हिंदी नको, इंग्रजी हवी ! ?

नमस्कार!

काही दिवसांपूर्वी सुवर्णमयी यांनी खालील प्रश्न व्य. नि. पाठवून विचारला होता. त्याला दिलेले उत्तर इथे थोडे संपादित करून चर्चेसाठी मांडत आहे.

आपले मत इंग्रजी चालेल पण हिंदी नको हे तितकेसे पटले नाही.

महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे आणि एक परदेशी भाषा चालेल म्हणण्याआधी केवळ राष्ट्रभाषा म्हणून इंग्रजी ऐवजी हिंदीचा वापर केला तर चालणार नाही का?

नाही.

पहिली गोष्ट - हिंदी ही 'राष्ट्रभाषा' हा चुकीचा समज़ व चुकीचा शब्दप्रयोग आहे. भारतीय संविधानात कोणतीही एकच एक भाषा अशी राष्ट्रभाषा म्हणून दिलेली नाही. आठव्या अनुसूचीत मराठीसह बावीस भाषा या scheduled languages म्हणून आहेत त्या सर्व राष्ट्रभाषाच आहेत. इंग्रजी व हिंदी या फक्त संघराज्याच्या 'कार्यालयीन भाषा' (official languages) आहेत.

दुसरी गोष्ट - तमिळनाडू व नागालँडमधील लोकांना इंग्रजी ही ज़र परकी भाषा असेल तर हिंदी हीही तितकीच परकी आहे. भारतातील पन्नास टक्क्यांहून कमी लोक हिंदी बोलतात. म्हणजे हिंदी ही तर बहुसंख्यांचीही भाषा नव्हे! केवळ निवडणुकीत मतदान करणाऱ्यांपैकी जास्ती लोकांचा पाठिंबा असल्याने जिंकून येण्यातला हा प्रकार आहे. आणि हे असे होण्याचे कारण जेव्हा कार्यालयीन भाषा ठरवली गेली तेव्हा अनेक उमेदवार भाषा होत्या. आज़ही ज़र केवळ हिंदी व इंग्रजी अशा भाषांमधून निवडायची वेळ आली, तर इंग्रजी सहज़पणे जिंकेल! (आणि इंग्रजी पंधरा वर्षेच वापरण्याची मूळची तरतूद सतत मुदतवाढ मिळवत आज़ 62 वर्षे झाली तरी इंग्रजी ही अधिकृत कार्यालयीन भाषा म्हणून संविधानात आहे हे त्याचेच निर्देशक आहे!)

तिसरी गोष्ट - इंग्रजी ही भारतासाठी परकी भाषा आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. (आणि मी इथे भारत म्हणून फक्त उत्तर भारताचा आणि महाराष्ट्राचा विचार मांडत नाही, तर दक्षिण व पूर्व भारताचाही समावेश करत आहे. अंदमान किंवा मिज़ोराम किंवा तमिळनाडू किंवा प. बंगाल यांच्यासाठी हिंदी अधिक परकी की इंग्रजी? हिंदी अधिक जुन्या परिचयाची की इंग्रजी?)

चौथी गोष्ट - महाराष्ट्रासाठी हिंदीला प्रेमाने आलिंगन देत राहाणे हे ऐतिहासिकदृष्ट्या नेहमीच तोट्याचे ठरत आले आहे. केवळ मराठी हीच अशी भाषा आहे की जिची लिपी हिंदीशी ज़वळपास तंतोतंत ज़ुळते. त्यामुळे हिंदीभाषकांना महाराष्ट्रात व्यवहार करणे अत्यंत सोपे ज़ाते. परिणामतः त्यांना इथे राहाताना मराठी न शिकणेही सहज़ चालून ज़ाते, आणि त्यांना स्थलांतरे करण्यासाठी

0 comments: