लक्षात नसलेला बाप

वडिल बाबा पिता लिह्न्यास बोलन्याश खुप चांगल वाटत पण अपन जानुन बुजुन शब्द उचारतो तो म्हणजे बाप...बाप होय बाप ! त्याच बापाविशायी काही
आई घराच मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व पण खरच या अस्तितवाला कोणी समजुन घेतलय का ? वडीलांना महत्वं असून त्यांच्या विषयी जास्त बोलल जात नाही लिहल जात नाही कोणताही व्यखता आई विषयी जास्त वेळ बोलत बसतो संत महत्म्यानी आईच्च महत्व अधिक सागितले आहे देवाधिकानी आईच कौतुक तोंड भरून केल चांगल्या गोष्ठिना आईची उपमा दिली जाते पण बापा विषयी कुठच कही बोलल जात नाही. लोक बाप रेखाटतात पण तोही तापत, व्यसनी, मारझोड करणारा सामाज्यात एक दोन टक्के बाप असे असतील पण चांगल्या वडीलां विषयी काय?
आईकड़े अस्रुंचे पाट असतात पण बापाकडे सयंमाचे घाट आसतात आई रडून मोकली होते पण सांत्वन वडीलांनाच काराव लगत अणि रडनारा पेक्षा सांत्वन करनारावर जस्ता तान पडतो कारण ज्योति पेक्षा समइच जास्त तापते ना पण श्रेय मात्र ज्योतीलाच मिलते रोजचा जेवण करणारी आई लक्षात राहते पण शिदोरिची सोय करणार बाप आम्ही किती सहज विसरून जातो आई रडते पण बापाला रडता येत नाही स्वतःचा बाप मेला तरी रडता येत नाही कारन भावंडाना जपयचं असत आई गेली तरी रडता येत नाहि कारण बहिनिंचा आधार व्हायच असत पत्नी अर्ध्यावत सोडून गेली तरी अस्रुना आवर घालावा लागतो
जिजाउने शिवाजी घडवला पण शाहजी राज्यांची ओड़ातान लक्षात घ्या देवकीच यशोदेच कौतुक काराव पण पुरातून पोराला डोक्यावर घेउन जाणारा वाशुदेव लक्षात ठेवावा. वडिलांचा टाचा झिजलेल्या चापलानकडे पाहील की त्यांच प्रेम कळत त्यांची फाटकी बनियान पाहिली की आपल्या नशिबाची भोक तांच्या बनियानला दिसतात.
मुलीला कपडे मुलाला कपडे घेतील पण स्वतः मात्र जुनी प्यांट वापरायला काढतिल मुलगा सलून मधे २५ रुपये खर्च करतो मुलगी पारलर मधे ३० एक रुपये खर्च करते पण त्याच घरातील बाप दाढ़ीचा साबन संपला म्हणून अंनघोलीच्या सबनाने दाढ़ी करतो. अनेकदा तो नुसत्या पाण्याने दाढ़ी करतो
बाप अजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही तो अजराला मुलीच घाबरत नाही पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते कारन पोराच शिक्षण मुलीच लग्नं घरात उतपनाच साधन दुसर नसत.
ज्या घरात बाप आहे घरात वाइट नजरेने कोणी बघत नाही कारन घरातला करता जिवंत असतो तो जरी काही करीत नसला तरी तो त्या पदावर असतो अणि घराच कर्म बघतो
चटका बसला ठेच लागली फटका बसला की आईग!! हा शब्द बाहेर पडतो पण हायवेवर रस्ता ओलांडताना एखादा ट्रक जवळ येउन अचानक ब्रेक लावतो तेव्हा बापरे!! हाच शब्द बाहेर पडतो कारन लहान संकटांना आई चालते पण मोठी मोठी संकटे पेलताना बापच अटवातो. काय पटतय ना? कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नाही पण गरीब मुलीच्या घरी उभ्या उभ्या का होइना चक्कर मारतो. तरुण मुलगा उशिरा घरी येतो तेव्हा त्याचा बापचं जागा असतो.
मुलाच्या नोकरी साठी साहेबानपुड़े लाचार होणारा बाप मुलीच्या स्तलासाठी उम्बर्ठे झिझवानारा बाप घरासाठी स्वतःच्या व्यथा दड़पनारा बाप खरच किती ग्रेट असतो ना ? लहानपणी बाप गेल्यावर अनेक जबाबदारया पेलाव्या लागतात त्याना एका एका वस्तुसाठी तरसावं लागत वडिलान्ना समजुन घेते ती त्या घरची मुलगी वडीलाना जानते जपते
इतरांनी सुधा किमान आपल्याला जानवं हेच प्रतेक बापाला वाटत

फालतू विनोद

============================================================
फालतू विनोद:
============================================================


============================================================

एकदा ४-५ सरदारजी एका बँकवर दरोडा टाकायला जातात. बँकेचा दरवाजा तोडून आत
गेल्यावर त्यांना दिसतं की बँकेत पैसे नाहीएत पण रेड वाईन च्या भरपूर
बाटल्या आहेत. ते खुश होऊन शक्य तेवढं पितात आणि उरलेल्या बाटल्या बरोबर
घेऊन जातात.
.
....
.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी येते:
.
.
.
"Blood Bank" वर दरोडा!



============================================================


पहिला मित्र: ४ दिवस महाबळेश्वर ला चाललोय रे...

....रस्त्यात बायकोला दरीत लोटून देणार आहे...
...
दुसरा मित्र: सही...माझी पण घेऊन जा, तिलापण दे ढकलून..

पहिला मित्र: hmm ... तिला येताना टाकतो


============================================================


आई: अरे सुहास ऊठ. तुला कॉलेजला जायचे आहे ना?
सुहास: आई मी आज कॉलेजला नाही जाणार
आई: सुहास तुला जावच लागेल
सुहास: नाही मी नाही जाणार
आई: मला दोन कारणे सांग तुला का नाही जायचं
सुहास: सगळी मुलं माझा राग करतात. सगळे शिक्षकही माझा राग करतात
आई: चल ऊठ आणि तयार हो
सुहास: मला २ कारणे सांग,मी कॉलेजला का जावं
आई: १: तुझं वय आता ५५ वर्षे आहे आणि २: तू कॉलेजचा प्राचार्य आहेस


============================================================


एक स्त्री तिच्या नवऱ्याला म्हणते..." अहो ही जेनी कोण आहे हो ?'

नवरा ..(थोडासा घाबरत )..." अगं जेनी हे एका कुत्र्याच्या पिल्लूचे नाव आहे....आपण लवकरच ते विकत घेणार आहोत..."

बायको..." असं होय...अहो त्या कुत्रीचा सकाळपासून ५ वेळा फोन येऊन गेला तुमच्यासाठी "...


============================================================


Sentimental PJ : लाईट बिल खूप जास्त आल्यामुळे चिडून आई पिटूला ओरडत असते ....

आई: काय रे, एवढं बिल कसं काय आलं? सारखे का लाईट चालू ठेवतोस???

पिटू: यूँ तो मैं बतलाता नहीं.....पर अँधेरे से डरता हूँ मैं माँ !!!! तुझे .. सब है पता है ना माँ ?



============================================================


प्रेम होतं का करावे लागते---
मुलगी सुंदर आणि Honda activa वर असेल तर होते..
आणि Honda City चालवत असेल तर करावे लागते

============================================================



एक मुलगा कर्वे रोडवरून प्रचंड जोरात गाडी चालवत होता....एक माणूस त्याला म्हणतो ..."काय कर्वे ??".....
तो मुलगा गाडी स्लोव करून म्हणतो.." माझे आडनाव कर्वे नाहीये ..."
तो माणूस : " मग बापाचा रस्ता असल्यासारखा गाडी का चालवतोस ??"


============================================================


एक सिंहाने जर तीन वेळा डरकाळी फोडली ................तर त्या नंतर काय होईल......................................
.तुम्हाला माहित आहे.......आठवा ....आठवा......
अरे simple ......
.............TOM & JERRY चालू होईल

============================================================

भिकारी आणि जोशी काका
भिकारी: साहेब काहीतरी खायला द्या.चार दिवस उपाशी आहे.
जोशी काका: थांब हा.बघतो घरात काही आहे का खायला. [पाच मिनिटानी] तुला एक दिवस शिळी पोळी-भाजी चालेल?
भिकारी: [आनंदाने] होय साहेब .चालेल की.
जोशी काका: ठीक आहे मग उद्या दुपारी याच वेळेला ये. आज ठेवून देतो उद्यासाठी

============================================================

एक भिकारी जोशी काकांना : मालक एक रुपया द्या.....तीन दिवसापासून काही खाल्ले नाही ....
जोशी काका (खोचकपणे) : अरे ३ दिवसापासून उपाशी आहेस तर मग एक रुपयाचं काय करशील ?
भिकारी तेवढ्याच खोचकपणे: वजन करून बघेन किती कमी झालंय ३ दिवसात


============================================================


एकदा रवींद्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू आणि जयप्रकाश नारायण एका बोटीतून जात होते ....
अचानक वादळ येतं आणि बोट बुडते (कुणालाच पोहता येत नसतं) ..बाकी २ जण बुडतात पण फक्त रवींद्रनाथ टागोर वाचतात ...
का ?????...........................................
कारण ......................................................................
.त्यांना वाचायची आवड असते

============================================================

पप्याचे बाबा FTV बघत असतात..अचानक पप्या येतो तर परिस्थिती सांभाळण्यासाठी ते म्हणतात...अरे गरीब मुली आहेत या....कपडे घेण्यासाठी पैसे नसतात यांच्याकडे... तर पप्या म्हणतो..."यांच्यापेक्षा अजून गरीब मुली आल्या तर मला पण बोलवा..."

============================================================

एक मुलगा आपल्या मित्राना आग्रहाने घरी घेउन आला....
म्हणाला तुम्ही बसा मी चहा घेउन येतो ...... . . . . .
10 मिनीटा नंतर ....... . . .
चला ....घेतला मी चहा.

============================================================

एक पोपट ट्रक ला धड़कला ......अणि बेशुद्ध झाला ......
ट्रक मालकाने त्याला घरी नेउन पिंजर्यात ठेवले ..........
शुद्धीवर आल्यावर पोपट: "च्या मायाला डायरेक्ट जेल !!!! ड्राईवर मेला की काय ?



============================================================

शिवा एकदा जन्मला होता अफझल त्यानेच फाडला होता

शिवा एकदा जन्मला होता अफझल त्यानेच फाडला होता
भारतीय संसदेवर हल्ला करुनहि हिरो ठरु पहाणार्या अफझलला आणि त्याला फाशी न देणार्याना शतशाः प्रणाम.
हीच लायकी आमुची
धर पुन्हा वेठीस आम्हा
हीच पायरी आमुची
जा पुन्हा तुडवुन आम्हा
शिवा एकदा जन्मला होता
अफझल त्यानेच फाडला होता
नकोस घाबरु गडया तूं
आमचा तो इतिहास होता
ठेव लिहुन अनुभव तुझे
नक्किच त्यानाहि भाव येईल
न जाणो उध्याचा इतिहास
हिरव्या शाईने लिहीला जाईल
देशद्रोह केलास तूं
नको गाळुस हात-पाय तूं
देशद्रोह केलास तूं
आंता शहीद ठरशिल तूं
गल्लीबोळात भाऊबंध तुझे
आमचे हात बांधलेले
नेते साले कुत्रे आमचे
तुझ्या तर्फे भुंकणारे
टळेल रे फांशी तुझी
मग तुला कैदेत ठेवतील
मरतील आमचे बांधव उपाशी
तुला चिकन-मटन बिर्याणी
तुला सोडवायला तुझे लोक
विमानाचे अपहरण करतील
म्हणूनच म्हणतो-----
उठ अफझल ऊठ
नेते आमचे षंढ आहेत---
पुन्हा घाव घाल तूं !
पुन्हा घाव घाल तूं !!!

कोणासारखे काय करावं ............ ......... ...

राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं
शूर असावं तर राणा प्रतापसारखं.
स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं.
देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं.
कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं .
हुशार असावं तर बिरबलासारखं .
धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं.
करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी.
सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं.
सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख.
राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं.
बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं.
समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.
अष्टपैलू लेखक असावं तर जयवंत दळवीसारखं.
देशाला ललामभूत ह्वाव तर बिल गेट्ससारखं.
निरलस सेवार्थी ह्वाव तर डॉ.तात्यासाहेब लहानेसारखं.
शब्दांचे बुडबुडे फोडावेत तर कॉंग्रेससारखं.
राष्ट्रभाषेचे धिंडवडे काढावेत तर ममता बनेर्जीसारखे.
लग्न न करता नुसतच बिनधास्त बरोबर रहाव तर बिपाशा बसूसारखं .
लग्नाशिवाय झालेली मुलगी खुल्लम खुल्ला वाढवावी तर नीना गुप्तासारखी.
खमक्या असावं तर लालू प्रसादसारखं.
लफडेबाज असावं तर टायगर वूड्ससारखं.
लग्न करावीत तर एलिझाबेथ टेलरसारखी.
उद्योगपती ह्वाव तर टाटासारखं.
सहकुटुंब यशस्वी ह्वाव तर अमिताभ बच्चनसारखं.
अनाकलनीय लिहाव तर ते ग्रेससारखं.
व्यंगचित्रे काढावीत तर ती आर.के.लक्ष्मणसारखी.
बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं .
गझल गावी तर मेहंदी हसनसारखी.
घर असावं तर मुकेश अंबानीसारखं.
बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.
चालीचा चोर असावं तर अन्नू मलिकसारखं.
भ्रष्टाचारी असावं तर इंडियन मेडिकल कौन्सिलचा अध्यक्ष केतन देसाईसारखं.
बोलबच्चन असावं तर अरुण जेटलीसारखं.
निर्ल्लज कामांध असावं तर किचकासारखं किंवा शायनी आहुजासारखं.
प्रेक्षक नाहीत हे कळून सुद्धा सिनेमे काढावेत तर देव आनंदसारखं.
बाईने रूपवान व ‘ग्रेसफुल’ असावं तर गायत्री देवीसारखं.
बाईन कस नसाव तर राखी सावंतसारखं .
निर्विष विनोद करावा तर पु.ल.देशपांडेसारखा.
लग्न करून सुखी ह्वाव तर माधुरी दीक्षितसारखं.
लग्न करून दुखी ह्वाव तर अदनान सामीसारखं.
दुसरी बायको करायची तर हेमा मालीनिसारखी.
त्रेचाळीस वय झाल तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकऱ्यांच्या मागे उंडरत फिरायचं तर सलमान खानसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात लिहलेल्या एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तूप लावून फिरायचं तर भालचंद्रनेमाडेसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात काढलेल्या एका चित्रपटाच्या जीवावर आजही टेचात फिरायचं तर रामदासफुटाणेसारखं.
आनंदात व उत्साहात जगायचं तर यशवंत देवांसारखं.
रडत आणि कटकट करीत जगायचं तर माझ्यासारखं.
( सौजन्य- शिरीष कणेकर यांचा ‘सामना’ मधील लेख)

लल्लाटी भंडार ...

नदीच्या पल्याड, आईचा डोंगर (२)
डोंगर माथ्याला, देवीचं मंदिर (२)
घालू जागर जागर, डोंगर माथ्याला (२)
हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)
नदीच्या पाण्यावर, आन्गीण फुटत (२)
तुझ्या नजरेच्या तालावर, काळीज डुलत (२)
नाद आला गं आला गं, जीवाच्या घुंग्राला (२)
हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)
नवसाला पाव तू, देवी माझ्या, हाकला धाव तू
हाकला धाव तू, देवी माझ्या, अंतरी रहावं तू
देवी माझ्या, अंतरी रहावं तू, काम क्रोध अर्पुनी लाव तू
काम क्रोध मर्दुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू
डोळा भरून, तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगर्‍या वाहीन
घुगर्‍या वाहीन, तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली, हळदीच्या अंगाला (२)
हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती हि, जमल्या गं लेकरं
पुनवंचा चांदवा, देवीचा गं, मायेचा पाझर
आई तुझा, मायेचा पाझर, सागर ह्यो, भक्तीचा सागर
खनं नारळानं, ओटी मी भरीन
ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देव्हारा धरीन
देव्हारा धरीन, माझी ओंजळ भरीन
आई सांभाळ सांभाळ, कुशीत लेकराला
आई सांभाळ सांभाळ, कुशीत लेकराला
हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती हि, जमल्या गं लेकरं
पुनवंचा चांदवा, देवीचा गं, मायेचा पाझर
आई तुझा, मायेचा पाझर, सागर ह्यो, भक्तीचा सागर



संगीत : अजय-अतुल
गीत : संजय पाटिल
चित्रपट : जोगवा

कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...


कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...


कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...


कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...


कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...


कधीतरी तू मला असं वचन देशील ?
पूढच्या जन्मी तरी माझी होशील ?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो
यातच मग मला समाधान असेल...

मराठा हाच विचार ...

टिप – मराठा शब्द अखंड महाराष्ट्रातील लोकांना उद्देशून आहे. कुणी जातिवाचक घेऊ नये.

मराठ्यांची उप-यांशी जमली आहे गट्टी
लाचारीची मस्त पेटली आहे भट्टी
इथे जो तो स्वात: चा उदो उदो करतोय
गटारातील कीडा रोजच इथे मारतोय || १ ||

कुणी नाही जिवंत सारे मुडदे इथे
स्वार्थाचे माकड धावते जिथे तिथे ,
देतात आरोळी मेलेल्या प्रेताला
मराठाच शोधतोय मेलेल्या स्वत:ला || २ ||

भाषणबाजी करत रोज जोतो जगतोय
“मराठा मी एकटाच” आरोळी ठोकतोय
शंडा ची अवलाद दुसरेच आहे
हे बांगड्या घेऊन सांगायची वेळ आहे || ३ ||

मराठ्यांचे सरदार सगळे लाचार
आपणच खरे पाईक राज्याचे आहे
बाकी गणोजीची पिलावळ सांगायला
कलाशाचे ह्याना पाठबळ आहे || ४ ||

लिलावात इज्जत, आज बाजार भरलाय
जो तो इथे स्वार्थाने भारलाय ,
संपेल संपूर्ण मराठा पण संपेल का स्वार्थ ?
कधीतरी लाचारिही पुकारेल का आर्त ? || ५ ||

जे जे आहे जिवंत त्यानी घालावी साद
मेलेले मूडदे ही देतील प्रतिसाद ,
लाचार सरदार पण मावळे हुशार
गाडा आधी फितूर करा “मराठा हाच विचार” || ६ ||

—————– बाजी दराडे

माझ्या मागे....!

मी सुखे त्यागुनी सारे;
असे हरवतो जेंव्हा;
न जाणे कसा उमटलो
हा रस्ता माझ्या मागे...॥१॥

दर्पणात या इसमां
पाहणे अशक्य आहे;
तू काय हवी ती कर तयाची
अवस्था माझ्या मागे... ॥२॥

मी धावत होतो अथवा;
फरफटलो गेलो तरीही
हे काय नित्य स्तब्ध उभे
जन्मतः माझ्या मागे....॥३॥

काळाचा वेग असाध्य;
मन चक्काचूर होते
समोर पळते काही
सर्वत: माझ्या मागे....॥४॥

मज देह रिताच होता;
मोक्षाधीन आता झाला
ही कशास करिता तुम्ही
सांगता माझ्यामागे....॥५॥

असणे नसणे सारे;
जर हाती तुझ्याच आहे
का राहतोस व्यर्थ उभा
समर्था माझ्या मागे....॥६॥

मैत्री असते कशी ...


मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?

हो हो लोणच्यासारखी. मुरत जाते, जुनी झाली की.

मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?

हो हो सायीसारखी. घट्ट होते वेळ जा‌ईल तशी.

मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?

हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी.

मैत्री असते कशी, फोडणीसारखी?

हो हो फोडणीसारखी. लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.

मैत्री असते कशी, मीठासारखी?

हो हो मीठासारखी. नसेल तर हो‌ईल जीवन अळणी.

चिमणं गोष्टी

चिमणे चिमणे रडू नको!
आईचा पदर ओढू नको!
सोपवते तुज बाईंच्या हाती,
शाळेला कधी टाळू नको!!!

चिमणे चिमणे झालीस मोठी,
पंख पसरून उडण्या साठी..
भरारी घेताना भिऊ नको!
उंच उंच जाण सोडू नको!!!

चिमणे चिमणे रडू नको!
सुटले घरटे समजू नको!
संसारी केली तुझी पाठवणी,
कमी स्वत:स लेखू नको!!!

चिमणे चिमणे झालीस मोठी!
टिपशील दाणे बाळा साठी!
शेवटची गं ही बाळे पाठवणी,
आता चिमणू राहू नको!!!

चिमणे चिमणे झालीस मोठी,
चिमणं गोष्टी विसरू नको!
चिमणे चिमणे रडू नको,
चिव-चिव करण सोडू नको!!!

राजे पुन्हा जन्मास या..

जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या
राजे पुन्हा जन्मास या

शिरि शिरपेच हाती समशेर शोभती
अश्वरुढ होई राजा शिवछत्रपती
हे राजे, तुम्हा हिन्दुह्रुदय पुकारती
भगवा धरुन हातात या..राजे पुन्हा जन्मास या. || १ ||

कावा गनिमी करुनी, धर्मरक्षिण्यास
फाडिले अफजल खानास तसा
आज सरकार म्हणे त्यास फासी नको.
फाडण्या पुन्हा खानास या
राजे पुन्हा जन्मास या. || २ ||

नाव घेती तुमचे किती, परी
चरित्र कुणा का ना उलगडे तरी?
राजकारण करी, ती नावावरी,
शिकवण्या धडे राजकारणाचे या
राजे पुन्हा जन्मास या. || ३ ||

पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माणास या
मराठि अस्मिता जागविण्यास या
नको बांधणि किल्ल्याची आम्हा आता
माणुस मराठि एकदा जोडण्यास या
राजे पुन्हा जन्मास या. || ४ ||

जाणत्या राजास ला़ख्-लाख मुजरा असो
स्विकारण्या माझ्या मुजर्यास या
राजे पुन्हा जन्मास या.
जन्म घ्या तुम्हि जन्म घ्या
राजे पुन्हा जन्मास या. || ५ ||

----- --- स्वप्निल देमापुरे

चुकलंच.... पण कुणाचं ??

कधी कधी माझं मन मला खायला उठतं,
मी तिला असं दुःखवायला नको होतं...

हां, झालं असेल काही उलटं सुलटं,
कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!
मी कधी याचा विचारच का केला नाही?
आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??

पण तरीही ती माझीच होती,
कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!
झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,
पण कुणी?, मी नाही म्हटलं... तिनं तरी??

तिला काय वाटत असेल आत्ता?
जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का...?
शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक ...पण,
मी काय करू? काय नको ? ...असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?

मी काहीच बोललो नाही.
बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..
बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,
पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!

शेवटचा निर्णय तिचाच होता ,
त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं,
दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं..

मी तिला असं दुःखवायला नको होतं...
मी तिला असं दुःखवायला नको होतं........!!!!
की...? तिनं तरी मला असं दुःखवायला नको होतं...

स्वराज्य तोरण चढे...

स्वराज्य तोरण चढे...

खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाची अनुष्ठीला , भला देखे

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे !

माय भवानी प्रसन्न झाली
सोनपावली घरास आली
आजच दसरा , आज दिवाळी
चला , सयांनो , अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे !

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाही
नसांतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे !

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे , सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई !
जय जय रघुवीर समर्थ

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी , जय भवानी
दश दिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !!

* कवयित्री - शांता शेळके * संगीतकार - आनंदघन
* मूळ गायक -लता , उषा , मीना , हृदयनाथ मंगेशकर , हेमंतकुमार

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात ...


ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील....!

एक अनामिक

आठवेन मी तुला..

आठवेन मी तुला..
सोडून तुझ्या काळजाला जाईल, तेव्हा मी आठवेन तुला
काळजाला छातीत शोधशील तेव्हा आठवेन मी तुला..
येईन लपत छपत रोज रातीच्या स्वप्नात तुझ्या,
तेव्हा झोपेत स्मित हसताना आठवेन मी तुला..
माझ्या अल्लड प्रेमाला एकदाच विसरून तु,
दुसर्‍या कोणाला करशील प्रेमात घायाळ , तेव्हा आठवेन मी तुला..
दोस्तांच्या गर्दित गप्पा मारता मारता रुसशील तू,
तेव्हा तुझ्या रुसव्यातूनच आठवेन मी तुला…
माझ्या तस्विरीला डोळ्यातून मिटवण्यासाठी करशील प्रयत्न,
तेव्हा सलत्या पापण्यातून ओघळताना आठवेन मी तुला…
निरव शांततेच्या रातीला , खिडीकीतून पाहशील जेव्हा,
तेव्हा तुझ्यावर ह्सणार्‍या चंद्राला पाहून आठवेन मी तुला..
पुन्हा पुन्हा पावसात ओली चिंब होशील तू,
तेव्हा एकांताच्या सरी अंगावर झेलताना आठवेन मी तुला..
आता प्रत्येक सुखाचा आंनद अनुभवताना,
दुरवर मला शोधून थकशील तू अन आठवेन मी तुला..
निलपरीच्या त्या पोषाखात सज़ून , मोकळ्या केसात
तुझे हात फिरताना आठवेन मी तुला..
तुझ्याच नावाने लिहिल्या सार्‍या गझल,
आता वाचताना होशील भावूक तेव्हा शब्दांतून आठवेन मी तुला..

यात काही पाप नाही

सिगरेटचा जेव्हा तुम्ही, मजेत घेता मस्त झुरका,
आवडलेल्या आमटीचा, आवाज करीत मारता भुरका,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
जबरदस्त डुलकी येते, धर्मग्रंथ वाचता वाचता,
लहान बाळासारखे तुम्ही, खुर्चीतच पेंगू लागता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
देवळापुढील रांग टाळून, तुम्ही वेगळी वाट धरता,
गरम कांदाभजी खाऊन, पोटोबाची पूजा करता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साद देता,
कवितेच्या ओळी ऐकून, मनापासून दाद देता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !

मंगेश पाडगांवकर

जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा , कृष्ण कोयना , भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो , शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला , निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो , महाराष्ट्र माझा
===========================================

कवि - राजा बढे
संगीत - श्रीनिवास खळे
गायक - शाहीर साबळे

जीव दंगला गुंगला रंगला असा.....


जीव दंगला गुंगला रंगला असा

पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

पैलतीर नेशील
साथ मला देशील
काळीज माझा तू

सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनावाचा चांद तू

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

चांद सुगंधा येईल
रात उसासा देईल
सारी धरती तुझी
रुजाव्याची माती तू

खुलं आभाळ ढगाळ
त्याला रुढीचा ईटाळ
माझ्या लाख सजणा
हि काकाणाची तोड माळ तू
खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन
तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचा गोंधळ

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू
===============================================
चित्रपट : जोगवा
स्वर: हरिहरन आणि श्रेया घोशाल
संगीत : अजय अतुल

करीअर कथा ...


|| करीअर कथा ||
बारावीचा निकाल | मग सीईटीचा परीक्षाकाळ |
परीक्षांचा झाला सूकाळ | आता ठाई ठाई ||१||

इंजिनीअरिंग का मेडिकल | जाणावा आपुला कल |
पडताळावे इतर सकल | विषय आणि पर्याय ||२||

शिक्षणाचे मार्ग सगळे | पर्याय अनेक वेगळे
जे आपणा न कळे | तज्ञांना विचारावे ||३||

बारावी नंतर काय | प्रश्न करती वडील माय |
आहे यावर उपाय | फक्त मुलांची आवड ||४||

बाळाचे पाय पाळण्यात दिसती | उक्ती अनुभवी सांगती |
त्याची घ्यावी प्रचिती | मुलांच्या भल्यासाठी ||५||

आवडीचे क्षेत्र निवडावे |   तसेच मार्गदर्शन करावे |
मुलांचे भले पाहावे | प्रथम त्यांच्या आवडीत ||६||

आपली आवड कशात | जाणून त्या विषयांत |
मेहनत करावी त्यांत | मुलांनी प्रगतीसाठी ||७||

प्रसिध्द खेळाडू किती | यशस्वी ते उद्योगपती |
त्यांनी केली प्रगती | आवडीच्या विषयांत ||८||

जी आपली आवडी | त्यात घेतली आघाडी |
ते क्रिकेट खेळगडी | फक्त बारावी पास ||९||

गुण असती उपजत | त्यांनाच घालावे खत |
नाही येणार आफत | भविष्यात चिंतेची ||१०||

आवडीच्या विषयात | थोडीच पुरते मशागत |
विषय होईल अवगत | पटकन लवकर ||११||

गायक सुरात नाहले | नायक अभिनयात मुरले |
नर्तक तालात नाचले | आनंदात सुखेनैव ||१२||

चित्रकार चित्रात रंगले | शिल्पकार शिल्पात घडले |
कलाकार कलेत रमले | जातीचे कलावंत ||१३||

आवडीच्या विषयात करता कष्ट | आळस होतो नष्ट |
आलेख दिसतो स्पष्ट | उज्ज्वल भविष्याचा ||१४||

काही चालती धोपट मार्गे | काही धावती झटपट मार्गे |
नका जाऊ आडमार्गे | पैसा आणि प्रगतीसाठी ||१५||

जपावी नैतिकता | निवडा आवडीची उद्योजकता |
नेटाने कष्ट करता | प्रगती आहे निश्चित ||१६||

कोणी करती चर्मोद्योग | कोणी करती कुटीरोद्योग |
करावा असाच उद्योग | मराठी माणसाने ||१७||

