तिच्या….

तिच्या काजळ नेत्रांची
नाही उगवली रात्र
तिच्या अधि-या ओठांनी
नाही बहकले गात्र

तिच्या स्वप्नांचे रुपेरी
नाही मेघ पालवले
जागेपणीच्या उन्हात
कसे रडू कोसळले.

तिच्या कुशीतला चंद्र
कुठे ढगाआड गेला
अर्धा सोडूनिया डाव,
कसा अर्ध्यात भागला.

तिच्या मिठीतले सुख
आता छातीत रुतते
डोळ्यांमधले पाणी
डोळ्यांमधेच सुकते…!

0 comments: