का अशी करतेस ...

का अशी करतेस
का माझी परीक्षा घेतेस
हे माहीती असुन तुला
प्रेम करतो तुझ्यावर
का माझ्या बोलण्याची वाट बघतेस
का ग सखे का अशी करतेस

प्रेम तुझ्यावर एवढे करतो
की न एइकन्यास जीव घाबरतो
म्हणुन सखे माझ्या बोल्न्यास विलंब होतो
म्हणुन सांगतो, का बोलण्याची वाट बघतेस
का ग सखे का अशी करतेस

का ग अशी छळतेस
उमजुन आलेच असेल तुला
जपतो कीती मी हृदयात तुला
माहीती असेलच तुला
प्रेम म्हणतात ह्याला
मग का अशी करतेस
का ग सखे का अशी करतेस

प्रेम हे व्यक्त करने जरूरी आहे का
गहरा भाव मझ्या डोळयातला समजत नाही का
माझे खरे प्रेम असेल
तर तुला जरूर उमजेल
आणी उमजले आहेच
तरी अशी करतेस
का ग सखे का अशी करतेस?

आठवत का गं आई?

आठवत का गं आई?
ती चिमणी इवली
चिव चिव देत होती आरवली
हळुच चिमणताईच्या शिरुन पंखांत
निर्धास्त विसावली ती चिव चिव

आठवत का गं आई?
निक्कीसारखाच टिकल्यांचा
पाहिजे होत मला ड्रेस........
दिवसभर तुला दुकांनात फिरवल
आणि तुझी परी होउन
घरभर मिरवलं........
रात्री तुझ्या कुशीत अशीच मी निजले!
मेघाकडे पाहत होती चातकांची ही वंशावेल
एक एक धारा म्हणाले मीच टिपेल........
टप टप पडले थेंब आईने शिकवले
चोचीने नभ मोती झेलायला.........

आठवते का गं आई?
"ही माझ्या आजीची माळ" तु सांगितलं
छोटं मन वाक्याने किती भांडावल.....
ती सर आणि बाहुली
किती भातुकली खेळले
काळच्या ओघात माळ तुटली.......
तरी मोती ओंजळीत मी जपले!

मन ...

मन शांत का बसते हे का कधी काळात नाही,
मन सैरावैरा धावते ते का कधी थांबत नाही,
मन बेचैन होते ते का मला कधी सांगत नाही,
मन रागवाले हेच मला कधी उमजत नाही.

मनावर माझ्या ताबा नाही हे का लोकांनी सांगितल्यावर मला कळते,
मनाच मी ऐकत नाही हे का मला लोकांनी सांगावे लागते,
मनानि माझ मलाच का चांगले सुचत नाही हे ही लोकांनी सांगितल्यावरच मला का कळते,
मनावर विसंबून राहू नकोस हे ही हेच लोक मला सांगतात.


मनास मारुन मारुन मी आता थकलो,
मनात झुरून झुरून मी आता खचलो,
मनास दाबून दाबून मी आता टेकलो,
मनात विचार करून करून मी आता संपलो.


आता मी ठरवले आहे,
या मनाला मोकळे सोडून द्यायचे,
या मनाला स्वच्छंद फिरू द्यायचे,
या मनाला अंकुश नाही कुणाचा,

मन सांगेल तसेच करायचे,
मन सांगेल तसेच करायचे

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

बाकी काही नाही
हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही

"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......"