निर्णय नसावा अयोग्य | विचार करावा सुयोग्य |
शिक्षण निवडा स्वयोग्य | आवडीच्या विषयात ||१८||

छंद विषयांत नाही ताप | कामाचा नाहीच संताप |
शक्य होते करणे प्रताप | दडपणाशिवाय ||१९||

काम होईल झटपट | उत्साहात छान पटापट |
वाटणार नाही कटकट | आवडीच्या विषयाने ||२०||

आवड असता नाही डोकेफोड | बोलता येईल फडाफड |
प्रश्नांची उत्तरे सडेतोड | देता येतील सदैव ||२१||

आयुष्य सरेल छान मस्त | मन राहील आनंदे चुस्त |
काम होता बिनधास्त | सूर सापडेल प्रगतीचा ||२२||

काम जमता निश्चित | भविष्य नसेल अनिश्चित |
जीवन प्रवाह विनाखंडित | पार पडेल सुरळीत ||२३||

क्षेत्र आवडीचे निवडावे | पदवीस प्राप्त करावे |
प्राविण्य पुढे मिळवावे | प्रयत्ने सातत्याने ||२४||

करिअरची होता घटट मुळे | जीवन वृक्ष फुले फळे |
जीवन अवघे उजळे | समस्त कुटुंबियांचे ||२५||

करिअर कथा वाचावी | तशीच लोकांस सांगावी |
कथेची प्रचिती घ्यावी | सर्व विद्यार्थ्यांनी ||२६||

स्वप्ने ही आपलीच असतात ....

स्वप्ने ही आपलीच असतात ,
हृदयात त्याना जपायची असतात ,
फुलांसारखी फुलावायाची असतात ,
घरांसारखी सजवयाची असतात ,
कारन स्वप्ने आपलीच तर असतात ,
रेशीम बंधाने त्याना बांधयाची असतात ,
मनातल्या मंदिरात पुजयाची असतात ,
कधी कधी अश्रुंच्या पुरात वाहून द्यायची असतात ,
आठवनींच्या जगत कोठेतरी सकारायाची असतात ,
पूर्ण झाली नाही तरी ....
शेवटी स्वप्ने ही आपलीच असतात ....
हृदयात त्याना जपायची असतात ........

जे मनाला पाहिजे ते..

जे मनाला पाहिजे ते मिळत नाही
जे नकोसे वाटते ते टळत नाही...

एवढा माझ्यामध्ये मी गुंग असतो;
सूर आताशा कुणाशी जुळत नाही...

चेहरा इतका निरागस, भाबडा पण
आतले काही कुणाला कळत नाही...

अश्रु प्याले, मद्य आणिक जहरसुद्धा
दुःख माझे त्यांतही विरघळत नाही...

चांदणेही लुप्त असते रात्रभर अन
रात्र वैऱ्याची अशी मग ढळत नाही...

वाट ही नुसतीच जाते दूर कोठे?
वळण येते तरिहि मागे वळत नाही...

स्वप्न, आशा, ध्येयही दिसते पुढे पण
आज मागे मी कशाच्या पळत नाही...

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी ,
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधऊन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असेच कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

- सुरेश भट

जेव्हां मिळेल एकांत...

कधी मिळाला एकांत
तर् बसावे....एकटेच्
काढीत जून्या आठवणी
काही क्षणांच्या....हलकेच्

ते क्षण रंगवावे,
सजवावे डोळ्यांच्या पापण्यांवर
जे,...
कधी दुस-यात रमलेले,
कधी आपल्यातच् हरवलेले,
कुणावर रागावलेले..

तर कधी....
आपल्यावर् कुणी हिरुमुसलेले
अन् त्याचा रुसवा काढण्यासाठी
आपणही खोटे-खोटेच् रुसलेले

ते क्षण लांबवावे...
डोळ्यांच्या कोंदणात त्यांना
मंद हासवावे....
अशा क्षणांच्या स्मॄतीत,
डोळे भरुन येतात्
त्यातील काही आसवे
गालावरती ओघळतात

अशावेळी....
त्यातल्या काही आसवांना
हातावर झेलावे, पहावे
फक्त पहातच रहावे
आणि....

एका वेगळ्या आशेसाठी
त्यांस चवीने चाखावे
ते फक्त....

गडद स्मॄतींना पचविण्यासाठी
आणि त्या पून्हा जाग्या करण्यासाठी
जेव्हां मिळेल एकांत...........


कुसुमाग्रज....