आठवेन मी तुला..

आठवेन मी तुला..
सोडून तुझ्या काळजाला जाईल, तेव्हा मी आठवेन तुला
काळजाला छातीत शोधशील तेव्हा आठवेन मी तुला..
येईन लपत छपत रोज रातीच्या स्वप्नात तुझ्या,
तेव्हा झोपेत स्मित हसताना आठवेन मी तुला..
माझ्या अल्लड प्रेमाला एकदाच विसरून तु,
दुसर्‍या कोणाला करशील प्रेमात घायाळ , तेव्हा आठवेन मी तुला..
दोस्तांच्या गर्दित गप्पा मारता मारता रुसशील तू,
तेव्हा तुझ्या रुसव्यातूनच आठवेन मी तुला…
माझ्या तस्विरीला डोळ्यातून मिटवण्यासाठी करशील प्रयत्न,
तेव्हा सलत्या पापण्यातून ओघळताना आठवेन मी तुला…
निरव शांततेच्या रातीला , खिडीकीतून पाहशील जेव्हा,
तेव्हा तुझ्यावर ह्सणार्‍या चंद्राला पाहून आठवेन मी तुला..
पुन्हा पुन्हा पावसात ओली चिंब होशील तू,
तेव्हा एकांताच्या सरी अंगावर झेलताना आठवेन मी तुला..
आता प्रत्येक सुखाचा आंनद अनुभवताना,
दुरवर मला शोधून थकशील तू अन आठवेन मी तुला..
निलपरीच्या त्या पोषाखात सज़ून , मोकळ्या केसात
तुझे हात फिरताना आठवेन मी तुला..
तुझ्याच नावाने लिहिल्या सार्‍या गझल,
आता वाचताना होशील भावूक तेव्हा शब्दांतून आठवेन मी तुला..

यात काही पाप नाही

सिगरेटचा जेव्हा तुम्ही, मजेत घेता मस्त झुरका,
आवडलेल्या आमटीचा, आवाज करीत मारता भुरका,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
जबरदस्त डुलकी येते, धर्मग्रंथ वाचता वाचता,
लहान बाळासारखे तुम्ही, खुर्चीतच पेंगू लागता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
देवळापुढील रांग टाळून, तुम्ही वेगळी वाट धरता,
गरम कांदाभजी खाऊन, पोटोबाची पूजा करता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साद देता,
कवितेच्या ओळी ऐकून, मनापासून दाद देता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !

मंगेश पाडगांवकर

जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा , कृष्ण कोयना , भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो , शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला , निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो , महाराष्ट्र माझा
===========================================

कवि - राजा बढे
संगीत - श्रीनिवास खळे
गायक - शाहीर साबळे

जीव दंगला गुंगला रंगला असा.....


जीव दंगला गुंगला रंगला असा

पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

पैलतीर नेशील
साथ मला देशील
काळीज माझा तू

सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनावाचा चांद तू

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

चांद सुगंधा येईल
रात उसासा देईल
सारी धरती तुझी
रुजाव्याची माती तू

खुलं आभाळ ढगाळ
त्याला रुढीचा ईटाळ
माझ्या लाख सजणा
हि काकाणाची तोड माळ तू
खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन
तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचा गोंधळ

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू
===============================================
चित्रपट : जोगवा
स्वर: हरिहरन आणि श्रेया घोशाल
संगीत : अजय अतुल