कळल्याशिवाय राहणार नाही…

लाख विनवण्या केल्या तरी
माझं प्रेम नाही तुला उमजत
आसवांची किम्मत खरच
गळल्यशिवाय नाही कळत

सुरुवातीला वाटत होतं
तुला समजतील माझे भाव
नजरेतुनच घेशिल तु
माझ्या मुक्या शब्दांचा ठाव
तुझ्या माझ्यातलं अंतर मग
अगदीच शुल्लक ठरेल
मनामधे तुझ्या
प्रेमाची एक ज्योत तेवेल
प्रेम तुझं दिसलं मला
भावही कळले मला
अन क्शणा क्शणाला बदलणारे
तुझे वेडही उमगले मला

कशाला आता शब्दांचे खेळ मग
कशाला आता वेडी आस
पुर्ततेआधिच अपुरे राहिले
तुझ्यात गुन्तलेले माझे श्वास
तरीही मी आशा सोडली नाही
आस मनीची सुटली नाही
तुझ्या शब्दांना झेलनारी
ओंजळ माझी तुटली नाही

आज त्यात जमा आहेत
माझे वेडे अश्रु
तेही आटुन जातील
संपतील वाट पाहुन
पण थांबणार नाही क्शणभरही
माझ्या मनातलं काहूर
सुटतील बांध…
तुटतील श्वास …
पण तुझी वाट पाहील
माझी वेडी आस….

लक्शात ठेव शब्द माझे
स्मरतील तुला एकांतपणी
लढशील कसाही
सावरशीलही….
पण एक अश्रु तुझ्या डोळ्यातुन
गळल्याशिवाय राहणार नाही
माझ्या प्रेमाची किंमत तुला
कळल्याशिवाय राहणार नाही…

माझ्या प्रेमाची किंमत तुला
कळल्याशिवाय राहणार नाही…

♥ तुला लाजण्याच कारणच काय ? ♥

स्वप्नात अजुन मी आलोच कुठे ?
तुला भ्यायचं कारणच काय ?
अजुन तुही अगदी दूर माझ्या ?
तुला शंकेच कारणाच काय ?
अजुन नजरेला नजर भिडलीच कुठे ?
तुझ्या गालांवर गुलाबाच कारणच काय ?
अजुन हनुवटी तुझी, मी उचललीच कुठे ?
डोळे बंद करण्याचे कारणच काय ?
अजुन हातात हात तुझा घेतलाच कुठे ?
तुला नजर झुकवण्याच कारणच काय ?
अजुन ओठांना ओठ भिडलेच कुठे ?
तुला लाजण्याच कारणच काय ?

एका महिन्यानंतर …….

आज पुन्हा मी कवितेंच्या
देशात येत आहे
झाले गेले विसरुन झाले
पुन्हा इथे परतत आहे

झाले गेले खुप झाले
पुन्हा त्यावर विचार नाही
आता ठरवलंय मी आयुष्यात
मागे वळुन पहायचे नाही

राखेतुन हा फिनिक्स पक्षी
जोमाने उभा राहणार आहे
पहिल्यापेक्षा अधिक प्रभावीपणे
कागदावर लेखणी चालवणार आहे

कुणी कुणाचे नसते
हेच खरे आहे
जिथे अश्रुंनाही किंमत नसते
तिथे त्यांना ढाळण्याची काय गरज आहे

अश्रुंचे खेळ बंद करुन
आता जोमाने चालण्याची गरज आहे
कारण नवे क्षितीज खुणावतंय
मला तिथवर पोहोचायचे आहे

अचानक कधीतरी….

सुखाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलायचं
प्रेमाच्या वर्षावाने, न्हाऊन निघायचं,
काळजी, द्वेष, सारं फेकुन द्यायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.

आपलं अस्तित्व या दुनियेत पहायचं,
आपलं महत्वं कुठे आहे का, हे सतत शोधायचं,
आपल्या प्रियजनांना नेहमीच जपायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.

आपलं सारं कही, क्षणात दुसर्‍याला द्यायचं
एकदा दिल्यावर मात्र परत नाही मागायचं,
गोड आठवणींना, मनात आपल्या साठवायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.

पण? पण अजून मला बरंच काही पहायचंय
या दुनियेकडुन, खूप काही शिकायचयं,
इथे, मलाही काहीतरी बनायचयं
म्हणून मला अजून, भरपूर जगायचं ….भरपूर जगायचं …..भरपूर जगायचं …..

आयुष्याची पहाट...

अंधारातील प्रत्येक क्षणात मी
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली

सकाळच्या दवथेंबामध्ये
गुलमोहोर मी साठवला
वारयाच्याही कानात मी तेव्हा
आत्मविश्वास जागवला
समोर दिसत नाही म्हणून मी
अश्रुनींही दिवे पेटवले
हात जेव्हा भाजले तेव्हा
त्यांनीच मला सावरले

उष्ट्या रक्ताच्या समारंभातही मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असातानाही मी
गरुडझेप दाखवली

सर्व ऋतु खेळून गेले
तीन पत्तीचा डाव
वादळही सांडून गेले
एक रडीचा डाव
उठतांना पंगतीतून पण
सारी आधी उठून गेली
डोळे उघडून बघण्याआधीच
वीज कडाडून निघून गेली

मुठीत ह्रदय आवळण्यात मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली

अस्तित्वाच्या संघर्षातही
उणे काहीच नव्हते
अंधारातील प्रत्येक वणव्यात
हात मात्र हातात होते
क्षणाक्षणातील प्रत्येक युगात
साथ मला भरपूर होती
प्रत्येक एका अमवस्येला
चांदण्यांची बरसात होती

दोन मनांच्या भेटीगाठीत मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली

तरीही असे का वाटते
हरवले असे का वाटते
कातरवेळी आज का
दवथेंबाचे वावगॆ वाटते
का आज नशीबाचे पाउल
मलाच थोडे उजवे वाटते
का आज दिव्यामध्ये
पतंग होऊन मरावेसे वाटते

याच उत्तरांच्या मूळ प्रश्नात मी आज
एक पहाट जागवत आहे
“होते” आणि “आहे” यामध्येच
गरुडझेप आठवत आहे