ही कविता प्रेमात तुटुन पुन्हा उभे राहणार्या कोणासाठी तरी आहे…
मला सोडण्यासाठी मी आभारी आहे तुझा……
ओला फ़ाटा असुनहि तेव्हा
मी तुझ्याबरोबर थोडा जळालो होतो
पण जरी आता मी काहीच नाही
तरी एक निखारा होउन उरलोय
स्वतःच्या आतल्या धगधगीला विसरलो होतो
तुझी नाही त्या वार्याची साथ मी घेतोय
त्वेषाने या जीवनाच्या निरंतर अग्निकुंडात स्वतःला उभारतोय
कदाचित तुझ्याबरोबर असतानाच
तुझ्याकडुनच माझी खरी किंमत कळली होती
तुझ्यानंतर मला जीवन वाटायचा कुटणारा खलबत्ता
मला दोन तुकड्यात मोडणारा क्रुर अडकित्ता
पण आता जाणलोय तो तर असतो एक हुकमी पत्ता
फक्त कसा वापरायचा ते मात्र शिकलो नव्हतो
आता जीवनाच्या अमानुष जुगारात मी हर बाज़ी जिंकतोय
वाटले लंगडा जीवनाचा रथ तुझ्यामुळे
वार्याच्या वेगाने धावू लागेल
पण तुझ्या जाण्यानं दाखवुन दिलंस
कदाचित तुलाही त्यासह ओढावं लागलं असतं
आधीच लंगडा तुझ्या ओझ्याने जागीच रुतलो असतो
थोडे दिवस नक्कीच मी रस्ता भटकलो होतो
पण आता ज़ीवनवाटेवर दुःखानेच दंडात दम भरुन धावतोय
आभारी आहे मी तुझा या सगळ्यासाठी
तुझी ना-लायकी वेळेवर दाखवुन दिल्यासाठी
उशीराच का होइना पण मी तुझे आभार मानतोय
तुझ्याबरोबर असताना समाजाच्या चालीरीती मोडत होतो
कळलेय आता केवढ्याश्यासाठी केवढं बाजुला सारत होतो
काही काळच नात्यांच्या धाग्यांचे उपकार विसरलो होतो
पण आता पुन्हा त्याच धाग्यांनी जीवनाची लोकर मी विणतोय
थोड्या धीरानेच आता त्याच्या उबेमध्ये मी विसावतोय………………..
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
ही कविता निलेश सकपाळ ह्याची आहे.. तुम्ही तुमच्या ब्लॉगवर माझ्या नव-याची कविता पोस्ट केलीत ह्याबद्दल मनापासून धन्यवाद...
Post a Comment