मन शांत का बसते हे का कधी काळात नाही,
मन सैरावैरा धावते ते का कधी थांबत नाही,
मन बेचैन होते ते का मला कधी सांगत नाही,
मन रागवाले हेच मला कधी उमजत नाही.
मनावर माझ्या ताबा नाही हे का लोकांनी सांगितल्यावर मला कळते,
मनाच मी ऐकत नाही हे का मला लोकांनी सांगावे लागते,
मनानि माझ मलाच का चांगले सुचत नाही हे ही लोकांनी सांगितल्यावरच मला का कळते,
मनावर विसंबून राहू नकोस हे ही हेच लोक मला सांगतात.
मनास मारुन मारुन मी आता थकलो,
मनात झुरून झुरून मी आता खचलो,
मनास दाबून दाबून मी आता टेकलो,
मनात विचार करून करून मी आता संपलो.
आता मी ठरवले आहे,
या मनाला मोकळे सोडून द्यायचे,
या मनाला स्वच्छंद फिरू द्यायचे,
या मनाला अंकुश नाही कुणाचा,
मन सांगेल तसेच करायचे,
मन सांगेल तसेच करायचे
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment