वाढदिवसांची कैक अर्थानं उपयूक्तता असते
ज्याचा जास्त साजरा झाला तितका माणूस
अधिक वर्ष जगला असं गणित सांगते
सुर्यप्रदक्षिणेच्या सहलीचा पहिला दिवस,
तसं म्हणायला ३६५ दिवसांची वारी असते
आतापर्यंत सरलेल्या संपूर्ण आयूष्याचा
ताळेबंद जमाखर्च मांडण्यातच रात्र सरते
नकळत निसटलेले सुख-दुःखाचे क्षण
वेचता वेचता अगदी पुरेवाट होत असते
आयूष्याचा प्याला अर्धा रिकामा म्हणावा
कि भरलेला अशी संभ्रमावस्था असते.
जीवनाची पोथी खूप वाचून झालेली असते
आता थोडीशीच राहिली, विचार मनी येताच
दोन्हीही डोळ्यांची कडा ओली झालेली असते
आपल्या नजरेत आणखी वयं वाढलेले असते
नियती मात्र राहिलेली वर्ष कमी करत असते
एखाद्या चोरासारखी हळूच डेरेदार वृक्षाची
एकेक बहरलेली फ़ांदी तोडून नेत असते
आयूष्याच्या ग्रंथाला कडू-गोड अनुभवांचे
आणखी एक सोनेरी पान जोडलेले असते
विनाकारण मग पोक्तपणाची भावना बळावत असते
ललाटीचे प्राक्तन जसे आनंदावरचे विरजण असते
अशावेळी आजच्या वयाला दोनानं भागायचे असते
म्हणजे एकाच वेळी दोन लहान मुलं अन एका मोठ्या
व्यक्तीसारखं बिनदिक्कत वागायला काहीच अडचण नसते
हात सुटले तरी मैत्रीची कास सोडायची नसते.
गेलंच सोडून कूणी, हृदय अवजड करायचे नसते ———–
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment