नसतं, म्हनुन जग फ़सतं ♥
स्वत: सदैव रडवून दुसरय़ाला नेहमी हसवायचं असतं
आपल्या ईच्छा मनात ठेवून दुसरय़ाचं कौतुक करायचं असतं
मनातले चेहरय़ावर कधी आनायचं नसतं
कारण असे करुनच दुसरयाचे मन फुलवायचं असतं
दुसरयासाठी राब राब राबयचं असतं
आनी स्वत:च्या जीवाचे मात्र राण करायचं असतं
एवढं करुनही आपल्याला कुनी समजुन घेत नसतं
कारन सर्वानाच आपापले स्वार्थ साधायचं असतं
आपल्य ईच्छेचा खुन करायला कुनीही तयार असतं
आनी आपलं मन मात्र दुसरय़ासाठी सदैव तयार असतं
पन दुसरय़ाचं भलं करुनही नेहमी आपलचं चुकीचं दिसतं
आनी दुसरय़ाचं मन आपल्याला पाहुन खुदकनं हसतं
पन एकांतात आपलं मन किती रडत असतं
कारन एकांत नसतांना ते सर्वासाठीच हसतं
आनी म्हनुनच हे सर्व जनसमुहाला माहीत असतं
की दिसतं तस नसतं, म्हनुनच जग फ़सतं
♥आमची कंपनी♥
आमच्या Software कंपनीची
बातच काही और आहे
येथे दिवसाचाही दिवस
आनी रात्रीचाही दिवस आहे
सकाळी सकाळी येथे
कामाचा श्रीगणेशा होतो
जरा उशीर झाल्यावर मात्र
मुंबईसारखा एक बोम्बस्फ़ोट होतो
बोनसचा वादा नेहमी येथे
क्षनात विसरला जातो
वाढदिवस सर्वांचा मात्र
आठवनीने साजरा होतो
दर दोन महिन्यांनी येथे
नव्या जागेच्या स्वप्नाची असते खिरापत
सोडुन कुनी गेल्यावर मात्र
होते Increment चे वाटप..
चहा Cofee च्या नावाने येथे
ज्युस झुरळाचा पाजला जातो
टी-मशिन स्वच्छ करनारा मात्र
वर्षातुन एकदाच बोलावला जातो
बाथरूम मध्ये झोपन्याची
येथे मजाच काही और आहे
बाथरूम कम मोबईल रूम
येथे नेहमीच एंगेज आहे
बाथरूम मध्ये जाण्यासाठी येथे
नशीब जोरावर असावं लागतं
दरवाजा Lock झाल्यावर मात्र
गाडीच्या चाबीनेच उघडावं लागतं
लंच नंतर येथे चहाचा
वेध सुरु होतो
चहावाला वेळेवर मात्र
रोज देवासारखा येतो
प्रत्येक जन येथला
रात्री उशीराच घरी जातो
बायको पोरं झोपल्यावर
एकटाच जेवन घेतो
बायका मुलांना यांचे
दर्शन कधी होत नाही
मुले विचारतात आईला
पप्पा नेहमी घरी कसे दिसत नाही ?
शिवाजी महाराज यांचे चित्र त्यांच्या हस्ताक्षरासह -Shivaji maharaj photo
त्यात असेही लिहिले होते कि हे चित्र स्वतः महाराजांच्या उपस्थितीत काढले गेले व त्यांनी त्यावर हस्ताक्षर केले .
आता हे चित्र मोस्कोच्या कुठल्यातरी संग्रहालयात आहे.
हे सर्व खरे आहे कि नाही हे मला माहित नाही पण हे चित्र खरच खूप छान आहे .
शिवाजी महाराज यांचे चित्र .... त्यांच्या हस्ताक्षरासह ....
♥ आजकालच्या ह्या मुली ♥
आजकालच्या ह्या मुली
फ़ार पुढे गेल्यात
सलवार कमीज विसरुन
आता जीन्सवर आल्या
बाहेर जान्यासाठी ह्या
तासनं तास नटतात
घरच्यांना थाप मारुन
बाहेर पोरांना भेटतात
गाडिवर बसुन ह्या
होऊ पाहतात स्मार्ट
हज़ार कीक मारुनसुध्द्या
यांची गाडी नाही होत स्टार्ट
सलवार कुडता यांचा
आता इतिहासात जमा झाला
टाईट टाईट जीन्सने
शहरात धुमाकुळ केला
यांच्या ड्राइविंग पायी
ट्राफ़ीक पोलिस हैरान होतात
कारन ह्या दाखवुन हाथ उजवीकडे
गाडी डावीकाडे नेतात
पुरुषांचे प्रत्येक शौक
यांनी त्वरीत आत्मसात केले
बिअर बार मध्ये जाऊन
सर्व ग्लास रिकामे केले
सिगरेट ओढायला सुध्दा
ह्या पुढेमागे पहात नाही
अती मध्यपानाने मग
कपड्यावर ध्यान राहत नाही
म्हनुनच जिकडे तिकडे नारा आहे
“ladies first ladies first”
Not in salawar
but only in mini skirt
♥ तुला भेटल्यापासुन आम्ही असे काही बदलत गेलो ♥
तुला भेटल्यापासुन आम्ही असे काही बदलत गेलो
तुझ्यावर कविता करुन त्या स्वत:च गुनगुनत गेलो
जेव्हा तुझ्या आवडींना आम्ही जवळ करत गेलो
तेव्हा हळुहळु आमच्यात सुद्धा बदल करत गेलो
तुझ्या प्रेमाखातर आम्ही बदलुन आम्हाला
तुझ्या आठवनीत रोज रोज स्वत:ला हरवत गेलो
तुला भेटल्यापासुन आम्ही असे काही बदलत गेलो
तुझ्यावर कविता करुन त्या स्वत:च गुनगुनत गेलो
लोकांना भेटन्याचा आम्हाला कधी छंद होता
मैफ़लीमध्ये रमन्याचा तेव्हा खेळ मंद होता
तुझ्यासाठी आम्ही हे सुद्धा करत गेलो
लोकांशी भेटु लागलो, मित्रांमध्ये रमत गेलो
तुला भेटल्यापासुन आम्ही असे काही बदलत गेलो
तुझ्यावर कविता करुन त्या स्वत:च गुनगुनत गेलो
तुझ्याबद्दल आम्हाला जेव्हा विचारु लागला कुनी
काय सांगु तेव्हा काय मोठी गडबड झाली
सांगन्यासारखी गोष्ट आम्ही विसरत गेलो
गोष्ट जी लपवायची होती तीच आम्ही सांगत गेलो
तुला भेटल्यापासुन आम्ही असे काही बदलत गेलो
तुझ्यावर कविता करुन त्या स्वत:च गुनगुनत गेलो
इश्क बेघर करते, इश्क बेदर करते
इश्काच खरच काही ठिकाना नाही
कालपर्यंत आम्ही होतो ठिकान्यावर
आज आम्ही आमचाच ठिकानाच विसरत गेलो
तुला भेटल्यापासुन आम्ही असे काही बदलत गेलो
तुझ्यावर कविता करुन त्या स्वत:च गुनगुनत गेलो
मला सोडण्यासाठी मी आभारी आहे तुझा……
मला सोडण्यासाठी मी आभारी आहे तुझा……
ओला फ़ाटा असुनहि तेव्हा
मी तुझ्याबरोबर थोडा जळालो होतो
पण जरी आता मी काहीच नाही
तरी एक निखारा होउन उरलोय
स्वतःच्या आतल्या धगधगीला विसरलो होतो
तुझी नाही त्या वार्याची साथ मी घेतोय
त्वेषाने या जीवनाच्या निरंतर अग्निकुंडात स्वतःला उभारतोय
कदाचित तुझ्याबरोबर असतानाच
तुझ्याकडुनच माझी खरी किंमत कळली होती
तुझ्यानंतर मला जीवन वाटायचा कुटणारा खलबत्ता
मला दोन तुकड्यात मोडणारा क्रुर अडकित्ता
पण आता जाणलोय तो तर असतो एक हुकमी पत्ता
फक्त कसा वापरायचा ते मात्र शिकलो नव्हतो
आता जीवनाच्या अमानुष जुगारात मी हर बाज़ी जिंकतोय
वाटले लंगडा जीवनाचा रथ तुझ्यामुळे
वार्याच्या वेगाने धावू लागेल
पण तुझ्या जाण्यानं दाखवुन दिलंस
कदाचित तुलाही त्यासह ओढावं लागलं असतं
आधीच लंगडा तुझ्या ओझ्याने जागीच रुतलो असतो
थोडे दिवस नक्कीच मी रस्ता भटकलो होतो
पण आता ज़ीवनवाटेवर दुःखानेच दंडात दम भरुन धावतोय
आभारी आहे मी तुझा या सगळ्यासाठी
तुझी ना-लायकी वेळेवर दाखवुन दिल्यासाठी
उशीराच का होइना पण मी तुझे आभार मानतोय
तुझ्याबरोबर असताना समाजाच्या चालीरीती मोडत होतो
कळलेय आता केवढ्याश्यासाठी केवढं बाजुला सारत होतो
काही काळच नात्यांच्या धाग्यांचे उपकार विसरलो होतो
पण आता पुन्हा त्याच धाग्यांनी जीवनाची लोकर मी विणतोय
थोड्या धीरानेच आता त्याच्या उबेमध्ये मी विसावतोय………………..
एक रात्रीचे दुसर्या रात्रीवर प्रेम जडले…..
कसे अजब घडले,
एका रात्रीचे दुसरीवर
प्रेम जडले
कोणा न कळले
मग कशा कोणा
दिवसाने त्यांना सांधले
जाणुन चुकले
जिथे मनतार जुळले
स्पर्शाविण काही न अडले
सुर्यामुळे दुरावले
विरहाने घट्ट केले
मग त्याचेच आभार मानले
माझ्याही मनात
रात्रीचे अभिराज्य आहे
आता दुसर्या रात्रीसाठी ते थांबले…………..
अमर आलिंगन…
रविवार सकाळची वेळ होती,
मी हॉलमध्ये पेपर वाचत बसलो होतो;
ती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली,
“चहा घेणार का तुम्ही? ” असं मला म्हणाली;
मी तिच्याकडे न बघताच “हो” म्हणालो,
आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेलो;
माझ्या जवळून जाताना तिने केसांना नाजुक झटका दिला,
त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला;
मी उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले,
तिनंही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले;
मी हळूच उठलो खुर्चीवरुन आणि स्वयंपाकघरात आलो,
तिनं माझ्याकडे बघावं म्हणून फ्रिजवर तबला वाजवू लागलो;
तिनं मात्र मागे न बघताच चहाचं आधण ठेवलं,
आणि मग मला चिडवण्यासाठी आपलं नाक उडवलं;
तिच्या पाठमोर्या रुपाकडे बघत मी क्षणभर तसाच थांबलो,
उगाच तिला दुखावले म्हणुन स्वतःच्याच मनाशी भांडलो;
हळुच मग मागुन जाऊन मग मी तिच्या कमरेला विळखा घातला,
पण गडबडीत चहाच्या भांड्याला लागुन हात माझा भाजला;
मी कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त हसली,
चावटपणाची वेडी लहर माझ्या मनात मग उठली;
मी जखडले तिला मिठीत, ती म्हणाली “जाऊ द्या ना!”
मी म्हणालो तिला “तुला माझ्यात सामवू दे ना!”
ती लाजुन म्हणाली “अहो असं काय करता? चहा उकळतोय!”
मी म्हणालो “उकळू दे! इथं माझा जीव जळतोय!”
“अहो असं काय करता? दूध उतू जाईल ना!”
“कशाला काळजी करतेस मी परत आणुन देईन ना!”
ती उगाच कारणं देत होती, मी प्रत्येक कारण उडवत होतो,
तिला अजुनच जवळ घेत, माझ्या मनासारखं घडवत होतो;
शेवटी तिनं कारण दिलं “अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय”
मी म्हणालो “हो का! मला वाटले की माझा चावटपणा अती होतोय”
तेवढ्यात दाराची कडी वाजली,
मी मनातल्या मनात बाहेरच्याला इरसाल शिवी घातली;
तिनं झटकन स्वतःला माझ्या तावडीतुन सोडवून घेतलं,
आणि हळूच मला धक्का मारुन, स्वयंपाकघराबाहेर लोटलं;
मी वैतागानं दार उघडलं समोर कचरावाला दिसला,
माझा खांद्याशी ओला झालेला शर्ट पाहुन तो पण गालात हसला;
मी कचरा देऊन झटकन दार लावून घेतलं,
पण मागेवळताक्षणी काहितरी विचित्र घडणार आहे, असं मला वाटलं;
पहिले मला स्वयंपाकघरातुन, दूध जळण्याचा वास आला,
नंतर कान दणाणुन सोडणारा, सिलेंडरचा स्फोट झाला;
मी धावत आत गेलो, माझं ह्रदय धडधडत होतं,
माझ्या डोळ्यांदेखत तिचं पातळ आगीवर फडफडत होतं;
मी तिला उचलून घेतलं, डोळे माझे झरत होते,
तिच्या करपलेल्या कायेवरून हात माझे फिरत होते;
जेव्हा मी कुणीच नसतो
निराकार सावल्यांप्रमाणे
क्षितीजावरती लोंबत असतो,
अंधाराच्या मागे लपुनी
शिळा हॊउनी आंबत असतो.
बुरशीलाही बुरा यावा अन
गंजालाही चढावा गंज,
किड्यांच्याही डोक्यात घुमावी
भणभणणारी झांज.
अशी गजबज होता मस्तकी
चित्ताला ये जरा शांतपण,
या शांतीच्या माथ्यावरि पण
नश्वरतेचे घण चिरंतन .
जेव्हा मी कुणीच नसतो -
असण्याचा सारे काही
अर्थ अचानक सुटू लागतो,
या नसण्याचा त्या असण्याशी
संबंध भराभर तुटू लागतो…
तव नयनाचे दल हलले
पनावर्च्या दवबिन्दुपरि जग सगळे डळमळळे ग
तव नयनाचे दल हलले ग
वारे गळले तारे ढळले
दिग्गज पन्चाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषि मुनि योगि चळले ग
तव नयनाचे दल हलले ग
ऋतुचक्राचे आस उडाले
आकाशातुन शब्द उडाले
आवर आवर आपुले भाले
मीन जळि तळमळले ग
तव नयनाचे दल हलले ग
ह्रिदयि माझ्या चकमक जडली
दो नयनान्ची किमया घडली
नजर तुझी धरणीला भिडली
पुनरपी जग सावरले ग
तव नयनाचे दल हलले ग
डोळे मीटून चालत आले
देताना दोह हस्ते
माझेच कर्म खोटे
फाटकी झोळी घेउन गेले
काही नव्ह्तेच रे ग्रहणे
फक्त दर्शन हवे होते
तुझ्या ममतेत ओथ्मबलेले
दोन क्शण हवे होते
कणा कणात अस्तीत्व तुझे
मीच भटकत रaहीले
रेणू रुपी या देहतले
तुझेच असणे तिष्टतठेवले
भेटशील मन्दीरी कोणी सान्गीतले
कोणी सान्गीतले म्हत्म्य स्थळचे
आशा बावळी लगेच भुलते
आन मी मेन्ढरु डोळे मीटून चालत आले
कॉलेज लाइफ़ माझं "
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !
कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !
बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !
परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !
पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.
अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!
पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!
माझी तु होशील का?
भाव मनीचे जणन्या
आयुष्याची वाट बिकटही
साथ मजला देशील का?
तो पहा रवीकर तांबुस
उगवतीचा प्रकाश सुंदर
लाटांसोबत चालताना
हात हाती घेशील का?
रंगलेली कैक स्वप्ने
प्रिये तुझ्या सहवासाने
गंध भरन्या जीवनात
सांग तु येशील का?
हिरवा शालु ल्याली धरती
फुले उधळती तुझ्याच भोवती
द्रुष्य विहंगम,अतिव सुंदर
पाहण्या मजला नेशील का?
सात सुरांची सुरेल मैफ़ील
सात रंगात रंगले विश्व
सात पाउले सप्तपदिचे
दोघे मिळूनी चालु सोबत
आयुष्याच्या या वळणावर
माझी तु होशील का?
तुम्ही पण कमाल करता यार!
प्रेमाच्या गोष्टी करता यार?
प्रेम on-line खुलते आजकाल
ह्रिदयामधे जपता यार?
scrap,sms हे प्रेमाचे बोल
डोळ्यांची भाशा बोलता यार?
प्रत्येक Forum वर एक मैत्रीण.
एकाच अबोली साठी झुरता यार
messages आणि chat सोडून
बाहेर भटकायच म्हणता यार?
Blogs वाचायचे मिळतिल ते
तुम्ही पुस्तके वचता यार?
Community मधे रमायचे आता
चौकात गप्पा मरता यार?
धावयचे सोडून जगासोबत
स्वप्नां मधे रमता यार?
ह्रिदयात जागा मागता यार?
अरे!कोणत्या जगात जगता यार?
तु गेलीस…….
तुलाच समोर थेउन, तुज़ा क्शन न क्शन आथवुन…..
शब्दान्चा खेऴ हा, मी पाहनार आहे खेऴुन,
कारन तुही गेलीस मला, याच शब्दान्मधे बान्धुन…
पाह्तो आहे स्वप्न, मी दीवस रात्र जागुन,
तुलाच द्दोल्यात थेउन, तुज़ा क्शन न क्शन आथवुन…..
पाह्तो आहे वात (vat) तुज़ी, एकताच खीद्दकीत उभे राहुन,
कारन तुही गेलीस मनाच्या, दाराला कद्दी लाउन….
लधतो आहे तुजासाथी, जगाशी वैर धरुन,
तुलाच देव मानुन, तुज़ा क्शन न क्शन आथवुन…..
माहीत नाही मला, कसे जगाला दाखवु मी जीन्कुन,
कारन तुही गेलीस, जीन्कनार्र्याल कायमचे हरवुन…..
तिच्या….
नाही उगवली रात्र
तिच्या अधि-या ओठांनी
नाही बहकले गात्र
तिच्या स्वप्नांचे रुपेरी
नाही मेघ पालवले
जागेपणीच्या उन्हात
कसे रडू कोसळले.
तिच्या कुशीतला चंद्र
कुठे ढगाआड गेला
अर्धा सोडूनिया डाव,
कसा अर्ध्यात भागला.
तिच्या मिठीतले सुख
आता छातीत रुतते
डोळ्यांमधले पाणी
डोळ्यांमधेच सुकते…!
आयुष्यात प्रेम करायचय मला …
दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला …
माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला …
तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला …
आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला …
ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला …
तिच्यसोबतचे माझे आयुष्य
झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी
तिचा चेहेरा पहात जायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला …
कधी कधी....
वाटतं कधी कधी मलाही
मन मोकळं करावं
बंधनाचे पाश तोडून
लांब कुठे उडून जावं…….
वाटतं कधी कधी मलाही
कोणावर प्रेम करावं
समोरच्याला सगळं देऊन
आपण मात्र रीतं व्हावं……….
वाटतं कधी कधी मलाही
कोणालातरी जिंकावं
लटका राग,गालावर हसू
आणि डोळ्यातच त्या हरवावं……..
वाटतं कधी कधी मलाही
कळी सारखं खुलावं
फुलाच्या त्या सुगंधाने
मन कोणाचं मोहरावं………
वाटतं कधी कधी मलाही
येत्या पावसात भिजावं
थेंबांच्या त्या साक्षीनेच
कुणीतरी आपलं वाटावं………
वाईट तुला वाटणार नाही ना?
मी प्रेम केलं तुझ्यावर तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
झालो वेडा तुझ्याचसाठी तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
जाणीव तुझ्या मनाची, आहे मजला तरीही;
कास प्रेमाची धरली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
माझ्या भावनेचीही कधी, करुन बघ तू किंमत;
अनमोल जर ती ठरली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
राहूदे प्रारब्ध, क्षणभर तरी बाजुला;
आस तुझीच धरली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
तुझ्या आयुष्याचा निर्णय, सर्वस्वी तुझाच आहे;
पण वाट तुझी मी पाहीली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
मी तूझा कोण आहे?
सगळीच नाती जगाच्या
नजरेतून पहायची नसतात
मग त्यात आपलं असं
काहीच उरत नाही
तुझं नी माझं नातं
ही असंच आहे
स्नेहाच्या नाजूक
धाग्यात गुंफ़लेलं
या नात्याला तू
नावात गुंतवू नकोस
कारण इथंवरच
नाती संपत नसतात
मी तूझा कोण आहे?
या प्रश्नाला जरी
उत्तर नसलं तरी
तू माझी आहेस
इतकंच पुरेसं नाही का? —–
टपरी
सन्ध्याकाळची वेळ, सगळे जमायचो,
काँलेज सुटलेकी इकडेच यायचो,
वरती छत नाही, फ़टक्या भीन्ति, दोन चार तुटक्या बाकडी,
अश्या तुटक्या फ़ुटक्या विसाव्याच्या जागेला अम्ही ‘टपरी’ म्हणायचो.
पास, नापास तर कधि अभ्यासाला न्याय,
शेरो शयरी टवाळक्या तर कधी प्रेमचे अध्याय,
ह्या सगळ्या गोष्टिऩ्वर एकच उपाय,
सिगारेट का धुआ और उधार की चाय.
मुव्हि, नाटक, पिकनिकचे तर प्ल्यान बनवीले डिस्कोथेकचे,
कधि बर्थडे बम्प्चे तर अस्वाद घेतले कधि केकचे,
इथेच पराक्रम केलेत आम्ही पोरगी पटविण्याचे,
तर भान्डणात नकाशेही बदलीविलेत अनेकान्चे.
उन्हाळे, पावसळे,हिवाळे गेले,
आणी टपरी प्रेम आमचे वाढतच गेले,
पण एक दिवस टपरी सोडावी लागेल,
या विचाराने मन रडू लागले.
वेळ बदलला काळ बदलला, मीत्रान्चा आता साथ सुटला,
मनात इथली फ़क्त आठवण आहे,
आम्ही नसलो तरी काय झाले,
टपरी अजुणही तशीच सदाबहार आहे.
प्रेमाला उपमा नाही
कारण उपम्याला रवा नाही,
रव्याला गहू नाही,
गव्हाला पाणी नाही,
पाण्याला पंप नाही,
पंपाला पैसे नाही,
पैश्याला नोकरी नाही,
नोकरीला डिग्री नाही,
डिग्रीला शिक्षण नाही,
शिक्षणाला कॉलेज नाही,
कॉलेजला पोरी नाही,
पोरींशीवाय प्रेम नाही,
म्हणून प्रेमाला उपमा नाही.
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…
दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…
आज इथे उद्या तिथे…कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….
शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,
म्हणुन………………..
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….
बरस मेघा
आज खुप बरस
फक्त तुझ्यासाठी बरस
तुझ मन मोकळ करण्यासाठी बरस
लोकांना काय नुसती तुझ्या पाण्याची आस
तुझ्या मनाचा नाही रे त्यांना आसभास
बरस मेघा
आज खुप बरस
अवेळी येऊन बरस
माझ्यासाठी बरस
मलाही तुझ्यासंगे बरसायच आहे
तुझ्या अश्रुंमध्ये माझ्या अश्रुंना लपवायच आहे
बरस मेघा
आज खुप बरस
तुझे अश्रु संपतील इतका बरस
मलाही माझ्या अश्रुंना तुझ्या अश्रुंबरोबर संपवायच आहे
आता पुन्हा कधी अवेळी न तुला बरसायच आहे
कारण आता माझ standard वाढु लागलय…
आता हजार रुपयेही उडवु लागलय
छोट्या दुकानात घुटमळणार् पाऊल
आता ए.सी शोरूम कडे वळु लागलय्….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
पाणीपुरीचा आस्वाद घेणार मन
आता McDonald’s चा pizza खाऊ लागलय्
कसाटा खाण्याऱ्या जीभेवर हल्ली
महागड Ice-cream विरघळु लागलय….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
“वन रूम kitchen”मध्ये राहणार मन
आता प्रशस्त flatसाठी धडपडु लागलय्
लोकलच्या गर्दित धक्का खाता खाता
आता Mercedes-Benz मधुन स्वारी करु लागलय्….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
जे मिळेल त्यात समाधान् मानणार मन
आता थोडं choosy बनु लागलय
स्वप्नात बघितलेल्या दुनियेला खऱ्याआर्थाने
आता प्रत्यक्षाच स्वरुप् येऊ लागलाय्….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
तसं तर् गरीबी आणि श्रीमंतीने
समानतेनेच घरी पाणी भरलय..
पण श्रीमंतिपेक्षा गरिबीमुळे जीवनाला
कसं जगायच हे कळलयं…
म्हनुणच ….
कदाचित मनाप्रमाणे अंगातलही बळ वाढलय….
कारण …..
आता माझ standard वाढु लागलय…
जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं…
रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला ,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला ,
वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं..
कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला ,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला ,
कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं…
तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला ,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला ,
सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं…
निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला ,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला ,
माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..
तिचे मात्र दवासारखे जपले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
वेडात मराठे वीर दौडले सात
“श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपुली वार्ता ,
रण सोडुन सेनासागर आमुचे पळता,
अबलाहि घरोघर खर्या लाजतिल आता,
भर दिवसा आम्हां दिसू लागली रात ”
वेडात मराठे वीर दौडले सात….
ते कठोर अक्शर एक एक त्यातील,
जाळीत चालले कणखर ताठर दील,
“माघारी वळणे नाही मराठी शील,
विसरला महाशय काय लावीत जात?”
वेडात मराठे वीर दौडले सात….
वर भिवई चढली दात दाबती ओठ,
छातीवर तुटली पटबंधाची गाठ,
डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ,
म्यानातुन उसळे तलवारीची पात,
वेडात मराठे वीर दौडले सात….
“जरि काल दाविलि प्रभु गनिमांना पाठ,
जरि काल विसरलो जरा मराठी जात,
हा असा धावतो आज अरि-शिबिरात,
तव मानकरी हा घेवुन शीर करात”
वेडात मराठे वीर दौडले सात….
ते फ़िरता बाजुस डोळे, किंचित ओले,
सरदार सहा सरसावुन उठले शेले,
रिकिबीत टाकले पाय झेलले भाले,
उसळले धुळीचे मेघ सात निमिशात
वेडात मराठे वीर दौडले सात….
आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना,
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना,
छवणीत शिरले थेट भेट गनिमांना,
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात….
खालून आग, वर आग आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्त्र क्रूर ईमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी,
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात….
दगडावर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा,
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा,
क्षितिजावर उठतो अजुन मेघ मातीचा,
अद्याप विराणी कुणी वार्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात….
तु …
जिथे तु आणि मी असेन,
अशाच रम्य सांयकाळी
मी तुझ्याकडे पाहत बसेन…
तु मला सहजच विचारशील
“असा काय पाहतोयस ? ”
तुझ्याच डोळ्यातच बघत सांगेन
“मी तुझाच होउन रहातोय…”
तुलाही मग आवडेल अस
माझं तुझ्याकडे पहाणं,
तुझ्या नजरेत पहाता पहाता
तुझ्याशी एकरुप होऊन जाणं…
तुही स्व:तला सावरु शकणार नाहीस
आणि अलगद मिठीत येउन रहाशील,
ओठ तुझेही तहानलेले असतिल
प्रेमाचा प्याला सहजच घेशील…..
मी त्या दिवसाची वाट पाहीन
मला काळाची खंत नाही,
माझ्या ह्या वाट पहाण्यास
आता एक निश्चित अंत नाही….
आठवणींचं पिंपळपान…
दुरवरच्या शहराचा तो थाट पहात आहे ।
दुरदुर हिरवी पहाटे डोलणारी धरती
झुंजूमुंजू झाले की देवळामधली आरती ।
देवाची ती पुजा तो दरवळणारा धुप
अजुन जाणवतेय मला लाल दुलाईची उब ।
नदी काठचं घर,समोर टाकलेले सडे
उगाच आठवताय मला नदित फेकलेले खडे ।
घरामागचे अंगण,अंगणातले खेळ दिसताय अजुन
माझ्या सवे खेळणारी ताई चाललीय पहा सजुन ।
वेशीवरचं झाड,त्या झाडाची ती सावली
त्या झाडाखालचे देऊळ , ती लोभस गुरुमाउली ।
अजुन बोलावतोय मला ,सुरपारंब्याचा तो खेळ
अजुन भुलवतोय मला ,फुलभुंग्याचा तो मेळ ।
शाळेसाठीची दिसतेय अजुन कच्ची पाउलवाट
वाटेवरली चिंच,शेजारुन वाहणारा तो पाट ।
शाळेची पडकी अजुन तशीच उभी आहे
खिडकीतुन दिसणारया टेकडीची अजुन सुन्दर खुबी आहे ।
पावसाच्या त्या सरी,ती दबक्या मधली पोरं
सरी ओसरुन झाल्यावर धुउन निघालेल वार ।
पानावरुन ओघळनारया टपोरया थेंबाचे ते मॊती
ते वाहणारे पाणी,ती दरवळलेली माती ।
साठलेल्या पाण्यामधे गोल थेंबाची ती चाल
पत्र्यावरचा आवाज तो मधुर सुरताल ।
थंड पाण्याचा तो झरा मला सुचलेल्या ओळी
शेजारी मोकळे ते रान , त्यात शांत गाय भोळी ।
गावापासुन दुर नुसत , गर्दीच ते रान
गावमध्ये जपुन ठेवलय मी……
…………………………आठवणींच पिंपळपान ।