तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं.....

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं.....
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात

मला कळतच नाही कधी

मला कळतच नाही कधी ,
माझा कुठला रंग आहे,
कधी मी ढगातला कापूस ,
कधी समुद्रातील तरंग आहे.

मला कळतच नाही कधी,
माझ कुठल गाव आहे,
कधी सुखाच्या महालात पडून,
कधी निराशेच्या वस्तीत निभाव आहे .

मला कळतच नाही कधी ,
मला हवे काय आहे ,
कधी नाविन्याचे वेड मला,
कधी जुन्या आठवनीत पाय आहे .

मला कळतच नाही कधी ,
जीवन म्हणजे काय आहे ,
शोध आणि प्रवास नेहमी ,
हेच माझे ध्येय आहे.

मैत्री अशीच आसावी कधी न संपणारी...

रातोरात रडवणारी, आसवाणी भीजवणारी
हृदयात प्रेमाच नव घर करणारी मैत्री

मैत्री आकाराने लहान
पण अर्थाने मात्र महान असते

रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नाती बरी असतात
कारण ती रक्ताच्या नात्याइतकीच खरी असतात

मैत्रीत नसते वस्तुंची देवाण-घेवाण
मैत्रीत असते भावनांची जान

मैत्री नसावी सूर्यासारखी तापणारी
मैत्री असावी सावलीप्रमाणे शांत करणारी

कळतनकळत आपल्या सुख-दुखात सामवणार डोळ्यात
अश्रू जागवणार जेव्हा कोणी भेटत तेव्हा जीवनाचे अर्थच बदलतात

मैत्रीत घालवलेला प्रत्येक क्षण असतो अनमोल
मैत्रीत असतो मनमनाचा समतोल

मैत्री अशीच आसावी कधी न संपणार.......