आता बरसतोय फक्त तुझ्या आठवणींचा पाऊस

आता बरसतोय फक्त तुझ्या आठवणींचा पाऊस
कधी रप रप कधी रिमझिम
कधी दिवसा ,कधी रात्री
कधी अंधुक पहाटी, तर कधी भर दुपारी
आता बरसतोय फक्त तुझ्या आठवणींचा पाऊस !!

मध्यरात्री पावसाच्या पाण्यानं ओथंबलेली प्राजक्ताची पानं
आणि अलगद उमलु पाहणारा प्राजक्त !
त्याचा मंद सुवास आणि पावसाचा तो लयबद्ध आवाज
आणि अचानक आठवतो तो तुझा निःशब्द सहवास
आणि नकळत पाणावतात डोळे
आता बरसतोय फक्त तुझ्या आठवणींचा पाऊस !!

खिडकीच्या गुलाबी गजांवर तयार झालेले पाण्याचे टपोरे थेंब ,
काही उजवीकड तर काही डावीकड सरकणारे,
काही लगेच खाली पडणारे, तर काही अगदी हळू !
आपल्या दोघांच्या भांडणान्सारखे !
कधी क्षणात मिटणारे, तर कधी पुढच्या कितीतरी
दिवसांतल्या प्रत्येक क्षणाला झुरायला लावणारे !!

तसं आता थेम्बांतून दिसणारा पलीकडचा निसर्ग
लुप्तच होत चाललाय जणू !
थेम्बही लुप्त होतील !!
पाऊसही निघून जाईल !!!
बरसतील फक्त तुझ्या आठवणी
माझ्या अश्रूंच्या पावसातून !!!!!

0 comments: