आयुष्य सुंदर आहे
मित्रा,
खरंच आयुष्य सुंदर आहे
सुर्य जेव्हा आकाशात
तळपत असतो रागाने ,
इवलसं फ़ुल सांगतं त्याला
"पहा पण प्रेमाने !"
ढग जेव्हा दु:खी होतात
आणि बरसू लागतात धारा!
ढगाच्या दु:खावर तेव्हा
फ़ुंकर घालतो वारा !
चंद्र एकटाच पडतो आकाशात
दर्दभरी गात गाणी !
चांदण्या चमकत सोबत करतात
उत्साहाची भरुन वाणी!!
पानं, फ़ुलं, झाडं सारी
तुझ्यासाठीचं गात आहेत,
ओढे, नद्या, नाले, सागर
तुझ्यासाठीच वहात आहेत !
खरंच आयुष्य सुंदर आहे,
बघ जरा डोळे उघडून !
बघ एकदा तरीही
आनंदाचं गाणं गाऊन !!
मी जसा आहे, तसा आहे
सिंह भासे मी कुणा केंव्हा
श्वानही बोले कुणी केंव्हा
बोलती कोणी ससा आहे
मी जसा आहे, तसा आहे
जे कुणा बोलायचे बोलो
जे कुणा वाटायचे वाटो
(मोकळा त्यांचा घसा आहे!)
मी जसा आहे, तसा आहे
रोखली माझी मुळे त्यांनी
तोडल्या फांद्या जरी त्यांनी
अंबरी माझा ठसा आहे!
मी जसा आहे, तसा आहे
कोष मी फोडेन दंभाचा
गर्भ मी जाणेन सत्याचा
घेतला हाती वसा आहे
मी जसा आहे, तसा आहे
खरंच आयुष्य सुंदर आहे..!!!!! ...............
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment