टपरी ...

सन्ध्याकाळची वेळ, सगळे जमायचो,
काँलेज सुटलेकी इकडेच यायचो,
वरती छत नाही, फ़टक्या भीन्ति, दोन चार तुटक्या बाकडी,
अश्या तुटक्या फ़ुटक्या विसाव्याच्या जागेला अम्ही 'टपरी' म्हणायचो.

पास, नापास तर कधि अभ्यासाला न्याय,
शेरो शयरी टवाळक्या तर कधी प्रेमचे अध्याय,
ह्या सगळ्या गोष्टिऩ्वर एकच उपाय,
सिगारेट का धुआ और उधार की चाय.

मुव्हि, नाटक, पिकनिकचे तर प्ल्यान बनवीले डिस्कोथेकचे,
कधि बर्थडे बम्प्चे तर अस्वाद घेतले कधि केकचे,
इथेच पराक्रम केलेत आम्ही पोरगी पटविण्याचे,
तर भान्डणात नकाशेही बदलीविलेत अनेकान्चे.

उन्हाळे, पावसळे,हिवाळे गेले,
आणी टपरी प्रेम आमचे वाढतच गेले,
पण एक दिवस टपरी सोडावी लागेल,
या विचाराने मन रडू लागले.

वेळ बदलला काळ बदलला, मीत्रान्चा आता साथ सुटला,
मनात इथली फ़क्त आठवण आहे,
आम्ही नसलो तरी काय झाले,
टपरी अजुणही तशीच सदाबहार आहे

चांदण्या रात्री तुझी साथ ...

चांदण्या रात्री तुझी साथ
माझ्या हाती सख्या तुझाच हात
अशी रात्र संपूच नये कधी
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात...

तू माझ्या संगतीने चांदण्यात हिंडावे
तुझ्या सहज स्पर्शाने मी हरवून जावे
हे असे क्षण सख्या
पुन्हा पुन्हा मी तुझ्यासवे जगावे...

तुझ्या आश्वासक स्वराने माझे मन हसते
तुला पाहताना मी स्वतःला विसरून जाते
कसे सांगू जिवलगा तुला
मी फ़क्त तुझ्याच साठी जगते...

आजही आठवते ती चांदरात मला
त्या प्रेमळ सहवासाने सुख नव्याने गवसले मला
तुलाही सख्या आठवतात का
ते सारे शब्द जे मोहून टाकतात मला...

काहीच नाही…..

बोलण्यासारखे खुप आहे,
सांगण्यासारखे काहीच नाही;

करण्यासारखे खुप आहे,
होण्यासारखे काहीच नाही….

कधी माझ्या डोळ्यात, खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे,
दुखण्यासारखे काहीच नाही…..

उभा  रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसले नाही तुला तर,
बघण्यासारखे काहीच नाही…..

तुला नेहमीच वाटत असेल,
मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे,

कळण्यास अवघड काहीच नाही…..
माझ्या नेत्रांतील आसवांची,
तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत,
नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत.

कोण म्हणत देव नसतो......!

कोण म्हणत देव नसतो
आधार मागितला चालण्यासाठी,
आई-वडिल दिलेत...
जग बघण्यासाठी.

थोड पुढ चालून
प्रवास काटावा म्हटल,
तर मित्र दिलेत
आधारसाठी.....

आल्या जन्मी काही करावस वाटल
जग बघण्यासठी,
गुरु दिलेत....
ज्ञान वाढवण्यासाठी.

कोण म्हणत देव नसतो....

सहवास हवा होता
सुख:दुखाची देवाण-घेवाणासाठी
जीवनाचा जोडीदार दिलास....
भरुन आलेल मन मोकळ करण्यासठी.

सगळ मिळाल्यावर आता मात्र
आभार मानावस वाटल
जन्मदाताच तो.....
शेवटी त्यान त्याच्याच दारात आणुन टाकल