तू ...

तू

नदीकाठी वाळूवर चंदेरी
लाटांनी लहरत लोळण घ्यावी
फुलपाखराने फुलावर बसावे अलगद
तसा तू कधी जवळ आलास कळलेच नाही....

कुठे दूरवर अनोळखी तू
भिरभिरत होतास कुठल्या प्रदेशात
पण कधी नकळतच
स्पर्श करून गेलास कळलेच नाही....

नव्हती कधी दृष्टभेट
नव्हता जाणवला तुझा हवेतला दरवळ
पण मनाचा मनाशी
कधी संवाद घडला कळलेच नाही .....

मनात सतत गुंजारव
तुझ्या शब्दलहरींचा
सतत तरंगत राहणारी
तुझ्या आठवणीची वलय ....

अशा अनोळखी मनांची
कशी होते ओळख
आणि अवचित कशा
होतात गाठीभेटी कळतंच नाही....

एवढे मात्र कळते आहे
काहीतरी घडते आहे
मनाच्या कानाकोपर्यात
काहीतरी निनादाते आहे ....

संगीताची सुरावट, रंगांचे फटकारा
किंवा मनावर ओठांची फुंकर
डोळ्यापुढे काही तरळते आहे
हृदयात काही उमलते आहे.....

0 comments: