प्रेम, महत्व आणि प्रशंसा

प्रेम, महत्व आणि प्रशंसा

प्रेम विसरलं की विसरतं
प्रेम पसरलं की पसरतं

आपल्या बायको किंवा प्रेयसीला
आपल्या जवळ घ्यावं
डोळ्यात डोळे घालून, हसून
तिला एखादं फूल द्यावं

बघा तिचा चेहरा कसा उजळतो
बघा तिच्या वागणूकीत,
कसा फरक पडतो

कुणी आपल्याला चांगलं म्हटलं
की कसं आपल्याला बरं वाटतं
आशावेळी खोटं बोललं तरी
आपल्या हृदयाला कसं खरं वाटतं

सुंदरातल्या सुंदर मुलिला महत्व दिलेलं आवडतं
मुलगा हुशार नसला तरी त्याला महत्व दिलेलं आवडतं

मोठ्या माणसांना प्रशंसा नको
हा फारच चुकीचा समज आहे
अन्न, छत आणि वस्त्रासारखी
महत्व ही प्रत्येका माणसाची गरज आहे

जे कठोर शब्दाने होत नाही,
ते कोमल शब्दाने होतं
प्रेम, महत्व आणि प्रशंसा पसरल्याने
बघा कसं जग बदलतं

प्रेम विसरलं की विसरतं
प्रेम पसरलं की पसरतं

मैत्री

काही नाती जपावी लागतात
काही नाती मानावी लागतात
कितीही उसवली तरी पुन्हा पुन्हा विणावी लागतात..
पण मैत्रीचं असं नसतं..
कारण ते नातं असतचं मुळी अखंड एकसंध
त्याला ना सुरुवात ना शेवट..
तरीही पुर्ण ह्र्दय व्यापून उरणारं..
त्याला ना लागते सुई ना दोरा…
तरीही घट्ट विणलेलं…
एक एक टाका विणून लोकरीची मऊ ऊबदार शाल विणावी,
तितकीच मायेची ऊब देणारं हे नातं..
आभाळाइतकं अथांग,
सागराइतकं विशाल,
शब्दाविनाही भावना सांगणारं,
अन आयुश्य़भर साथ देणारं हे नातं,
जसं तुझं नी माझं….