मला कळतच नाही कधी ,
माझा कुठला रंग आहे,
कधी मी ढगातला कापूस ,
कधी समुद्रातील तरंग आहे.
मला कळतच नाही कधी,
माझ कुठल गाव आहे,
कधी सुखाच्या महालात पडून,
कधी निराशेच्या वस्तीत निभाव आहे .
मला कळतच नाही कधी ,
मला हवे काय आहे ,
कधी नाविन्याचे वेड मला,
कधी जुन्या आठवनीत पाय आहे .
मला कळतच नाही कधी ,
जीवन म्हणजे काय आहे ,
शोध आणि प्रवास नेहमी ,
हेच माझे ध्येय आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment