एक रात्रीचे दुसर्‍या रात्रीवर प्रेम जडले…..

एक रात्रीचे दुसर्‍या रात्रीवर प्रेम जडले…..
कसे अजब घडले,
एका रात्रीचे दुसरीवर
प्रेम जडले

कोणा न कळले
मग कशा कोणा
दिवसाने त्यांना सांधले

जाणुन चुकले
जिथे मनतार जुळले
स्पर्शाविण काही न अडले

सुर्यामुळे दुरावले
विरहाने घट्ट केले
मग त्याचेच आभार मानले

माझ्याही मनात
रात्रीचे अभिराज्य आहे
आता दुसर्‍या रात्रीसाठी ते थांबले…………..

1 comments:

Anonymous said...

ही कविता निलेश सकपळ ह्याची आहे.. तुम्ही तुमच्या ब्लॉगवर पोस्ट केलीत ह्याबद्दल मनापासून धन्यवाद...